Home /News /astrology /

Today's horoscope : या राशीला प्रवास संभवतो, मात्र वाहनापासून जपून राहा!

Today's horoscope : या राशीला प्रवास संभवतो, मात्र वाहनापासून जपून राहा!

आज दिनांक 27 डिसेंबर 2021 सोमवार आज मार्गशीर्ष कृष्ण नवमी आहे. चंद्र आज कन्या राशीतून भ्रमण करणार आहे. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

    आज दिनांक 27 डिसेंबर 2021 सोमवार आज मार्गशीर्ष कृष्ण नवमी आहे. चंद्र आज कन्या राशीतून भ्रमण करणार आहे. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष आज तुम्हाला सावध राहणे गरजेचे आहे. अष्टम स्थानात मंगळ केतू आरोग्यासंबंधी  काही चिंता उत्पन्न करतील. पण गुरुकृपा सर्व संकटाचे निवारण करील. धार्मिक कार्य घडेल. दिवस बरा जाईल. वृषभ पंचम स्थानात चंद्र संतती संबंधी काही घटना घडतील. काही नवीन वास्तु संबंधी निर्णय होईल. वडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्या. जोडीदार सहकार्य करेल. दिवस चांगला जाईल. मिथुन आज चंद्र दिवसभर कन्या राशीत असणार आहे. चतुर्थ चंद्र आराम करावा असे सुचवत आहे. षष्ठ स्थानात भ्रमण करणारा मंगळ प्रकृती संबंधी विचार करावा लागेल. प्रवास ठरतील. तुमचा स्वभाव तापट होईल. दिवस शुभ. कर्क तृतीय स्थानात चंद्र अणि पंचमातील मंगळ यापुढील काही दिवस   पोटाचे विकार देईल. पित्त वाढेल. कुटुंबासाठी काहीतरी करावेसे वाटेल. शुक्र आर्थिक स्थिती उत्तम ठेवेल. प्रवास होतील. मुलांची काळजी घ्या. दिवस शुभ. सिंह राशी च्या चतुर्थ स्थानात आलेला मंगळ सिंह व्यक्ती ना  तेजस्वी व्यक्तिमत्त्व बहाल करेल. शुक्र आकर्षण निर्माण करतो..तेव्हा  जरा जपून रहावे .  कुटुंबाला वेळ द्यावा लागेल. दिवस चांगला. कन्या आज तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वात आणखी भर पडेल. समाजासाठी काही करण्याची इच्छा होईल. राशीच्या तृतीय स्थानात आलेला मंगळ आता जपून रहा असे संकेत देत आहे. प्रवासाचे योग. दिवस मध्यम. तुला आज मन पूर्णपणे कुठेतरी गुंतून राहील. संतती, मित्र मैत्रिणींना वेळ द्यावा लागेल. लाभ होतील. कुठूनतरी पैसा मिळेल. आर्थिक स्थिती बाबत काळजी घ्यावी असे वाटते. दिवस शुभ आहे. वृश्चिक कन्या चंद्र अनेक ठिकाणी यश देईल. कार्यक्षेत्रातील बदल फायद्याचे ठरतील. जुने संबंध फायदा करून देतील. प्रकृती ठीक राहील. आर्थिक बाजु चांगली राहील. दिवस चांगला  आहे. धनु व्यय मंगळ केतू अशुभ आहे. कोणाशी वाद करू नका. प्रकृती नाराज राहील. आर्थिक बाजु बरी राहील. चंद्र मानसिक दृष्ट्या कठीण. दिवस मध्यम जाईल. मकर लाभ स्थानात प्रवेश केलेले मंगळ केतू, त्वचा विकार डोके वर काढतील. प्रवास संभवतात. मात्र काळजीपूर्वक राहावे. वाहनापासून जपावे. गुरु कृपा आहे. दिवस चांगला आहे. कुंभ, आज मंगळ दशम  स्थानात केतू सोबत आलेला असून तणावपूर्ण स्थिती राहील. कार्यक्षेत्रातील अडचणी बद्दल चौकशी करावी. अष्टमात चंद्र अडचण निर्माण करेल. दिवस मध्यम जाईल. मीन आज पासून काही दिवस  जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्या. रक्तदाब, मधुमेह असेल तर तपासणी करून घ्यावी. मंगळाची उपासना करावी. आज चंद्र शुभ फळ देणारा ठरेल. शुभ दिवस. शुभम भवतु!!
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya

    पुढील बातम्या