आज दिनांक 6 डिसेंबर 2021 तिथी मार्गशीर्ष शुद्ध द्वितीया. आज चंद्र धनु राशीतून भ्रमण करेल. तिथे तो शुक्रा सोबत असेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.
मेष
आज मेष राशी भाग्यवंत ठरेल. मानसिक ताणतणाव कमी होईल. धार्मिक कार्य घडेल. मेजवानी मिळेल. खर्च करावा लागेल. घरात अचानक बदल करण्याची इच्छा होईल. त्यासाठी कष्ट कराल. दिवस शुभ.
वृषभ
थोडे जपुन रहा. असा आजचा दिवस सुचवतो आहे. अष्टमात चंद्र शुक्राचे भ्रमण, मानसिक स्वास्थ्य बिघडवते. राशीतील राहू संभ्रमावस्था निर्माण करेल. कामाच्या ठिकाणी जपुन वागा. दिवस मध्यम आहे.
मिथुन
सप्तम स्थानातील शुक्र आणि शुभ चंद्र आज उत्तम फळ देण्यास सज्ज आहेत. आर्थिक नियोजन करण्याचे विचार येतील. नुकसान होणार नाही हे बघा. जोडीदारा सोबत दिवस आनंदाने व्यतीत करा.
कर्क
राशीच्या पंचम स्थानातील मंगळ अणि षष्ठ चंद्र आहे. जपुन रहा. प्रकृती सांभाळा. अति कामाचा ताण घेऊ नका. ग्रहस्थिती फारशी अनुकूल नाही. पण लवकरच ठीक होईल. शिव उपासना करणे योग्य.
सिंह
या राशीच्या व्यक्ती आज आनंदी असतील. नाव लौकिक वाढेल. मुलांकडे लक्ष असू द्या. चतुर्थ मंगळ नाहक खर्च किंवा खरेदीकडे कल दाखवत आहेत. तिकडे लक्ष असू द्या. दिवस चांगला .
कन्या
आज सगळा वेळ घरासाठी जास्तीचे काम करण्यात जाईल. आर्थिक लाभ होतील. एकूण दिवस चांगला आहे.आईशी संबंध छान राहतील त्यांच्या प्रकृतीची काळजी नको. दिवस चांगला जाईल.
तुला
छोटे प्रवास, त्याची तयारी, किंवा आखणी करण्यात आजचा दिवस घालवाल. काही महत्त्वाचा संवाद आज घडू शकतो. फोन ईमेल, याद्वारे जन संपर्क घडेल. आई वडीलांच्या प्रकृतीची काळजी घ्या. दिवस शुभ.
वृश्चिक
आर्थिक लाभ, कौटुंबिक सुख समाधान यात आज वाढ होईल. खरेदीचे मनसुबे पूर्ण होतील. घरासाठी काही वस्तूंची खरेदी कराल.. थोडक्यात आणि सौम्य बोला. शुभ दिवस.
धनु
राशीतून होणारे चंद्र भ्रमण मानसिक स्वास्थ्य देईल. व्ययात मंगळ आहे, प्रकृतीच्या किरकोळ तक्रारी कडे लक्ष द्या. अति खर्च, प्रवास नको. आर्थिक स्थिती ठीक राहील. गृहसौख्य मिळेल. दिवस चांगला.
मकर
आज दिवस फारसा अनुकूल नाही. राशीतील शनी, व्यय स्थानातील चंद्र व पंचमात राहू , सांभाळून रहा असे सुचवत आहे. खर्च सांभाळुन करा. मुलांकडे लक्ष द्या. त्यांच्या साठी काही निर्णय घ्यायचे असतील तर घ्या .दिवस मध्यम आहे.
कुंभ
दिवस लाभ मिळवुन देणारा आहे. मित्र मैत्रिणींना भेटणे शक्य होईल. मुलांना वेळ द्यावा लागेल. त्यासाठी काही खर्च ही होईल. धार्मिक कार्यामध्ये मन रमेल. नियमाने उपासना करा.
मीन
नोकरी व्यवसायात आज फार दगदग होणार आहे. मंगळ कोणी नवीन व्यक्तीची भेट दर्शवत आहे. दिवस भर कामाचा ताण राहील. धार्मिक बाबी किंवा पुजा यासाठी खर्च होईल. त्याची तयारी कराल. दिवस चांगला आहे.
शुभम भवतु!!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.