मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

दैनंदिन राशिभविष्य : मंगळागौरीची कृपाच; आर्थिक लाभ होणार, शुभ घटना घडणार

दैनंदिन राशिभविष्य : मंगळागौरीची कृपाच; आर्थिक लाभ होणार, शुभ घटना घडणार

आज श्रावण शुक्ल द्वादशी. आजचे बारा राशींचे भविष्य.

आज श्रावण शुक्ल द्वादशी. आजचे बारा राशींचे भविष्य.

आज श्रावण शुक्ल द्वादशी. आजचे बारा राशींचे भविष्य.

आज दिनांक 09 ऑगस्ट 2022, वार मंगळवार. श्रावण शुक्ल द्वादशी. आज चंद्र धनु राशीतून भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष राशीतील राहू-मंगळ जोडीदाराची चिंता वाढवेल. चंद्र आज भाग्यस्थानात आहे. शुभ घटना घडतील. दिवस आनंदात जाईल. शारीरिक, मानसिक ताण घेऊ नका. दिवस उत्तम. वृषभ आज अष्टम चंद्राचे भ्रमण मध्यम फळ देईल. कुटुंबात महत्त्वाचे निर्णय होतील. आर्थिक लाभ होतील. व्यय राहू सावधगिरीचा इशारा देत आहे. बंधुभेट होईल. दिवस शुभ आहे. मिथुन राशी स्वामी बुध कर्क राशीत सूर्यासोबत आहे. सरकारी काम, लिखाण यात यश मिळेल. शुक्राचे धनस्थानातील भ्रमण आर्थिक लाभ घडवेल. शुभकार्य होतील. दिवस चांगला. कर्क आज षष्ठ स्थानात चंद्र असून काही संकेत मिळतील. भाग्यस्थानात गुरू धार्मिक आस्था वाढवेल. सप्तम शनी जपून रहा असं सुचवत आहे. खंबीर रहा. दिवस मध्यम आहे. सिंह आज चंद्र भ्रमण पंचम स्थानात असून प्रकृती नाजूक राहिल. मन थोडे चिंतित राहिल. पण काळजी नको. गुरूची उपासना करत रहा. लवकरच शुभ घटना घडणार आहेत. दिवस चांगला. कन्या आज दिवस कार्यालयीन जीवनात काही विशेष घडेल असा आहे. दोघं मिळून खरेदी कराल. हाताने शुभ काम होईल. आर्थिक लाभ होतील. दिवस उत्तम. तूळ चंद्राचे भ्रमण तृतीय स्थानात आहे. खूप काम येईल असे संकेत आहेत. कुटुंबाशी मतभेद होऊ शकतात. आर्थिक व्यवहार होतील. भावंडांचे सुख लाभेल. शांततेत दिवस घालवा. वृश्चिक काही आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मन आनंदी राहिल. आर्थिक लाभ होईल पण खर्च जपून करा. घर ही तुमची प्राथमिकता राहिल. दिवस उत्तम आहे. धनु आज दिवस घरातल्या विशेष कामांसाठी खर्च होईल. काही जबाबदाऱ्या येतील तरी चांगला दिवस आहे. आर्थिकदृष्ट्या उत्तम दिवस. प्रवास होतील. दिवस शुभ. मकर शनी तुम्हाला नैराश्याला समोर जायला लावेल. खर्चाचे, सामाजिक जबाबदारी घेण्याचे योग आणेल. व्यय चंद्र खर्च करायला भाग पाडेल. दिवस शुभ. कुंभ आज आर्थिक घडामोडीचा दिवस आहे. अचानक होणारे लाभ प्रसन्न करतील. कायदा मोडू नका. अन्यथा कारवाईला समोर जावे लागेल. दिवस शुभ. मीन राशीच्या दशम स्थानातील चंद्र भरपूर काम देईल. जास्तीचे खर्च करावे लागतील. भटकंतीचे योग येतील. घरात पाहुणे येण्याची शक्यता आहे. प्रकृती नरम राहिल. दिवस मध्यम आहे. शुभम भवतू!!
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या