Home /News /astrology /

वीकेंड म्हणून बाहेर फिरायला जाण्याचा विचार; आज प्रवास करणं योग्य ठरेल का पाहा तुमचं राशिभविष्य

वीकेंड म्हणून बाहेर फिरायला जाण्याचा विचार; आज प्रवास करणं योग्य ठरेल का पाहा तुमचं राशिभविष्य

आज 30 जुलै, शनिवार. तुमचा आजचा दिवस कसा जाणार पाहा.

आज दिनांक 30 जुलै 2022. वार शनिवार. आज श्रावण शुक्ल द्वितीया. संपत शनिवार अश्वत्थ मारुती पूजन. आज चंद्र कर्क राशीत भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे राशिभविष्य. मेष आर्थिक घडामोडींना वेग येईल. काही कर्ज वगैरे देऊ नका. प्रवास योग येतील मानसिक प्रसन्नता जाणवेल. कार्यालयीन कामकाज सुरळीत राहील.लाभ होतील. दिवस मध्यम. वृषभ आयुष्यात नवीन शुभ घटनांची सुरुवात होईल. रवी, बुध आर्थिक लाभाचे नवीन मार्ग देतील. चंद्र काही नवीन जबाबदारी निर्माण करेल. शांत रहा. दिवस शुभ. मिथुन चंद्र मानसिक ताण निर्माण करेल. आज कुठलाही आर्थिक व्यवहार करू नका. परदेशबाबत शुभ फल मिळेल. दिवस शांततेत घालवा. कर्क आज कौटुंबिक जीवनात काही समस्या निर्माण होऊ शकतात. प्रकृतीची काळजी घ्या. राशी स्थानात रवी बुध कायद्यापासून जपा असे संकेत देत आहे. दिवस शुभ आहे. सिंह राशी स्वामी रवी सध्या नकारात्मक मानसिकता देईल. शरीरात ऊर्जा कमी वाटेल. चंद्र कार्यक्षेत्रात विशेष वर्तमान आणेल. आज दिवस मध्यम जाईल. कन्या लाभात चंद्र असून आज संततीविषयक काही सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. जास्तीची जबाबदारी येईल. धार्मिक क्षेत्रात भरीव कामगिरी होईल. दिवस चांगला. तूळ घरात अशांतता निर्माण होईल असं वागू नका. कलह टाळा. जास्तीचे काम अंगावर घेऊ नका. प्रवास योग येतील. आर्थिकदृष्ट्या दिवस मध्यम आहे. पूजनात दिवस घालवा. वृश्चिक अतिशय धावपळीचा असा हा दिवस असणार आहे. खूप महत्त्वाचे निर्णय, फोनवर संवाद होतील. पण प्रवास टाळा. नुकसान होईल. दिवस बरा आहे. धनु आर्थिक बाबतीत जपून राहण्याचा दिवस आहे. काही व्यवहार असतील तर ते उद्यावर टाका. कुटुंबात काही अडचणी येतील. दिवस मध्यम. मकर वक्री शनी, सप्तम चंद्र आहे, दिवस जरा मध्यम जाईल. मन काहीसं उदास राहिल. जोडीदाराची मदत घ्या. संततीला जपा. दिवस संथ आहे. कुंभ व्यय स्थानात झालेली शनी ग्रहाची वक्री स्थिती आर्थिक आणि शारीरिक कष्ट दाखवत आहे. षष्ठ चंद्र आहे. द्वितीय गुरू परिस्थितीवर नियंत्रण ठेवेल. दिवस मध्यम आहे. मीन आज दिवस नातेवाईकांना भेट, संपर्क करण्याचा आहे. काहीशी हुरहूर जाणवत असली तरी शांत रहा. कोणी अधिकारी व्यक्ती भेटेल. प्रवास टाळा. दिवस शुभ. शुभम भवतू!!
Published by:Priya Lad
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या