मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Daily Horoscope : ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी तुमच्या राशीत काय? पाहा आजचं राशिभविष्य

Daily Horoscope : ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी तुमच्या राशीत काय? पाहा आजचं राशिभविष्य

राशिभविष्य.

राशिभविष्य.

तुमच्या राशीनुसार ऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस तुमच्यासाठी कसा जाणार पाहा.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Delhi, India

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 1 ऑक्टोबर 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)

आजचा दिवस वेगवान असेल. तुमची ऊर्जा विशिष्ट कामाच्या दिशेने वळवली जाईल. संध्याकाळसाठी तुमचे काही प्लॅन्स असण्याची शक्यता आहे. कामाचा ताण वाढेल; मात्र तो लवकरच नियंत्रणात येईल.

LUCKY SIGN - An opal

वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)

एखाद्या व्यक्तीला कॉल करणं तुम्ही सतत पुढे ढकलत असलात, तर आज तो कॉल करण्याचा दिवस आहे. आता नियमित शारीरिक व्यायामाची गरज आहे. अन्यथा प्रकृती बिघडण्याची किंवा वैद्यकीय सल्ला घेण्याची गरज लागण्याची शक्यता आहे. एखादं बिझनेस प्रपोझल तुमच्यासमोर येईल. ते फायद्याचं ठरेल.

LUCKY SIGN - A yellow sapphire

मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)

आज ऊर्जा तुमच्या बाजूने आहे. त्यामुळे दिवसाचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्या. नावीन्यपूर्ण प्लॅन्स तयार केले जातील आणि ते तातडीने पूर्णत्वाच्या दिशेने जातील. त्यात प्रगतीसाठी तुमच्याकडे मंजुरीही असेल.

LUCKY SIGN - A black tourmaline

कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)

तुमच्या आयुष्यात आलेला नवा मित्र हा केवळ थोड्या काळापुरता एक टप्पा आहे. त्याकडे फारसं गांभीर्याने पाहू नका. घरगुती मुद्द्यांकडे तातडीने लक्ष द्यावं लागेल. कोणा बाहेरच्या व्यक्तीकडून झालेल्या हस्तक्षेपामुळे तुम्हाला बऱ्यापैकी त्रास होईल.

LUCKY SIGN - A lampshade

सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)

तुमच्याभोवती तुमच्यासाठीचं काय आहे आणि इतरांसाठी काय आहे, याचं सुलभीकरण करा. नवं रूटीन अंगीकारण्याचा प्रयत्न करत असलात, तर निराशेचे काही क्षण येऊ शकतात. तुमच्या बॉसेसकडून तुमची पाठराखण केली जाऊ शकते.

LUCKY SIGN - A labeled box

कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)

तुमच्या जोडीदाराकडे तुमच्याकडून अधिक लक्ष दिलं जाण्याची गरज आहे. क्रिएटिव्ह राहण्यासाठी आणि प्रगतीसाठी तुमच्या मनाला ताजंतवानं करण्याची गरज आहे. काही दिवसांतच उत्पन्नाचा नवा स्रोत तुमच्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

LUCKY SIGN - A garden

तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)

कामाच्या ठिकाणच्या काही गंभीर मुद्द्यांकडे तुम्ही लक्ष देण्याची गरज आहे. तुम्ही पुरेशी झोप घेत आहात, याची काळजी घ्या. दिवसभरात पुरेशी विश्रांती घ्या. संध्याकाळी एखादा मित्र भेटायला येण्याची शक्यता आहे.

LUCKY SIGN - A squirrel

वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)

आगामी कौटुंबिक सोहळ्यासाठी तुम्ही उत्तमपणे केलेल्या तयारीला दाद मिळेल. दिवसातल्या तुमच्या प्रायॉरिटीज योग्य रीतीने ठरवा आणि वेळ वाचवा. नवं रूटीन फॉलो करून तुम्ही चांगलं काम करत आहात.

LUCKY SIGN - A parrot

धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)

तुम्ही बराच काळ प्रतीक्षा करत आहात; पण लवकरच तुम्हाला सकारात्मक बातमी मिळेल. तुमच्यामध्ये नवा उत्साह निर्माण होण्याचे संकेत आहेत. तुमच्यासाठी एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी कुटुंबीय तुमच्याशी सल्लामसलत न करण्याची शक्यता आहे.

LUCKY SIGN - A red dress

मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)

आता अधिक प्रॅक्टिस केली, तर तुमचा नंतरचा वेळ वाचू शकेल. नवं एखादं कौशल्य आत्मसात करावं. तुमचं कौतुक करणारी व्यक्ती जवळच असेल. तुमच्याकडून चूक कधी होतेय, याची अनेक जण वाट पाहत आहेत.

LUCKY SIGN - A clear sapphire

कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)

तुमच्या वैयक्तिक आयुष्यातल्या प्रगतीत होत असलेल्या उशिरासाठी भूतकाळातल्या काही कृती कारणीभूत आहेत. खूप खोलवर शोध घेतल्यानंतर मिळणारे निष्कर्ष समाधानकारक असतील. एखादा वस्तुनिष्ठ निर्णय तुम्हाला पुढे वाटचाल करण्यासाठी मदत करील.

LUCKY SIGN - A green aventurine

मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)

तुम्हाला स्वतःला व्यक्त होण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. काही तरी लिहून काढा आणि ती लवकरच तुमची सवय बनेल. पूर्वी तुम्ही केलेल्या अचीव्हमेंट्स हा आता भूतकाळ आहे. आता पुन्हा नव्याने सुरुवात करा. आजचा दिवस नवा स्ट्रेसबस्टर घेऊन येईल.

LUCKY SIGN - An emerald

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs