Home /News /astrology /

दैनंदिन राशिभविष्य : आज श्रावणी शनिवारी या राशींना घडणार देवदर्शन

दैनंदिन राशिभविष्य : आज श्रावणी शनिवारी या राशींना घडणार देवदर्शन

आज श्रावण शुक्ल नवमी. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

आज दिनांक 06 ऑगस्ट शनिवार. आज श्रावण शुक्ल नवमी. चंद्र आज तूळ राशीत भ्रमण करेल. तिथून तो केतुशी युती करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष आज सप्तम चंद्र धार्मिक कामासाठी जोडीदारासोबत प्रवास योग घडवून आणेल. शुभ गुरूचे गोचर आनंद देईल. आर्थिक लाभ संभवतो. कौटुंबिक समारंभ होतील. दिवस शुभ. वृषभ आज षष्ठ स्थानातील चंद्र कुटुंबासाठी काही विशेष घडामोडी, आनंद आणि गृहसौख्य देईल. धार्मिक समारंभात भाग घ्याल. सामाजिक जीवनात प्रतिष्ठा लाभेल. उत्तम दिवस. मिथुन राशीच्या पंचम स्थानातील चंद्र राहुशी विशेष योग करत आहे. उच्च प्रतीचे अध्यात्मिक, गूढ अनुभव येतील. घरात भरपूर वेळ घालवाल. प्रकृती जपा. दिवस चांगला जाईल. कर्क तृतीय /चतुर्थ स्थानात चंद्र काही अध्यात्मिक अनुभव देतील. आर्थिक बाजू उत्तम राहिल. मन स्थिर होईल. मित्र मंडळ भेटेल. प्रकृती उत्तम राहिल. दिवस मजेत जाईल. सिंह आज चंद्र राहू प्रतीयोग आहे. आर्थिक लाभ झाल्यामुळे आनंदी राहाल. तसंच कुटुंबसुख लाभेल. प्रकृती नाजूक राहिल. जोडीदाराला वेळ द्या. प्रवास घडेल. दिवस शुभ. कन्या आज चंद्र द्वितीय स्थानात आहे. तुमच्यावर कुटुंबाच्या बाबत निर्णय घेण्याची वेळ येईल. सामाजिक जीवनात प्रसिद्धीच्या झोतात याल. गुरू जोडीदाराची मदत करेल. दिवस शुभ. तूळ आज राशीतील चंद्र केतू उच्च अध्यात्मिक फळ देण्यास सज्ज आहे. गृह आणि धार्मिक क्षेत्रात चांगला लाभ मिळेल. प्रकृती ठिक राहिल. खर्च होतील. दिवस शुभ. वृश्चिक आज घरात आनंदात राहण्याचा दिवस. चंद्र प्रकृतीसंबंधी अनिष्ट फळ देईल. घरामध्ये काही विशेष घटना घडतील. प्रवास योग येतील. दिवस मध्यम. धनु आज जीवनातील एक चांगला दिवस आहे. कार्यक्षेत्रात देखील चांगला अनुभव देईल. अचानक आर्थिक लाभ होतील. गुरू घरामध्ये शुभ फळ देईल. दिवस आनंदात जाईल. मकर शनी राशी स्थानात आहे. काही प्रकृतीचे त्रास, आर्थिक चिंता निर्माण होईल. कुटुंबाकडे लक्ष द्या. कार्यालयीन कामकाज वाढेल. नातेवाईक भेट संभवते. मध्यम दिवस. कुंभ चंद्र राहू प्रतीयोग आज सांभाळून दिवस घालवा असं सुचवत आहे. संततीकडे लक्ष द्या. खर्च टाळा. धार्मिक स्थानाला भेट देण्याचे योग. दिवस शुभ. मीन आज चंद्र आर्थिकदृष्ट्या घडामोडी घडवेल. घरामध्ये काही त्रासदायक घटना घडतील. प्रकृती जपा. धार्मिक स्थानाचा प्रवास होईल. दिवस शुभ आहे. शुभम भवतू!!
Published by:Priya Lad
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या