• Home
  • »
  • News
  • »
  • astrology
  • »
  • आजचे राशीभविष्य : मेष आणि कर्कने आवर्जुन करा जगदंबेची पूजा, होईल कृपा!

आजचे राशीभविष्य : मेष आणि कर्कने आवर्जुन करा जगदंबेची पूजा, होईल कृपा!

आज सोमवार दिनांक 11 ऑक्टोबर 2021.आज अश्विन शुद्ध षष्ठी. सहावी माळ.

  • Share this:
आज सोमवार दिनांक 11 ऑक्टोबर 2021.आज अश्विन शुद्ध षष्ठी. सहावी माळ. आज माता कात्यायानीचे पूजन केले जाते. स्वरुप सुंदरी, सिंहारूढ चतुर्भुजा जगदंबा हातात त्रिशूळ, कमल धरण केले असून ती भक्त वत्सला आहे. आशीर्वाद देणारी आहे. आज्ञा चक्रावर हिचा प्रभाव असून ती महिषासुरमर्दिनी आहे. विवाह जमत नसेल तर हिचे पूजन केल्याने फार लाभ मिळतो. आदिमाया अंबाबाईचा उदोउदो. मेष आज नवरात्रानिमित्त दिवस जगदंबेच्या चिंतनात घालवा. मन थोडे नाराज राहील. काही शारीरिक त्रास देखील संभवतात. आर्थिक स्थिती ठीक राहील. दिवस  मध्यम आहे. वृषभ आज दिवस उत्तम असुन आर्थिक, व्यावसायिक निर्णय अगदी योग्य ठरतील. धार्मिक आस्था वाढेल. अधिकारी व्यक्तीशी भेट होईल. भागिदारीसाठी उत्तम दिवस. मिथुन आज दिवसभर मानसिक ताणतणाव, हुरहुर आणि प्रकृती नरम गरम राहील. काहीतरी मन गुंतून राहील असे काम करा. दिवस मध्यम आहे. कर्क पंचमात चंद्र आज उत्तम फळ देण्यास तयार आहे. आर्थिक स्थिती ठीक राहील. भक्ती आणि जगदंबा पूजन यात मन रमवा. दिवस संततीसाठी फारसा अनुकूल नाही. काळजी घ्या. सिंह आजचा दिवस  घरात जास्तीची काम, अनावश्यक खर्च, असा आहे. व्यावसायिक निर्णय अगदी ठीक राहतील. संघर्षातून यश मिळेल. दिवस  चांगला आहे. कन्या तृतीय चंद्र देव दर्शन ,भेटी गाठी घडवून आणेल. महत्त्वाचे फोन येतील. आज दिवस आनंदात घालवा. घरात खूप काही घटना सतत घडतील. आर्थिक बाजू चांगली राहील. दिवस शुभ  आहे. तुला आजचा दिवस हा आर्थिक भरभराटीचा आहे. भक्तीची परिभाषा शिकवणारा आहे .आज भजन पूजनात  मन रमू द्या. कौटुंबिक सुख उत्तम मिळेल. दिवस शुभ. वृश्चिक आज तुमच्या हाताने  होणारे काही धार्मिक काम तुम्हाला फार आनंद देईल. राशीतील  चंद्र दिवसभर कशात तरी गुंतवून ठेवेल  आर्थिक बाजु ठीक राहील. दिवस चांगला जाईल. धनु आज धार्मिक कामावर भरपूर खर्च  होईल. प्रकृती कडे जरा लक्ष द्या. आर्थिक व्यय  आणि शारीरिक  शिथिलता असा दिवस शांततेत घालवा. मकर वृश्चिक चंद्र आज काहीतरी लाभ घडवून आणेल. ईश्वरचरणी मन रमेल. संतती संबंधी काही शुभ समाचार मिळतील.अधिकारी व्यक्तीशी भेट होईल. दिवस शुभ आहे. कुंभ आज दशमातील नीच चंद्र शुक्र कार्यक्षेत्रातील काही समस्या समोर आणेल. त्याचे समाधान करण्यात दिवस जाईल. राशीतील गुरू सहकार्य करेल. दिवस बरा जाईल. मीन आज दिवस भाग्याचा असून ईश्वरी उपासना अतिशय शुभ फळ देईल. धार्मिक कार्य घडेल. कौटुंबिक सुख आणि नातेवाईकांच्या भेटी होतील. दिवस चांगला आहे. शुभम भवतु!!
Published by:Meenal Gangurde
First published: