मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Daily Horoscope : जोडीदाराच्या मताला किंमत द्या, जाणून घ्या कसा जाईल रविवार!

Daily Horoscope : जोडीदाराच्या मताला किंमत द्या, जाणून घ्या कसा जाईल रविवार!

कर्क राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण करिअर आणि बिझनेस दोन्हीसाठी चांगले सिद्ध होईल. नोकरी शोधणाऱ्यांना चांगल्या नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. उत्पन्न वाढू शकते. पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यापाऱ्यांनाही फायदा होईल.

कर्क राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण करिअर आणि बिझनेस दोन्हीसाठी चांगले सिद्ध होईल. नोकरी शोधणाऱ्यांना चांगल्या नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. उत्पन्न वाढू शकते. पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यापाऱ्यांनाही फायदा होईल.

दिनांक १७ एप्रिल २०२२. वार रविवार. आज चैत्र कृष्ण प्रतिपदा. आज चंद्र तुला राशीत प्रवेश करेल. पाहुया आजचे बारा राशींचे भविष्य.

दिनांक १७ एप्रिल २०२२. वार रविवार. आज चैत्र कृष्ण प्रतिपदा. आज चंद्र तुला राशीत प्रवेश करेल. पाहुया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष आज मानसिक आंदोलने होतील. जोडीदाराच्या मताला किंमत द्या. कार्यक्षेत्रात परदेश संबंधी घटना घडतील. विशेष पूजा हातून घडेल. दिवस मध्यम.. वृषभ आज दिवस लाभदायक असून महत्वाचे निरोप मिळतील. प्रवास योग येतील. पण काळजी घ्या. वडीलधारी व्यक्ती मदत करेल. तरीही सावध रहा. दिवस शुभ. मिथुन काळजीपूर्वक राहण्याचा दिवस. आर्थिक लाभ होईल. मात्र खर्च देखील भरपूर होईल. घरात काही तणावाची स्थिती राहील. महत्वाचे निर्णय टाळा. दिवस मध्यम. कर्क आज प्रकृती ठीक राहिलं. व्यवसायात प्रगती होईल. जोडीदाराची काळजी घ्या. ईश्वराची उपासना सर्व संकटातून मार्ग काढेल. मानसिक ताण होईल. दिवस मध्यम. सिंह शत्रू डोकं वर काढण्याचा प्रयत्न करतील. पण शनि त्यांचा प्रयत्न हाणून पाडेल. चंद्र आर्थिक लाभ दाखवत आहे. गुरू कृपा मार्ग दाखवेल. आरोग्य चिंता वाटेल. दिवस उत्तम. कन्या जोडीदाराला नवीन संधी प्राप्त होतील. मुलांची अनाठायी चिंता वाटेल. आर्थिक आणि शारीरिक चिंता कमी होतील. नाम जप आणि पूजन करा. दिवस उत्तम. तुला गृह, नवीन वाहन याचे योग येतील. कुठेही अनावश्यक धाडस करू नये. कार्यक्षेत्रात विशेष घटना घडतील आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. महत्वाचा निर्णय आज नको. दिवस बरा. वृश्चिक आज अचानक संतती संबंधी काही काळजी वाटेल. फिरायला जाणे होईल. पण मन अशांत राहील. वादविवाद टाळा. दिवस मध्यम. धनु आज अनेक ठिकाणाहून जबाबदाऱ्या येतील. आर्थिक चिंता दूर झाली तरी खर्च जपून करा. कुटुंब सुख लाभेल. दिवस मध्यम. मकर राशीतील शनि अनेक संमिश्र फळ देणार आहेत. फार ताण घेऊ नका. डोकेदुखीचा त्रास होईल. जोडीदाराला शुभ काळ. आर्थिक प्राप्ती चांगली राहील. दिवस उत्तम. कुंभ जपून रहा. फार महत्वाचे निर्णय लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न करा. आर्थिक कामं पूर्ण होतील. धार्मिक कार्यात वेळ जाईल. देवदर्शन घडेल. दिवस मध्यम. मीन कुटुंबियांच्या समवेत दिवस जाईल. काही तरी विशेष करून दाखवाल. लोकांमध्ये तुमच्या नावाची चर्चा होईल. संततीला आर्थिक दृष्ट्या शुभ दिवस आहे. उपासना करा. दिवस मध्यम. शुभम भवतू!!
Published by:Meenal Gangurde
First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya, Rashichark

पुढील बातम्या