मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Daily Horoscope : हरवलेलं सापडेल, रखडलेलं मार्गी लागेल; राशीनुसार असा असेल आजचा दिवस

Daily Horoscope : हरवलेलं सापडेल, रखडलेलं मार्गी लागेल; राशीनुसार असा असेल आजचा दिवस

सूर्यराशीनुसार 23 सप्टेंबर 2022 या दिवसासाठीचं राशिभविष्य.

सूर्यराशीनुसार 23 सप्टेंबर 2022 या दिवसासाठीचं राशिभविष्य.

सूर्यराशीनुसार 23 सप्टेंबर 2022 या दिवसासाठीचं राशिभविष्य.

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 23 सप्टेंबर 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) काही अनपेक्षित कारणांमुळे दिवसाची सुरुवात नेहमीपेक्षा लवकर होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी आरामदायी वाटेल. एक नवीन आणि इंटरेस्टिंग दृष्टिकोन प्रेरणादायी ठरेल. LUCKY SIGN - A lilac artwork वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) गंभीर चर्चेमुळे काही गोष्टींना उशीर होऊ शकतो. तुमच्या संवादातून अधिक गोंधळ होणार नाही याची काळजी घ्या. एखादा महत्त्वाचा धागा, महत्त्वाची माहिती तुमचं काम सोपं करू शकेल. LUCKY SIGN - A wooden box मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) कामकाजात स्थिरता येईल. नवीन कल्पनांवर आता विस्तृत चर्चा होण्याची शक्यता आहे. तुम्ही एखाद्या व्यक्तीला डेट करत असाल, तर तुमचा/तुमची पार्टनर तुमच्या काही गोष्टींशी असहमत असू शकेल. LUCKY SIGN - Mirrorwork कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) घरच्या कामात अधिक अडकल्यामुळे तुम्हाला फारसा उत्साह असणार नाही; मात्र खाद्यपदार्थांवर चर्चा करणं, त्यावर लक्ष केंद्रित केल्यानं थोडी मजा वाटू शकेल. आजच्या उदासवाण्या दिवशी पुस्तकं वाचणं, बिंज वॉचिंग आदींची शिफारस केली जात आहे. LUCKY SIGN - A parrot सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) तुमच्यावरचा ताण वाढण्याची शक्यता आहे; मात्र एखादी चांगली बातमी ताण थोडासा हलका करून दिवस संतुलित करू शकेल. जवळच्या मित्राशी बोलण्यानं ताण कमी होईल. LUCKY SIGN - An old diary कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) आजच्या दिवसात तुमच्या महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्या. अचानक काही समस्या उद्भवू शकतात. तुम्ही ऐकलेल्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका. LUCKY SIGN - An indoor game तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) स्वतःच्या काही गोष्टी पूर्ण करण्यासाठी विशेषत: ऑफिसमधलं काम असो किंवा घर आवरणं यासाठी आजचा दिवस चांगला आहे. या कामात तुम्हाला काही तरी महत्त्वाचं सापडण्याची शक्यता आहे. पोटाच्या आरोग्याची काळजी घ्या. LUCKY SIGN - A glass bottle वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) नेहमीच्या रुटीनमधून थोडा ब्रेक घेण्याचा काही काळ बाजूला ठेवा. तुम्ही जिथे आहात तिथेच तुमची जास्त गरज आहे. दूरवरून कोणी तरी तुम्हाला भेटायला येण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - A stationery box धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) हरवलेली एखादी गोष्ट सापडण्याची दाट शक्यता आहे. जवळपासच्या छोट्या ट्रिपची योजना आखत असाल तर ती प्रत्यक्षात येऊ शकते. तुम्हाला खेळ आवडतात याची जाणीव होईल. LUCKY SIGN - A cycle bell मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) योग्य दिशेने केलेले थोडेसे प्रयत्नदेखील यश देतील. निर्णय घेण्यासाठी आपल्या आंतरिक संकेतांचं/ अंतरात्माच्या आवाजाचं पालन करा. काही वेळ अस्वस्थता जाणवली तरी आजचा दिवस अधिक चांगला असेल. LUCKY SIGN - New cutlery कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) नवीन कपड्यांचं आकर्षण तुम्हाला शॉपिंग करायला उद्युक्त करू शकेल. आज तुम्ही तुमची सगळी दिवसभरातली कामं छान पार पाडाल. काही रखडलेले प्रश्नही तात्पुरत्या स्वरूपात सुटू शकतील. LUCKY SIGN - An umbrella मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) तुमच्या अपेक्षेपेक्षा अगदी वेगळी अशी सहकाऱ्याची चांगली इच्छा तुम्हाला आश्चर्यचकित करेल. निसर्गाच्या सान्निध्यात असाल तर दिवसाची सुरुवात अगदी प्रसन्न असेल. मुलांवर लक्ष ठेवण्याची गरज भासेल. LUCKY SIGN - Hanging planters
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या