मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

दैनंदिन राशिभविष्य : नवरात्रीची दुसरी माळ; आजचा तुमचा दिवस कसा जाणार?

दैनंदिन राशिभविष्य : नवरात्रीची दुसरी माळ; आजचा तुमचा दिवस कसा जाणार?

राशिभविष्य.

राशिभविष्य.

आज आश्विन शुक्ल द्वितीया. आज दुसरी माळ. माता ब्रह्मचारिणी या रूपात आज देवीची पूजा. आजचे राशी भविष्य कसं असेल?

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

आज दिनांक 27 सप्टेंबर 2022. वार, मंगळवार. आज आश्विन शुक्ल द्वितीया. विश्वव्यापक जननी आदिमायेचे नवरात्र सुरू झाले आहे. आज दुसरी माळ. माता ब्रह्मचारिणी या रूपात आज देवीची पूजा केल्या जाईल. चंद्र आज दिवसभर चित्रा नक्षत्रात आहे. गुरू चंद्र प्रतीयोग आहे. पाहूया आजचे राशी भविष्य.

मेष

राशीच्या षष्ठ स्थानात आलेला चंद्र अनेक इच्छा आकांक्षा पूर्ण करेल. गृहसौख्य मिळेल. मेहनत करून यश प्राप्त होईल. शुक्र आज सुंदर खरेदीचे योग आणणार आहे. बरा दिवस.

वृषभ

राशी स्थानात आलेला मंगळ कष्ट देणारा असून अनेक खर्च आणि अडचणी देईल. स्वभावात उग्रता येईल. व्यवसायात अनेक लाभ होतील. संतती सुख मिळेल. दिवस उत्तम .

मिथुन

गुरू दशम स्थानातअसून मन कार्य करण्यास उत्सुक होईल. प्रवास, भेटीगाठी होतील. चंद्र चतुर्थ स्थानात आहे. घरामध्ये काम वाढेल. आर्थिक व्यय होण्याचे संकेत आहेत. प्रकृती जपा. दिवस मध्यम.

कर्क

सप्तम स्थानात शनी जपून राहा असे संकेत देत आहे. चंद्र आज तृतीय स्थानात असून घरात शुभ घटना घडतील. धार्मिक कार्यक्रमात भाग घ्याल. दिवस उत्तम आहे.

सिंह

राशीच्या व्यक्तींचा जोडीदारासोबत कलह होण्याचे संकेत आहेत. जपून रहा. मित्र मंडळीपासून अनेक लाभ होतील. प्रकृती जपा. रवी बुध अधिकार प्राप्ती करून देतील. दिवस आर्थिक बाबतीत उत्तम.

कन्या

पंचम शनी आणि राशीतील चंद्र एकूण शुभ फळ देण्यास सज्ज आहे. आर्थिक लाभ, कार्यक्षेत्रात भरपूर संधी मिळतील. विजय तुमचाच होईल. डोळ्यांची काळजी घ्या. दिवस शुभ.

तूळ

आज दिवस मध्यम असून भाग्य साथ देईल. अचानक कुठून तरी चांगली बातमी मिळेल. खर्च होईल. उच्च शिक्षण आणि संततीसाठी शुभ दिवस आहे.

वृश्चिक

आज दिवस अतिशय आनंदी राहण्याचा आहे. गृह सौख्य, जोडीदार, संतती याबाबत शुभ फळ देईल. लाभ चंद्र मित्र भेट घडवेल. प्रकृतीची काळजी घ्या. दिवस चांगला आहे.

धनु

द्वितीय स्थानात वक्री शनी कुटुंबात मतभेद घडवून आणेल. लांबचे प्रवास योग येतील. माहिती मिळेल. साहसी आणि कठोर स्वभाव होईल. शांततेत दिवस घालवा.

मकर

आता जरा शांतता आणि स्थैर्य मिळेल. मंगळ वृषभ राशीत असून संतती चिंता राहिल. कौटुंबिक समारंभ होतील. वैवाहिक सुख मिळेल. भावंडं भेट होईल. दिवस उत्तम.

कुंभ

व्यय स्थानामध्ये वक्री शनी आहे. अचानक स्वभावात बदल होईल. प्रवास योग येतील. कार्य करण्याची इच्छा होईल. रवी बुध कार्य घडवून आणेल. आर्थिक घडामोडी होतील. दिवस मध्यम आहे.

मीन

सप्तम स्थानात चंद्र आणि राशीतील गुरू अशी ग्रहस्थिती लाभ आणि वैवाहिक सुख दाखवत आहे. आज घरात शांत रहा. जास्तीची काम येतील. आर्थिक लाभ होतील. दिवस उत्तम.

शुभम भवतू!!

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs