मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Daily Horoscope : अविवाहित व्यक्तींना मिळणार Good News, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Daily Horoscope : अविवाहित व्यक्तींना मिळणार Good News, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

आज दिनांक १४ एप्रिल २०२२. वार गुरूवार. आज चैत्र शुक्ल त्रयोदशी चंद्राचे भ्रमण सिंह राशीतून होणार असून दिनांक १३ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजून ४५ मिनिटांनी गुरूचा मीन राशीत प्रवेश झाला असून पुढील १२ महिने गुरू मीन राशीत वास्तव्य करेल.

पुढे वाचा ...
    आज दिनांक १४ एप्रिल २०२२. वार गुरूवार. आज चैत्र शुक्ल त्रयोदशी चंद्राचे भ्रमण सिंह राशीतून होणार असून दिनांक १३ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजून ४५ मिनिटांनी गुरूचा मीन राशीत प्रवेश झाला असून पुढील १२ महिने गुरू मीन राशीत वास्तव्य करेल. सिंह राशीचा आठवा तर मेष बारावा गुरू असेल. पिडा परिहरार्थ दान व जप करावा. पाहूया आजचे बारा राशींचे राशीभविष्य. मेष बारावा गुरू व पंचम चंद्र अध्यात्मिक उन्नती, शैक्षणिक लाभ दाखवीत आहे. परदेश संबंधी शुभ समाचार मिळतील. दिवस उत्तम. वृषभ लाभ स्थानात आलेला गुरू अतिशय शुभ असून संतती प्राप्ती साठी अनुकूल फळ देईल. घरामध्ये शुभ कार्य घडेल. मातृ पितृ सुख लाभेल. दिवस शुभ. मिथुन राशीच्या कर्म स्थानात येणारा गुरू घर आणि कार्य क्षेत्रात यश देईल. आईवडिलांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होईल. प्रवास, महत्वाचे फोन येतील. दिवस उत्तम. कर्क भाग्य स्थानातील गुरू अचानक सगळ्या क्षेत्रात यश, लाभ मिळवून देईल. अनेक दिवसापासून अडकलेली काम मार्गी लागतील. आर्थिक हानीपासून जपावे. दिवस बरा. सिंह अष्टम गुरू प्रकृतीची चिंता निर्माण करेल. राशीतील चंद्र मानसिक उलाढाल दाखवीत आहे. दिवस शांतपणे घरात व्यतीत करा. कन्या राशीच्या जातकांचे जोडीदार सोबत असलेले संबंध मधुर होतील. अविवाहित व्यक्तींना साथीदार मिळेल. नवीन पर्वाची सर्वात होईल. व्यय चंद्र मन उदास ठेवेल. दिवस मध्यम. तुला राशीच्या षष्ठ स्थानात आलेला गुरू नोकरी, आर्थिक व्यवहार, कर्ज मुक्ती यासाठी शुभ असून चंद्र अनेक लाभ मिळवून देणार आहे. दिवस उत्तम. वृश्चिक संततीसाठी अतिशय शुभ फल देणारा गुरू उच्च शिक्षणात देखील मदत करेल. कार्य क्षेत्रात लाभ होतील. नवीन जबाबदारी येईल दिवस शुभ धनु चतुर्थ स्थानात येणारा गुरू गृह सौख्य, नवीन वास्तू, वाहन मिळवून देईल. भाग्यकारक घटना घडतील. शुभ आणि अध्यात्मिक अनुभव येतील. दिवस शुभ. मकर देश विदेशचे प्रवास, भावंडांशी भरभराट असा हा काळ आहे. वाणी तेजस्वी होईल. चंद्र भ्रमण जपून राहण्याचे संकेत देत आहे. कुंभ राशीच्या धन स्थानात येणारा गुरू कौटुंबिक, आर्थिक सुखात वाढ करेल. जोडीदाराला शुभ काळ. दिवस उच्च प्रतीचे अनुभव देईल. मीन राशीमध्ये आलेला गुरू परीपक्व आणि स्थिर व्यक्तिमत्व देईल. विचार सुधारतील. तेजस्वी व्यक्तिमत्व होईल चंद्र भ्रमण प्रकृतीची काळजी घ्या असे सुचवीत आहे. शुभम भवतू!!
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya, Rashichark

    पुढील बातम्या