मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

दैनंदिन राशिभविष्य : आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता; या राशींनी आज प्रकृतीला जपा

दैनंदिन राशिभविष्य : आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता; या राशींनी आज प्रकृतीला जपा

आज चंद्र कर्क राशीतून भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

आज चंद्र कर्क राशीतून भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

आज चंद्र कर्क राशीतून भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

  • Published by:  Priya Lad
आज दिनांक 22 सप्टेंबर 2022 वार. गुरूवार. आज भाद्रपद कृष्ण द्वादशी. आज चंद्र कर्क राशीतून भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष आज चतुर्थ स्थानातील चंद्र भ्रमण बरे असून काही ताण असेल तर विचलित होऊ नका. राहू धार्मिक आस्था निर्माण करील. वैवाहिक जीवन सुखद, आनंदी राहिल. घरात जास्तीची कामं निघतील. दिवस शुभ. वृषभ राशीच्या तृतीय स्थानातील चंद्र आज व्यावसायिक लाभ देईल. प्रकृती ठिक राहिल. भाग्य स्थानातील शनी अनुकूल असून व्यय राहू अनाठायी खर्च देईल. प्रवास सुखकर राहिल. शुभ दिवस. मिथुन आज द्वितीय स्थानातील चंद्र संतती आणि सामाजिक जीवनात शुभ आहे. खर्च होतील. प्रकृतीची काळजी घ्या असं ग्रह सुचवत आहे. दिवस चांगला जाईल. कर्क चंद्र आज गृह क्षेत्रात विशेष घडामोडी घडवून आणेल. आर्थिक लाभ संभवतो. दिवस शुभ. सिंह आज दिवस अनेक घटना घडवणारा आहे. आज मन आनंदी राहिल. भावंडं भेट होईल. दिवस आर्थिक उलाढाल घडवेल. शत्रू नाश होतील प्रवास घडतील. दिवस उत्तम. कन्या आज दिवस उत्तम असून प्रकृती ठिक असेल. घरामध्ये भरपूर काम कराल. नातेवाईक भेट होईल. आर्थिक प्राप्तीचे योग येतील. संततीची काळजी घ्या. दिवस ठिक आहे. तूळ दशम स्थानात चंद्र व्यावसायिक जीवनात आनंद निर्माण करेल. महत्त्वाची खरेदी कराल. आर्थिकदृष्ट्या कष्ट. घरात काही विशेष घटना घडतील. दिवस मध्यम आहे. वृश्चिक चंद्र भ्रमण प्रकृतीच्या तक्रारी निर्माण करेल. आर्थिक घडामोडी, अध्यात्मिक व्यक्तींची भेट घडवून आणेल. स्वतःवर वेळ आणि पैसा खर्च कराल. अनपेक्षित अडचणी येतील. दिवस मध्यम. धनु चंद्र भ्रमण आज कौटुंबिक जीवनात कलह देईल. कार्यक्षेत्रात मंगळ मतभेद करील. अष्टम चंद्र प्रकृती जप असे संकेत देत आहे. दिवस मध्यम. मकर राशीसमोरील स्थानातील चंद्र भ्रमण व्यवसाय, कार्यक्षेत्रात अनपेक्षित काम आणेल. त्यात तुम्ही अडकून जाल. राहू खर्चाचे नवीन मार्ग तयार करील. तसंच प्रप्तीही वाढेल. दिवस चांगला आहे. कुंभ चंद्र षष्ठ स्थानात आहे. शनी व्यय स्थानात खर्चाचे मार्ग निर्माण होतील. मात्र आर्थिक लाभ देखील मिळतील. भाग्यदायक योग येतील. दिवस उत्तम जाईल. मीन कौटुंबिक ताण देणारा हा दिवस आहे. समारंभ होईल. पण थोडे तणाव पूर्ण वातावरण राहिल. वैवाहिक जीवन कष्टदायक राहिल. प्रकृती जपा. दिवस मध्यम आहे. शुभम भवतू!!
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या