मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /मकर राशीत बुध झाला वक्री, पुढील 22 दिवस तुमच्या राशीवर काय परिणाम होईल? वाचा

मकर राशीत बुध झाला वक्री, पुढील 22 दिवस तुमच्या राशीवर काय परिणाम होईल? वाचा

बुध हा मकर राशीत वक्री झाला असून तो 4 फेब्रुवारीपर्यंत या स्थितीत राहणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार (astrology), बुध जेव्हा वक्री फिरतो तेव्हा त्याचा परिणाम सरळ मार्गाच्या तुलनेत उलट असतो.

बुध हा मकर राशीत वक्री झाला असून तो 4 फेब्रुवारीपर्यंत या स्थितीत राहणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार (astrology), बुध जेव्हा वक्री फिरतो तेव्हा त्याचा परिणाम सरळ मार्गाच्या तुलनेत उलट असतो.

बुध हा मकर राशीत वक्री झाला असून तो 4 फेब्रुवारीपर्यंत या स्थितीत राहणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार (astrology), बुध जेव्हा वक्री फिरतो तेव्हा त्याचा परिणाम सरळ मार्गाच्या तुलनेत उलट असतो.

  मुंबई, 15 जानेवारी : गेल्या वर्षी 29 डिसेंबरला मकर (Capricorn) राशीत बुधाचं (Mercury) आगमन झालं होतं. हे गेल्या वर्षातील बुधाचं शेवटचं संक्रमण ठरलं होतं. आता बुध हा मकर राशीला वक्री झाला असून पुन्हा तो 4 फेब्रुवारी 2022 ला मार्गी होईल. अशा स्थितीत बुधाचं मकर राशीत वक्री होणं सर्व राशींवर परिणाम (affects all the signs) करेल असं ज्योतिषशास्त्रतज्ज्ञांचं मत आहे.

  बुध हा मकर राशीत वक्री झाला असून तो 4 फेब्रुवारीपर्यंत या स्थितीत राहणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार (astrology), बुध जेव्हा वक्री फिरतो तेव्हा त्याचा परिणाम सरळ मार्गाच्या तुलनेत उलट असतो. मकर राशीत बुध वर्की झाल्यामुळे कौटुंबिक संबंधांवर (family relationships) परिणाम होतो. झी न्यूज ने याबाबत वृत्त दिलंय.

  मकर राशीत वक्री झालेला बुध कोणत्या राशींवर कसा परिणाम करेल, हे जाणून घेऊयात.

  - मेष (Aries) राशीच्या व्यक्तींच्या करिअरमध्ये आमूलाग्र बदल होऊ शकतात. तसेच या काळात नोकरी-व्यवसायातील गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल.

  - याकाळात वृषभ (Taurus) राशीच्या व्यक्तीचा कल धर्मकर्माकडे असेल, त्यामुळे मन प्रसन्न राहील. नोकरीच्या संदर्भात परदेशातून मिळालेल्या संधीचा फायदा उठवता येईल. बुधाचा राशीबदल या राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरेल.

  - मिथुन (Gemini) राशीच्या व्यक्तीला भौतिक सुख मिळेल. व्यवसाय किंवा करिअरमध्ये अडचणींचा सामना करावा लागेल. मानसिक ताण जाणवू शकतो.

  वाचा : Chanakya Niti: दोन तर्‍हेचे लोक आयुष्यभर राहतात दुःखी; कधीच मिळत नाही यश

  - कर्क (Cancer) राशीच्या व्यक्तींना या काळात नातेसंबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. जुने वाद तुम्हाला अडचणीत आणू शकतात. घरगुती खर्चांत वाढ होईल. करिअरमध्ये काही अडचणी येऊ शकतात.

  - सिंह (Leo) राशीच्या व्यक्तींना नात्यात गोडवा आणण्यासाठी बुधाचा वक्री काळ चांगला आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये काही गोष्टींबाबत गैरसमज होऊ शकतात. रागावर नियंत्रण ठेवावं लागेल. तसंच, बोलताना संयम ठेवावा.

  - याकाळात कन्या (Virgo) राशीच्या व्यक्तींचा त्यांच्या जीवनसाथीसोबत वाद होऊ शकतो. बुधाच्या वक्री काळात विशेषत: कौटुंबिक समस्यांबाबत सावधगिरी बाळगा.

  - तूळ (Libra) राशीच्या व्यक्तीचा अनावश्यक घरगुती खर्च वाढेल. घरातील बांधकामाची कामे पूर्ण होतील. कुटुंबातील सदस्यांमध्ये सुसंवाद राहील.

  - वृश्चिक (Scorpio) राशीच्या व्यक्तीला प्रवासात नुकसान होऊ शकते. त्यामुळे काळजीपूर्वक प्रवास करा. याशिवाय आवश्यक कागदपत्रांची काळजी घ्यावी लागेल, अन्यथा नुकसान सहन करावं लागू शकतं.

  वाचा : प्रेमासाठी काहीही करायला तयार असतात ‘या’ 4 राशींचे लोक

  - धनु (Sagittarius) राशीच्या लोकांनी आर्थिक मुद्द्यांवर विचार करून निर्णय घेणं योग्य राहील. गुंतवणुकीसाठी वेळ चांगला आहे. नोकरीत आर्थिक प्रगती होईल. रागावर नियंत्रण ठेवा.

  - बुध हा मकर (Capricorn) राशीत वक्री झाला आहे. त्यामुळे मकर रास असणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात काही मोठी घटना घडेल. अशा परिस्थितीत, त्यांनी स्वत: ची काळजी घेणं आवश्यक आहे. स्वभावात राग आणि चिडचिड दिसून येईल.

  - व्यवसायात किंवा वैयक्तिक जीवनात पैशाच्या व्यवहारात कुंभ (Aquarius) राशींच्या व्यक्तींना या काळात सावध राहावं लागेल. आर्थिक नुकसानाचे योग आहेत. पण व्यवसायासाठी दूरचा प्रवास फायदेशीर ठरेल.

  - मीन (Pisces) राशीच्या लोकांच्या उत्पन्नात घट होईल. चुकीच्या निर्णयामुळे आर्थिक नुकसान होऊ शकतं. शिक्षणात काही अडथळे येऊ शकतात.

  बुधाचे मकर राशीत वक्री होणं हे सर्व राशींवर परिणाम करेल. त्यादृष्टीने कामाचे नियोजन करणे फायद्याचे ठरू शकते.

  First published:
  top videos

   Tags: Astrology and horoscope