मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

दैनंदिन राशिभविष्य : 'या' राशीचं स्वतःच्या गाडीचं स्वप्नं साकार होणार; आज वाहन खरेदीचा योग

दैनंदिन राशिभविष्य : 'या' राशीचं स्वतःच्या गाडीचं स्वप्नं साकार होणार; आज वाहन खरेदीचा योग

राशिभविष्य.

राशिभविष्य.

आज चंद्र सकाळी 8 नंतर कुंभ राशीत प्रवेश करेल. पाहूया आजचे राशी भविष्य.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

आज दिनांक 06 ऑक्टोबर 2022. वार गुरूवार. आश्विन शुक्ल एकादशी. आज चंद्र सकाळी 8 नंतर कुंभ राशीत प्रवेश करेल. पाहूया आजचे राशी भविष्य.

मेष

राशीच्या षष्ठ स्थानातील ग्रहांची उपस्थिती प्रकृतीची काळजी घ्या असं सुचवत आहे. आर्थिक व्यवहार जपून करा. दिवस शुभ.

वृषभ

घरामध्ये विशेष घटना घडतील. नवीन वाहन खरेदीचे योग आहेत. कार्यालयीन कामकाज सुरळीत राहिल. जबाबदारी वाढेल. दिवस शुभ आहे.

मिथुन

अष्टम चंद्राच्या त्रासातून आता मोकळीक मिळेल. भाग्यदायक घटना घडतील. नवीन वास्तू, वाहन सुख मिळेल. चंद्र धार्मिक बाबतीत रुची निर्माण करेल. दिवस शुभ.

कर्क

अष्टम चंद्र आणि राशीसमोरील शनी धोक्याची सूचना देत आहे. मानसिकदृष्ट्या नैराश्य देणारा दिवस आहे. प्रकृती जपा. शांत राहून ईश्वराची उपासना करा. दिवस मध्यम आहे.

सिंह

धन स्थानातील ग्रहांची गर्दी आर्थिक घडामोडींची सूचक आहे. कुटुंबात विशेष खरेदी होईल. संतती आनंदी राहिल. सणाचे दिवस चांगले पार पडतील.

कन्या

राशीतील ग्रहांचे आधिक्य मानसिक शांती आणि सामाजिक जीवनात यश मिळवून देतील. षष्ठ चंद्र आहे प्रकृतीकडे लक्ष द्या. जास्त दगदग करू नका. दिवस बरा.

तूळ

अष्टम मंगल आणि राशीतील केतू षडाष्टक करत आहेत. एक प्रकारच्या मानसिक वैराग्याची अनुभूती येईल. संतती आनंदी राहिल. दिवस शुभ.

वृश्चिक

चतुर्थ चंद्र कुटुंब आणि मित्र मंडळींशी गाठभेट घडवून आणेल. षष्ठ स्थानातील राहू प्रकृतिविषयी चिंता देईल. जोडीदाराशी मतभेद होतील. घरात दिवस शांततेत घालवा.

धनु

आज कुंभ चंद्र प्रवासाचे योग आणेल. भावंडांशी गाठभेट होईल. संपर्क आणि सामाजिक जीवनात यश मिळेल. षष्ठ स्थानातील मंगळ शत्रूंचा बीमोड करेल. दिवस शुभ आहे .

मकर

राशीच्या धन स्थानात चंद्र आर्थिक भरभराट करेल. शनी मानसिक ताण निर्माण करेल. भाग्य स्थानातील शुक्र नवीन संधी मिळवून देईल. दिवस उत्तम.

कुंभ

राशीतील चंद्र आणि व्यय शनी जपून राहण्याचे संकेत देत आहे. अष्टमातील ग्रहांचे आधिक्य प्रवास आणि प्रकृती अस्वास्थ्य असे फळ देईल.

मीन

व्यय स्थानातील चंद्र आणि सप्तम शुक्र जोडीदारासाठी खरेदी विशेष खर्च दाखवत आहे. जपून रहा. राशीतील गुरू एक प्रकारची अध्यात्मिक बैठक देईल. दिवस उत्तम आहे.

शुभम भवतू !!

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs