मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

राशीभविष्य : सिंह राशींनी आज रागावर नियंत्रण ठेवा; इतर राशींना कसा जाईल दिवस?

राशीभविष्य : सिंह राशींनी आज रागावर नियंत्रण ठेवा; इतर राशींना कसा जाईल दिवस?

आज दिनांक  14 नोव्हेंबर  2021  रविवार तिथी कार्तिकी एकादशी. आज चंद्र दिवसभर मीन राशीत असेल. पाहूया आजचे राशीभविष्य .

आज दिनांक 14 नोव्हेंबर 2021 रविवार तिथी कार्तिकी एकादशी. आज चंद्र दिवसभर मीन राशीत असेल. पाहूया आजचे राशीभविष्य .

आज दिनांक 14 नोव्हेंबर 2021 रविवार तिथी कार्तिकी एकादशी. आज चंद्र दिवसभर मीन राशीत असेल. पाहूया आजचे राशीभविष्य .

  • Published by:  Meenal Gangurde

आज दिनांक  14 नोव्हेंबर  2021  रविवार तिथी कार्तिकी एकादशी. आज चंद्र दिवसभर मीन राशीत असेल. पाहूया आजचे राशीभविष्य .

मेष

दुपारनंतर दिनमान   बरे नाही. आर्थिक व्यवहार जपून करा.  मन थोडे अस्वस्थ राहील. जोडीदाराची काळजी घ्या. कुटुंबाला वेळ द्या. दिवस  मध्यम आहे .

वृषभ

आज दुपारनंतर मानसिक शांती वाढेल. सूर्य मंगळ दोन दिवस काळजी घ्या असे  सुचवतो आहे. मोठे निर्णय टाळा. उपासना करा. लाभ होतील. मित्रमैत्रिणींना भेटणे शक्य होईल. दिवस शुभ.

मिथुन

राशीच्या  दशमातील चंद्र भ्रमण, व्यय राहू, ग्रहमान अनुकूल. गुरु महाराज साथ देतील. प्रकृतीला जपावे. आर्थिक व्यवहार टाळावे. कार्य क्षेत्रात नवीन संधी मिळवून देणारे ग्रहमान आहे.

कर्क

दिवस शुभ संकेत देतो आहे. भाग्यकारक योग होतील. मित्र मैत्रिणीशी संवाद साधा. मीन राशीतील चंद्र चांगले फळ देईल. चतुर्थ मंगळाचा जप करा. ओम अं.अंगारकाय नम:. प्रकृती ची काळजी घ्या.

सिंह

आज विचित्र घटना अचानक वाढतील. दिवस मध्यम आहे. मंगल प्रकृतीच्या किरकोळ तक्रारी निर्माण करेल. मानसिक उद्रेक होण्यापासून जपुन रहा.

कन्या

अचानक दोन दिवसानंतर मन शांत व स्थिर होईल कामात मन रमेल. दिवस भाग्य कारक आहे. कुठूनतरी शुभ वार्ता कळतील. गुरु  स्मरण  करावे. मौजमजा करण्याचा संकेत. दिवस शुभ.

तुला

आज दिवस तुला राशीच्या  व्यक्तींसाठी सांभाळून राहण्याचा आहे. ग्रहांचे सहकार्य मिळणे कठीण आहे. दिवस शांततेत घालवा. मोठे निर्णय लांबणीवर टाका. ओम सोम  सोमाय नम: जप  करणे फायद्याचे  ठरेल.

वृश्चिक

आज  संततीला वेळ द्यावा लागेल. दुपारनंतर कामांना वेग येईल. दिवस अनुकूल आहे. राशीत असलेला केतू  आध्यात्मिक रुची निर्माण करेल. शारीरिक व्याधीकडे लक्ष द्या. ओम नमः शिवाय जप करा.

धनु

राशीच्या धनस्थानातील  शनी, साडेसाती इत्यादी  नी धनु व्यक्ती त्रासले आहेत. पण आज दिवस  अनुकूल आहे. भाग्यात मंगळ आहे. मंगळाची उपासना करावी. घरात विशेष घटना घडतील. दिवस शुभ.

मकर

मकर रास साडेसाती मुळे  उदास आहे, पण आता थोडी अनुकूलता मिळेल. मुलांकडे लक्ष द्या. विद्यार्थ्यांना चांगला दिवस आहे.  शनी  उपासना करावी. चंद्र भ्रमण प्रवास योग आणेल. बहीण भाऊ भेटतील.

कुंभ

आजचे ग्रहमान  अनुकूल असुन साडेसाती असली तरी गुरुकृपेने निभावून जाल. आर्थिक व्यवहार जपून करा. घरासंबंधित काही कामे असतील तर उरकून घ्या...दिवस चांगला आहे.

मीन

आपल्या राशीला  सध्या  रवि अष्टमात आहे. जप सुरू ठेवावा. दुपारनंतर फोन, भेटी गाठी, छोटे प्रवास संभवतात. महत्त्वाचा कामे उरकून घ्या. मुलांची काळजी घ्या. दिवस चांगला आहे

.

हे होते  बारा  राशींचे भविष्य.

शुभम भवतु !

First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya