• Home
  • »
  • News
  • »
  • astrology
  • »
  • राशीभविष्य : कर्कला जोडीदार-भागीदाराची नाराजी करावी लागेल सहन, पाहा तुमचा दिवस कसा जाईल?

राशीभविष्य : कर्कला जोडीदार-भागीदाराची नाराजी करावी लागेल सहन, पाहा तुमचा दिवस कसा जाईल?

Rashibhavishya : आजपासून आपण रोज एका ग्रहा बद्दल जाणून घेणार आहोत.

  • Share this:
आज सोमवार दिनांक 28 जून 2021. तिथी ज्येष्ठ कृष्ण पंचमी. आज चंद्र दुपार पर्यंत मकर राशीतून भ्रमण करणार आहे. आजपासून आपण रोज एका ग्रहा बद्दल जाणून घेणार आहोत. ग्रहमाला नवग्रह युक्त असून त्यात सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतू, याव्यतिरिक्त प्लुटो नेपच्यून अणि हर्षल हे ग्रह असतात. ग्रहमालेतील  सर्वात महत्त्वाचा अणि मोठा ग्रह म्हणजे सूर्य. सर्व ग्रह हे सूर्याभोवती फिरत असतात. सूर्य स्वतः रोज एक अंशाने पुढे जातो. साधारण 30 दिवस एका राशीत राहतो. सूर्य म्हणजे आत्मा. सूर्य म्हणजे बळ. सूर्याचे स्वामित्व चराचरा वर असते.  मेष राशीत उच्च असून तुला राशीत सूर्य नीच होतो. सिंह ही   सूर्याची मूल त्रिकोण राशी आहे .कुंडलीत  सूर्य  वडील, करियर, डोळे  व हृदय  याचा  कारक आहे. ज्या व्यक्तीचा  सूर्य  नीच राशीत असतो  त्यांना वरील गोष्टीच्या  बाबत त्रास  असू शकतो.  पत्रिकेत उच्च रवी असलेले लोक मोठे अधिकारी, उच्च अभिरुची, तेजस्वी,उत्तम आरोग्य  लाभलेले असतात. प्रत्येकानेच रवी उपासना करावी. सूर्य मंत्र  =ओम घृणि  सुर्याय नम: . सूर्याचा  रंग केशरी असून  1 अंकावर  त्याचे  स्वामित्व आहे. कृत्तिका, उत्तरा फाल्गुनी व उत्तराषाढा या नक्षत्रांचा स्वामी  सूर्य आहे. माणिक हे सूर्याचे रत्न आहे . हे आहे बारा राशींचे राशी भविष्य .. मेष आज तुम्हाला मनोधैर्य राखून दिवस पार करायचा आहे. काम कितीही जास्त पडले तरी काटेकोर पणे करा. चूक महागात पडू शकते. घरात अजिबात कलह होऊ देऊ नका. दिवस मध्यम आहे . वृषभ भाग्यस्थानात शनि चंद्र आहे.धार्मिक कामात मन रमेल. शनि राहू नव पंचम योगात असून प्रभाव पाडतील. काही नवीन ओळखी  होतील. दिवस चांगला आहे. मिथुन जरा जपून राहाण्याचा काल आहे. अति दगदग टाळा. डोळ्याचे विकार संभवतात. खूप काळजीपूर्वक वाहन चालवा. आर्थिक गुंतवणूक तर सध्या टाळाच. दिवस मध्यम. कर्क तुमचा व्यवसायातील भागीदार आणि जोडीदार दोघेही नाराज होऊ शकतात. त्यांना महत्व द्या. त्यांच्या मागण्या पूर्ण करा. मात्र काही निर्णय होऊ शकतील. चिकाटीने प्रयत्‍न करा. दिवस बरा  आहे. सिंह शत्रू डोक वर काढतील. कधी आपले मन  हेच  आपले  शत्रू  बनते. मन खंबीर ठेवा. कर्ज देणे अथवा  घेणे  टाळा. विजय तुमचाच आहे. राशी स्वामी सूर्य चांगली  संधी  मिळवुन देईल. मध्यम दिवस. कन्या पुत्र चिंता,  शिक्षणात अडथळे, असा आजचा  दिवस आहे  आर्थिक व्यवहार जपून. कामाच्या ठिकाणी  मात्र  कन्या व्यक्ति ख्याती प्राप्त करतील. दिवस  चांगला आहे. तुला दैनंदिन कामे रोज पेक्षा जास्त वेळ घेतील  कष्ट होतील. घरी देखील कामाचा ताण वाढेल. पण मन स्थिर  राहील. नवीन खरेदीच्या योजना मनात सतत सुरू आहेत. जरा सावकाश चला. दिवस उत्तम. वृश्चिक आज स्वभाव रागीट बनू देऊ नका .कोणालाही टाकुन बोलणे  किंवा  लिहिणे टाळा. कडक शब्द  नकोच. समाजासाठी तुम्ही काही करत असाल तर  शत्रू निर्माण होऊ देऊ नका. दिवस बरा. धनु पैसा येणार असेल  तर ताबडतोब खर्चावर नियंत्रण ठेवा. कारण चैनीसाठी खर्च होण्याची शक्यता आहे. कुटुंबाला महत्व द्या.  कडक बोलणे तर नकोच. बिझनेस मध्ये काही बदल, सुधारणा  होऊ शकतात. दिवस उत्तम. मकर सर्वांच्या  सहकार्याने आज निभावून न्याल. मन  थोडे अस्थिर होईल. जोडीदाराच  मत विचारात घ्या.आर्थिक बाजू ठीक राहील. मुले आज तुम्हाला  कामाला लावतील. प्रकृती कडे लक्ष असू द्या. दिवस  चांगला आहे. कुंभ गुरू सूर्य शुभ योग संतती साठी उत्तम असून  नवीन विद्या ग्रहण करण्यासाठी पण शुभ आहे. शत्रूला नामोहरम कराल. लहानसहान  कुरबुरी सुरू राहतील. दिवस मध्यम आहे. मीन घरा संबंधी व्यवहार, अचानक लाभ होईल. मुलं अगदी शहाण्यासारखं वागतील.तृतीय राहू बुध  काही नवीन ओळखी, संपर्क करून देतील.आज दिवस  शुभ असुन  यश प्राप्ती  होईल. शुभम भवतु!!
Published by:Meenal Gangurde
First published: