मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

आला श्रावण आला! तुमचा महिन्याचा पहिलाच दिवस कसा जाणार पाहा राशिभविष्य

आला श्रावण आला! तुमचा महिन्याचा पहिलाच दिवस कसा जाणार पाहा राशिभविष्य

आज श्रावण शुक्ल प्रतिपदा. राशीनुसार पाहा तुमचं आजच्या दिवसाचं राशिभविष्य.

आज श्रावण शुक्ल प्रतिपदा. राशीनुसार पाहा तुमचं आजच्या दिवसाचं राशिभविष्य.

आज श्रावण शुक्ल प्रतिपदा. राशीनुसार पाहा तुमचं आजच्या दिवसाचं राशिभविष्य.

आज दिनांक 29 जुलै 2022. वार शुक्रवार. आज श्रावण शुक्ल प्रतिपदा. आज जरा जीवंतिका पूजन केलं जाते. आज चंद्र दिवसभर कर्क राशीत आहे. पाहूया आजचे राशी भविष्य.

मेष

राशीच्या चतुर्थ स्थानात आलेला चंद्र अनेक इच्छा आकांक्षा जागृत करेल. गृहसौख्य मिळेल. मेहनत करून यश प्राप्त होईल. शुक्र आज खरेदीचे योग आणणार आहे. बरा दिवस.

वृषभ

राशीच्या व्यय स्थानात आलेला मंगळ राहू कष्ट देणारा असून अनेक खर्च आणि अडचणी देईल. व्यवसायात अनेक लाभ होतील. प्रवास योग येतील. दिवस उत्तम .

मिथुन

गुरू दशम स्थानातअसून मन कार्य करण्यास उत्सुक होईल. प्रवास, भेटीगाठी होतील. संततीसाठी आर्थिक व्यय होण्याचे संकेत आहेत. प्रकृती जपा. दिवस मध्यम.

कर्क

सप्तम स्थानात वक्री शनी सावध राहा असे संकेत देत आहे. चंद्र आज राशी स्थानात असून घरात शुभ घटना घडतील. दिवस उत्तम आहे.

सिंह

राशीच्या व्यक्तींचा जोडीदारासोबत मतभेद होण्याचे संकेत आहेत. जपून रहा. मित्रमंडळीपासून अनेक लाभ होतील. संपर्क, प्रवास होतील. दिवस मध्यम.

कन्या

सहावा शनी आणि लाभ चंद्र एकूण शुभ फळ देण्यास सज्ज आहे.आर्थिक लाभ, कार्यक्षेत्रात भरपूर संधी मिळतील. विजय तुमचाच होईल. दिवस शुभ.

तूळ

आज दिवस शुभ असून भाग्य उदय होईल. अचानक कुठून तरी चांगली बातमी मिळेल . उच्च शिक्षण आणि संतती साठी शुभ दिवस आहे.

वृश्चिक

आज दिवस अतिशय आनंदी राहण्याचा आहे.गृह सौख्य, जोडीदार संतती या बाबत शुभ फळ देईल. प्रकृतीची काळजी घ्या. दिवस चांगला आहे.

धनु

द्वितीय स्थानात वक्री शनि कुटुंबात मतभेद घडवून आणेल.लांबचे प्रवास योग येतील .माहिती मिळेल. साहसी आणि कठोर स्वभाव होईल.जोडीदार सोबत दिवस घालवा.

मकर

आता जरा शांतता आणि स्थैर्य मिळेल. मंगळ मेष राशीत राहूसोबत असून आर्थिक ताण राहील.आणि कौटुंबिक कलह होतील.वैवाहिक सुख मिळेल. दिवस मध्यम.

कुंभ

व्यय स्थान मध्ये वक्री शनि आहे. अचानक स्वभावात तेज येईल. कार्य करण्याची इच्छा होईल . चंद्र धार्मिक कार्य घडवून आणेल . आर्थिक घडामोडी होतील. दिवस उत्तम आहे.

मीन

व्यय स्थानात शनि आणि पंचम चंद्र अशी ग्रहस्थिती खर्च आणि संतान कष्ट दाखवत आहे.आज घरात शांत रहा. जास्तीची काम येतील .दिवस मध्यम.

शुभम भवतू!!

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs