• Home
 • »
 • News
 • »
 • astrology
 • »
 • आजचे राशीभविष्य : कशी असेल यंदा दिवाळीची सुरुवात; जाणून घ्या तुमच्या राशीत आहे काय

आजचे राशीभविष्य : कशी असेल यंदा दिवाळीची सुरुवात; जाणून घ्या तुमच्या राशीत आहे काय

आज सोमवार आज रमा एकादशी. दिनांक 1 नोव्हेंबर 2021. आज चंद्र कन्या राशीत भ्रमण करीत आहे.

 • Share this:
  आज सोमवार आज रमा एकादशी. दिनांक 1 नोव्हेंबर 2021. आज चंद्र कन्या राशीत भ्रमण करीत आहे. आजचे बारा राशींचे भविष्य असे आहे. मेष आज चंद्र  कन्या राशीतून भ्रमण करणार असुन सूर्य तुला राशीत आहे. आज दिवस जरा आळसा मध्ये जाईल. काम काज करण्याची इच्छा नसेल. शरीर शिथिल, मन अशांत.  दिवस घरात, आरामात घालवणे योग्य. वृषभ आजचा दिवस शुभ संकेत देतो आहे. मुले, मुली तुमचा वेळ घेणार आहेत. वाचन लिखाण, छोटे प्रवास संभवतात. दिवस  उत्तम जाईल. आर्थिक घडामोडी घडतील. जपुन व्यवहार करा. मिथुन राशि च्या  व्यय स्थानातील  राहू  व पंचम स्थानात असलेला मंगळ  अश्या कात्रीत सापडले आहात. चंद्र आज चतुर्थ स्थानात भ्रमण करेल. घरासाठी काही खरेदी करणे गरजेचे वाटेल. खर्च करावा लागेल. घरी अत्यावश्यक कामे करा. दिवस बरा आहे. कर्क प्रवास  ,भेटीगाठी, फोन कॉल्स असा हा दिवस  आहे.  भाऊ बहिणी  संपर्क करतील.  मंगळ  स्वभाव तेज करेल.  खर्च बेताने. कामे वाढतील. पण काळजी नको.  जोडीदाराला वेळ  द्या. उपासना करा. सिंह आज पैसा  मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबासाठी श्रम पडतील . प्रकृती सांभाळून दगदग करा. दशमातील राहू  कार्य क्षेत्रात नवीन संधी मिळवून देईल. शुक्र पैसा मिळवुन देईल. कायदा पाळा. कन्या आज राशीतून होणारे  चंद्र भ्रमण शुभ आहे  दोन दिवसा पासून वाटणारी अस्वस्थता कमी होईल .सूर्य अणि शुक्र कार्य क्षेत्रात यश मिळवून देणार हे नक्की. गुरु जप करा. दिवस चांगला आहे  . तुला आज घाई गडबड ना करता शांततेत काम करा. व्यय होऊ शकतो. पैसा, वेळ अथवा आरोग्य जपून असा. कामाच्या ठिकाणी नवीन अडचणी आल्या तरी  घाबरू नका. निवारण होतील. संतती सहकार्य करेल. दिवस मध्यम . वृश्चिक उत्तम लाभ, प्रवास, मित्रमैत्रिणी जमवून छोटा प्रवास असा दिवस आहे. पण सध्या थोडी सावधगिरी बाळगावी लागेल. मंगळ सध्या व्ययस्थानात आहे .प्रकृतीच्या किरकोळ तक्रारी सुरू राहतील. काळजी घ्या . धनु आज भरपुर काम करावे लागेल. लागोपाठ  मीटिंग्स, फोन, भेटी यामुळे  थकून जाल. दिवसाची नीट प्लॅनिंग  करा. कामानिमित्त प्रवास संभवतात. मौल्यवान वस्तु  सांभाळा. दिवस चांगला आहे. मकर दोन दिवसापासुन वाटणारा तणाव आज नक्की कमी  होईल. अडचण आली असली तरी मार्ग सापडेल. जोडीदाराची साथ लाभेल. पण वाद नको. संतती चिंता आता कमी होईल. दिवस  अनुकूल . कुंभ अष्टमात चंद्र, राशी च्या व्यय स्थानात शनी ही ग्रहस्थिती फारशी बरी नाही. जपुन चालावे. सांधे व हाडाची दुखणी डोक वर काढतील  .घरातली काही आवश्यक कामे  करावी लागतील. शनी जप करावा. मीन आज काही खरेदी असेल तर  जोडीने करून घ्यावी. अष्टम  मंगळ आरोग्यचिंता  निर्माण करेल .गुरूची  उपासना, जप  व दान  करीत असावे. हिम्मत  वाढेल. दिवस  शुभ आहे. शुभम भवतु!!
  Published by:Meenal Gangurde
  First published: