मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

वडिलांना काही त्रास होण्याचे संकेत; तुमच्या राशीसाठी कसा असेल उद्याचा दिवस!

वडिलांना काही त्रास होण्याचे संकेत; तुमच्या राशीसाठी कसा असेल उद्याचा दिवस!

फोटो सौजन्य - Shutterstock

फोटो सौजन्य - Shutterstock

दिनांक १८ एप्रिल २०२२ सोमवार. आज चैत्र कृष्ण त्रयोदशी. चंद्र आज तुला राशीत भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे राशी भविष्य.

दिनांक १८ एप्रिल २०२२ सोमवार. आज चैत्र कृष्ण त्रयोदशी. चंद्र आज तुला राशीत भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे राशी भविष्य. मेष सप्तम स्थानात चंद्र अत्यंत शुभ असून प्रवास, जोडीदार भेट, सोबत खरेदी असा हा दिवस आहे. प्रवास योग येतील. कामाच्या ठिकाणी नाव मिळेल. दिवस उत्तम. वृषभ आज षष्ठ चंद्र मानसिक आणि आर्थिक मजबुती देईल. कुटुंबात तुमच्या मनासारख्या घटना घडतील. मन आनंदी राहिलं. दिवस उत्तम. मिथुन राशीच्या पंचम स्थानातील चंद्र भ्रमण लाभ देणारे कौटुंबिक सुखाचे राहील. गुरू शुभ फळ देईल. जोडीदाराला शुभ काळ. दिवस शुभ. कर्क आज चतुर्थ स्थानातून होणारे चंद्र भ्रमण गृहसौख्य देणारे आहे. सप्तम शनि कुरबुरी सुरू ठेवेल. रवि बुध मात्र मार्ग दाखवतील. दिवस उत्तम आहे. सिंह राशीच्या तृतीय स्थानातून होणारे चंद्र भ्रमण भावंडं सुखासाठी शुभ काळ दाखवीत आहे. प्रत्येक विषयात काही तरी लाभ होईल. शांत रहा. दिवस उत्तम. कन्या आज द्वितीय स्थानातील भ्रमण उत्तम असून घरासाठी काही विशेष खरेदी होईल. जास्तीचे काम पडेल. वडिलांना काही त्रास होण्याचे संकेत. दिवस मध्यम आहे. तुला कामाच्या ठिकाणी काही महत्वाच्या घटना घडतील. जास्त जबाबदारी घेऊ नका. घरामध्ये काही विषयात मतभेद असतील. दिवस बरा आहे. वृश्चिक व्यय स्थानातील चंद्र मध्यम अनुभव देईल. फार दिवसांनी तुमची प्रकृती ठीक असेल. खर्च होईल पण आर्थिक लाभ देखील उत्तम राहील. दिवस चांगला आहे.. धनु आज चंद्र भ्रमण आणि द्वितीय शनी सांभाळून राहण्याचे संकेत देत आहेत. वाहनपासून जपा. आर्थिक दृष्ट्या काळ बरा आहे. दिवस मध्यम. मकर आजचा दिवस कुटुंबीयासमवेत शांतपणे घालवा. त्यांना वेळ द्या. आर्थिक लाभ होतील. कार्यक्षेत्रात काळजी घ्या. खर्च जपून करा. दिवस मध्यम. कुंभ आज संतती आनंदी राहणार आहे. मंगळ राशीत असून प्रकृती नाजूक, आर्थिक दृष्ट्या जपून राहण्याचा काळ आहे. दिवस मध्यम जाईल. मीन आज कार्य क्षेत्र आणि घरेलु जीवन याला महत्व असेल. प्रवास योग येतील. गुरू धार्मिक कारणांसाठी खर्च करेल. आज दिवस मध्यम असून गुरूची उपासना करावी. शुभम भवतू!!
Published by:Meenal Gangurde
First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya, Rashichark

पुढील बातम्या