Home /News /astrology /

राशीभविष्य : 'या' तीन राशींना मिळेल चांगली बातमी; जाणून घ्या तुमच्या राशीत काय लिहिलंय

राशीभविष्य : 'या' तीन राशींना मिळेल चांगली बातमी; जाणून घ्या तुमच्या राशीत काय लिहिलंय

आज सोमवार दिनांक 13 September 2021. आज भाद्रपद शुक्ल सप्तमी. आज ज्येष्ठ गौरी पूजन/महा नैवेद्य. चंद्र आज ज्येष्ठा नक्षत्रात असेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

आज सोमवार दिनांक 13 September 2021. आज भाद्रपद शुक्ल सप्तमी. आज ज्येष्ठ गौरी पूजन/महा नैवेद्य. चंद्र आज ज्येष्ठा नक्षत्रात असेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष आज दिवस फारसा अनुकूल नाही. मन अशांत राहील. आर्थिक बाजु ठीक आहे. अचानक कोणीतरी येण्याची शक्यता आहे. प्रकृती जपा. दिवस मध्यम. वृषभ आज व्यवसाय उत्तम फळ देईल. मिष्टान्न लाभ. मानसिक ताण जाणवेल. आर्थिक बाजू ठीक राहील. मामाकडुन लाभ होण्याची शक्यता आहे. जोडीदाराची साथ मिळेल. दिवस चांगला आहे. मिथुन राशीच्या षष्ठ स्थानातील चंद्र भ्रमण प्रकृतीकडे लक्ष असू द्या असे सुचवीत आहे. नातेवाईक भेटतील. नोकरीत काम जास्त पडेल. खर्च होईल. दिवस चांगला जाईल. कर्क मुलांना आणि घरच्या लोकांना वेळ द्या. शिक्षणात उत्तम प्रगती, वाचन लिखाण यात वेळ जाईल. आर्थिक घडामोडी होतील. दिवस बरा जाईल. सिंह तृतीय शुक्र आणि चतुर्थ चंद्र घरांमधे भरपूर खर्च करवणार आहेत. मंगळ बुध काही त्वचेचे विकार निर्माण करतील. घरात जास्तीचे काम पडेल. गुरुकृपा राहील. दिवस शुभ. कन्या आज छोटेसे जवळपासचे प्रवास घडतील. महत्त्वाचा निर्णय, किंवा संभाषण होईल. भावंड भेट देतील. प्रकृती ठीक राहील. दिवस चांगला जाईल. तुला राशीच्या धनस्थानातील चंद्र भ्रमण आर्थिक लाभ मिळवून देईल. कार्यक्षेत्रातील प्रगती सुरू राहील. कुटुंबात काही छान घटना घडेल. दिवस शुभ. वृश्चिक राशीतील चंद्र  राहूच्या दृष्टीत आहे. मन थोडे अशांत राहील. संभ्रमात पडाल.घरात पाहुणे येण्याची शक्यता आहे.धार्मिक कार्या संबंधी बोलणी होतील. दिवस चांगला. धनु व्यय स्थानातील चंद्र भ्रमण वाढलेला खर्च, दगदग दाखवत आहे.भाग्य  मात्र साथ देईल. वडील व्यक्तींची मदत होईल. दिवस मध्यम जाईल. मकर राशीच्या लाभ स्थानातील चंद्र प्रवास योग,गाठीभेटी, आणि लाभ कारक आहे. प्रकृती जपा. एकट्याने प्रवास करणे टाळा. अध्यात्मिक साधना होईल. दिवस शुभ. कुंभ कामाच्या ठिकाणी आज जास्तीचे काम, विशेष जबाबदारी पडेल. आर्थिक बाजू ठीक राहील. प्रकृती ठीक राहील. जोडीदार मदत करेल. दिवस अनुकूल. मीन राशीच्या भाग्य स्थानातील चंद्र भ्रमण आज आध्यात्मिक अनुभव देईल. तुमचा प्रभाव वाढेल. घरातील शांतता जपा. काहींना प्रवास योग येतील. दिवस चांगला जाईल. शुभम भवतु!!
Published by:Meenal Gangurde
First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya

पुढील बातम्या