• Home
  • »
  • News
  • »
  • astrology
  • »
  • आठवड्याची सुरुवात कशी होईल? जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य

आठवड्याची सुरुवात कशी होईल? जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य

आज दिनांक 15 नोव्हेंबर 2021 तिथी कार्तिक शुक्ल द्वादशी. आज तुलसी विवाह. आज चंद्र उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात असेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

  • Share this:
    आज दिनांक 15 नोव्हेंबर 2021 तिथी कार्तिक शुक्ल द्वादशी. आज तुलसी विवाह. आज चंद्र उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात असेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष व्यवसाय भागीदारी साठी अतिशय शुभ काळ असून शत्रू  पराजित होतील. जोडीदार आनंदात असेल. शुभ घटना घडतील. व्ययस्थ चंद्र खर्चात वाढ करेल. दिवस मध्यम जाईल. वृषभ लाभ संभवतात. प्रगतीच्या नवीन संधी येतील. खर्चाची चिंता वाटेल. प्रकृती जपा, पोटाची काळजी घ्या. षष्ठ स्थानात बुध मंगळ नोकरीमध्ये उत्तम फळ देईल. दिवस चांगला. मिथुन राशी स्वामी बुध तुला राशीत पंचमात आहे. संतती साठी अतिशय चांगला काळ असून घरामध्ये कलह टाळा. चंद्र लाभ मिळवुन देईल. प्रवास, मौजमजेसाठी खर्च होईल. दिवस शुभ. कर्क राशीच्या चतुर्थ स्थानात मंगळ बुध घर खर्च वाढेल. उंची वस्तु खरेदी कराल. वास्तु योग सफल होतील. वाहन सुख भरपूर मिळेल. कार्यक्षेत्रातील प्रगती सुरू राहील. दिवस शुभ. सिंह तृतीय स्थानात मंगळ रवि भावंडां सोबत काही वाद निर्माण करतील. आर्थिक बाजु ठीक राहील. त्यांची प्रगती होईल. कले मध्ये रुची वाढेल. अष्टमात  चंद्र हुरहूर जाणवेल. दिवस मध्यम जाईल कन्या राशीतील रवि मंगळ जपून राहण्याचे संकेत देत आहेत. अग्नी भय, अपघात  यापासून सावध रहा. परंतु धनस्थानात येणारे बुध शुक्र उच्च राहणीमान ,आर्थिक आवक दाखवत आहेत. जोडीदाराची साथ लाभेल. दिवस चांगला. तुला राशीत असणारा मंगळ बुध खर्चिक स्वभाव करेल. मंगळ सूर्य कायदा पाळा असे सुचवत आहेत. डोळ्यांची काळजी घ्यावी. शत्रू पिडा संभवते. दिवस शुभ. वृश्चिक व्यय स्थानात मंगळ बुध खर्चात वाढ करेल. उंची वस्तु खरेदी कराल. उत्तम लाभ होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. दिवस चांगला आहे. धनु भरपूर काम अणि त्यापासून होणारे लाभ असा दिवस आहे. घरात शांतता राहील. आर्थिक बाजु चांगली. कुटुंबासाठी शुभ काळ आहे. दिवस आनंदी आहे. मकर राशीच्या दशमातील बुध मंगळाचे भ्रमण लाभदायी ठरेल. नोकरीमध्ये नवीन संधी मिळतील. व्यवसाय धंद्यात अनेक लाभ होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. दिवस चांगला. कुंभ भाग्य स्थानातील बुध राजयोग कारक असून पराक्रमाची वाढ करतील. आर्थिक लाभ होतील. व्यय स्थानात गुरू शनि धार्मिक कार्य साठी खर्च करतील. दिवस अनुकूल आहे. मीन आज तुमच्या राशीतील चंद्र आणि अष्टमात बुध मंगळ जरा कठिण परिस्थिती निर्माण करतील. जास्तीचा आर्थिक ताण येईल. मन थोडे अस्वस्थ राहील. दिवस मध्यम जाईल. शुभम भवतु!!
    Published by:Meenal Gangurde
    First published: