मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

दैनंदिन राशिभविष्य : देवीच्या आशीर्वादासह भाग्याचीही साथ; आज आर्थिक लाभ होणार

दैनंदिन राशिभविष्य : देवीच्या आशीर्वादासह भाग्याचीही साथ; आज आर्थिक लाभ होणार

राशिभविष्य.

राशिभविष्य.

आज आदिमायेचे स्कंदमाता या स्वरूपात पूजन केले जाईल. गुरू-चंद्र शुभ योग होईल. पाहुया आजचे बारा राशींचे भविष्य.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

आज दिनांक 30 सप्टेंबर 2022 शुक्रवार. तिथी आश्विन शुक्ल पंचमी. ललिता पंचमी. आज आदिमायेचे स्कंदमाता या स्वरूपात पूजन केलं जाईल. ही कार्तिकेय माता आहे. ज्ञान रुपिणी आहे. आज चंद्र वृश्चिक राशीतून भ्रमण करेल. अनुराधा नक्षत्रावर ललिता पंचमी व्रत आहे. गुरू चंद्र शुभ योग होईल. पाहुया आजचे बारा राशींचे भविष्य.

मेष

सध्या मानसन्मानात वाढ, आर्थिक लाभ कार्यक्षेत्रात संधी असा काळ आहे. मात्र आज भाग्य तुमच्या सोबत राहणार नाही. खर्च होईल. प्रकृती अस्वास्थ्य जाणवेल. मध्यम दिवस .

वृषभ

आज सप्तम स्थानात चंद्र भ्रमण आहे. तुम्हाला घरगुती जीवनात अनेक नवीन प्रस्ताव येतील. कार्यक्षेत्रात लाभ होईल. नातेवाईक भेट असा हा दिवस आहे. प्रकृती आणि मन स्वास्थ्य सांभाळा.

मिथुन

आज व्यवसाय आणि कुटुंबीय ही तुमची प्राथमिकता असेल. आनंददायी खरेदी, प्रवास काही घरासाठी विशेष वस्तू तुम्ही खरेदी कराल. प्रकृती जपा. दिवस शुभ.

कर्क

दिवस काही महत्त्वाचे व्यवहार घडवून आणेल. घरात विशेष काम निघेल. मात्र त्यात अडचणी येतील. खर्च झाला तरी प्राप्ती होईल. संतती, महत्त्वाचे संपर्क होतील. मध्यम दिवस आहे.

सिंह

आज कुठूनतरी सामाजिक कार्यक्रमात भाग घेण्याचे योग येतील. संततीचे सुख चांगले असून, शेजाऱ्यांशी सांभाळून वागा. कामात वाढ होईल. आर्थिक गणित जुळून येतील. दिवस शुभ आहे.

कन्या

घरामध्ये किंवा सामाजिक जीवनात यश मिळेल. शांत रहा. तुमचा हेवा वाटणारे लोक फायदा घेतील. प्रवासात लाभ संभवतात. वैवाहिक सुख मिळेल. दिवस उत्तम.

तूळ

चंद्राचे धन स्थानातून भ्रमण आणि सप्तम राहू आज जपून राहण्याचे संकेत देत आहे. आर्थिकदृष्ट्या दिवस चांगला असेल. काही अचानक खर्च होईल. दिवस मध्यम.

वृश्चिक

मंगळ घरामध्ये काही तरी ताण निर्माण करेल. सूर्य दशम स्थानात असून अधिकार देणारा आहे. तेज वाढेल. आर्थिक लाभ होतील. राशीतील चंद्र मनःशांती देईल. दिवस शुभ.

धनु

आज घरातील महत्त्वाच्या घडामोडींकडे लक्ष असू द्या. तुमचे विरोधक सध्या बलवान आहेत. कुठेतरी अडकण्याची शक्यता आहे. मात्र नवीन संधी मिळेल. दिवस शुभ.

मकर

आज दिवस शुभ असून भाग्य जोरात आहे. राहू आरोग्य समस्या निर्माण करील. घरामध्ये अधिकार गाजवाल. आर्थिक लाभ होईल. प्रवास योग येतील. दिवस शुभ .

कुंभ

दिवस आनंददायक आहे. शांत रहा. होणाऱ्या खर्चाला आवर घाला. घराकडे लक्ष द्यावं लागेल. संतती सुख मिळेल कुटुंब सुख लाभेल. दिवस मध्यम.

मीन

व्यवसाय आणि नोकरी करणाऱ्या व्यक्तींना शुभ लाभ मिळतील. वैवाहिक सुख मिळेल. सध्या गुरू शुक्र शुभ असल्याने काही तरी धार्मिक कार्यक्रम कराल. दिवस चांगला.

शुभम भवतू!!

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs