मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

दैनंदिन राशिभविष्य : आर्थिक लाभासोबत समस्याही उद्भवतील; 'या' राशीने तर सावधच राहावं

दैनंदिन राशिभविष्य : आर्थिक लाभासोबत समस्याही उद्भवतील; 'या' राशीने तर सावधच राहावं

फोटो सौजन्य - Canva

फोटो सौजन्य - Canva

आर्थिक लाभासोबत तुमच्या राशीत नेमकं काय आहे पाहा आजचं राशिभविष्य.

आज दिनांक 21 सप्टेंबर 2022. वार बुधवार. तिथी भाद्रपद कृष्ण एकादशी आज चंद्राचे भ्रमण कर्क राशीतून होईल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष वैवाहिक जीवन थोडे तणाव पूर्ण राहिल. दिवसाचा काही काळ हा चिंतनात घालवाल. राशीतील राहू मानसिक अस्वास्थ्य देईल. आर्थिक आणि व्यवसाय वृद्धी संभवते. दिवस चांगला जाईल. वृषभ आर्थिक बाबतीतली गणित योग्य ठरतील. काही निर्णय घेण्याची गरज पडेल. घरामध्ये कामाची जबाबदारी वाटेल. काळजी घ्या. गजाननाच्या कृपेने दिवस चांगला आहे. मिथुन चंद्राचे भ्रमण कामाच्या ठिकाणी भरपूर लाभ देईल. कार्यक्षेत्रात भरपूर काम राहिल. आर्थिक लाभ होतील. संतती आनंदी राहिल. दिवस शुभ. कर्क आज राशीत येणारा चंद्र आनंदाची नवीन चाहूल देईल. मन आश्वस्त होईल. राशीच्या धन स्थानातील शुक्र आर्थिक लाभ देईल. प्रकृती सांभाळा. दिवस उत्तम. सिंह व्यय चंद्र आणि शष्ठ शनी मानसिक आंदोलनं दाखवत आहे.  शत्रू डोकं वर काढेल. मात्र तुम्ही शांत रहा. विजय तुमचाच होईल. दिवस मध्यम आहे. कन्या आज तुमच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तीला काहीतरी त्रास होतील. मित्र भेट संभवते. लाभाचे योग. व्यावसायिक दृष्ट्या कठीण दिवस. प्रकृती बरी राहील. दिवस उत्तम. तूळ  काही लाभ घेऊनच आजचा दिवस उगवेल. जास्तीचे काम करण्याचा, प्रवास, भेटीगाठीचा दिवस आहे. धार्मिक स्थळांना भेट द्यावी अशी इच्छा होईल. दिवस शुभ. वृश्चिक दिवस आज आनंदात घालवण्याचा आहे. आर्थिक लाभ संभवतात. मात्र जोडीदाराची काळजी घ्या. सहजीवन संथ राहिल. प्रवास टाळा. दिवस मध्यम आहे. धनु आज चंद्र कौटुंबिक सुखामध्ये अडचण निर्माण करेल. मानसिक ताण राहिल. संततीकडे लक्ष द्या कामाची गडबड राहिल. दिवस काही विशेष अनुभव देईल. मकर घरात काही अडचण असेल तर मदत करावी लागेल. कार्यालयात जास्तीचे काम येईल. प्रकृतीकडे लक्ष द्यावं लागेल. आर्थिक लाभ होतील. तसंच हितशत्रूपासून सावध राहा. दिवस शुभ. कुंभ कुटुंबीयसोबत आनंदाने घालवण्याचा दिवस आहे. शैक्षणिक क्षेत्रात भरघोस यश देईल. वाचनात मन रमेल. भाग्यकारक गुरू यशाचा मार्ग दाखवेल. दिवस शुभ. मीन आज कार्यालयीन जास्तीची काम पार पाडून तुम्ही थकून जाल. प्रवास योग आहेत. आर्थिक लाभ, काही खरेदी असा हा दिवस आहे. आईवडील खुश असतील. संततीला वेळ द्यावा लागेल. दिवस मध्यम. शुभम भवतू!!
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या