मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Daily Horoscope : या राशीला आर्थिक लाभ संभवतो, जाणून घ्या तुमचं भविष्य!

Daily Horoscope : या राशीला आर्थिक लाभ संभवतो, जाणून घ्या तुमचं भविष्य!

दिनांक १५ एप्रिल २०२२ वार शुक्र वार. आज चैत्र शुक्ल चतुर्दशी. चंद्र आज कन्या राशीत भ्रमण करेल. तिथून तो गुरूशी प्रतियोग करेल. आज सूर्य मेष राशीत प्रवेश करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

दिनांक १५ एप्रिल २०२२ वार शुक्र वार. आज चैत्र शुक्ल चतुर्दशी. चंद्र आज कन्या राशीत भ्रमण करेल. तिथून तो गुरूशी प्रतियोग करेल. आज सूर्य मेष राशीत प्रवेश करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष आज षष्ठ चंद्र आरोग्य चिंता लावेल. शुभ गुरूचे गोचर आनंद देईल. आर्थिक लाभ संभवतो. कौटुंबिक समारंभ होतील. दिवस शुभ. वृषभ आज पंचम स्थानातील चंद्र गुरू दृष्टीत संततीसाठी काही विशेष खरेदी, आनंद आणि गृह सौख्य मिळेल. सामाजिक जीवनात भाग घ्याल.  उत्तम दिवस. मिथुन चतुर्थ स्थानातील चंद्र गुरूशी विशेष योग करीत आहे. उच्च प्रतीचे अध्यात्मिक, सामाजिक अनुभव येतील. घरात भरपूर वेळ घालवाल. दिवस चांगला जाईल. कर्क तृतीय चंद्र आणि गुरू काही अध्यात्मिक अनुभव देतील. आर्थिक बाजू भक्कम राहील. मन स्थिर होईल. मित्र मंडळ भेटेल. प्रकृती जपा. दिवस मजेत जाईल. सिंह आज द्वितीय चंद्र गुरू खूप काम मिळवून देईल. आर्थिक लाभ झाल्यामुळे आनंदी राहाल. तसेच कुटुंबसुख लाभेल. जोडीदाराला वेळ द्या. दिवस शुभ. कन्या आज चंद्र राशी स्थानात आहे तुमच्यावर येणाऱ्या जबाबदाऱ्यामुळे तुम्ही प्रसिद्धीच्या झोतात याल. आदर आणि सन्मान वाढेल. गुरू नोकरी करता मदत करेल. दिवस शुभ. तुला आज व्यय चंद्र मध्यम प्रतीचे फळ देण्यास सज्ज आहे. परदेश आणि धार्मिक क्षेत्रात चांगला लाभ मिळेल. प्रकृती जपा. खर्च होतील. दिवस शुभ. वृश्चिक आज घरात आनंदात राहण्याचा दिवस. चंद्र प्रकृती संबंधी उत्तम फळ देईल. घरामध्ये काही विशेष घटना घडतील. जोडीदार आनंदी राहील दिवस शुभ. धनु आज जीवनातील एक चांगला दिवस आहे. कार्यक्षेत्रात देखील चांगला अनुभव देईल. प्रवासाचे योग येतील. शनि योग शुभ फळ देईल. दिवस आनंदात जाईल. मकर शनि राशीत काही प्रकृतीचे त्रास, निर्माण करतील. कुटुंबाकडे लक्ष द्या. नातेवाईक भेट संभवते. आर्थिक दृष्ट्या लाभ होईल. शुभ दिवस. कुंभ गुरू चंद्र योग आज आनंदात दिवस घालवा असे सुचवीत आहे. संतती कडे लक्ष द्या. खर्च टाळा. धार्मिक स्थानाला भेट देण्याचे योग. दिवस शुभ. मीन आज चंद्र गुरू आर्थिक दृष्ट्या घडामोडी घडवेल. घरामध्ये काही आनंदी घटना घडतील. जोडीदार आनंदी राहील. धार्मिक स्थानाचा प्रवास होईल दिवस शुभ आहे. शुभम भवतू!!
Published by:Meenal Gangurde
First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya, Rashichark

पुढील बातम्या