मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

दैनंदिन राशिभविष्य : समस्या, अडचणींचा दिवस; राशीनुसार काय काळजी घ्यायची पाहा

दैनंदिन राशिभविष्य : समस्या, अडचणींचा दिवस; राशीनुसार काय काळजी घ्यायची पाहा

राशिभविष्य.

राशिभविष्य.

आज मार्गशीर्ष पौर्णिमा. पाहूया आजचे बारा राशींचे राशिभविष्य.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

आज दिनांक 08 डिसेंबर 2022 वार गुरूवार. आज मार्गशीर्ष पौर्णिमा सकाळी 8.03 पर्यंत राहील. आज चंद्र वृषभ राशीत भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे राशिभविष्य.

मेष

आर्थिक घडामोडींना वेग येईल. काही कर्ज वगैरे देऊ नका. प्रवास योग येतील मानसिक द्वंद्व जाणवेल. कार्यालयीन कामकाज सुरळीत राहील. लाभ होतील. दिवस उत्तम.

वृषभ

आयुष्यात अप्रिय घटना घडतील. घाबरू नका. रवी बुध वैवाहिक जीवनात नवीन आशा देतील. गुरू महाराज काही विशेष लाभ, संततीची चाहूल देतील. दिवस बरा.

मिथुन

चंद्र मानसिक अशांती निर्माण करेल. आज कुठलाही आर्थिक व्यवहार जपून करा. परदेशबाबत शुभ फल मिळेल. लाभ होतील. वैवाहिक जीवनात तणाव कमी करा. दिवस शांततेत घालवा.

कर्क

आज कौटुंबिक जीवनात काही समस्या निर्माण होऊ शकतात. प्रकृतीची काळजी घ्या. लाभ स्थानात चंद्र मंगळ अनेक लाभ होतील, असे संकेत देत आहे. दिवस शुभ आहे.

सिंह

राशी स्वामी रवी सध्या सकारात्मक मानसिकता देईल. शरीरात ऊर्जा वाटेल. राहू कार्यक्षेत्रात विशेष घटना घडवेल. संततीविषयक काही खर्च होतील. आज दिवस उत्तम जाईल.

कन्या

भाग्य चंद्र असून आज धर्मविषयी आस्था वाढीस लागेल. संयम बाळगण्याची गरज आहे. जास्तीची जबाबदारी येईल. धार्मिक क्षेत्रात भरीव कामगिरी होईल. दिवस चांगला.

तूळ

घरात अशांतता निर्माण होईल असे वागू नका. कलह टाळा. जास्तीचे काम अंगावर घेऊ नका. प्रवास योग येतील. भावंडांशी संवाद होईल. आर्थिकदृष्ट्या दिवस मध्यम आहे. पूजनात दिवस घालवा.

वृश्चिक

अतिशय धावपळीचा असा हा दिवस असणार आहे. खूप महत्त्वाचे निर्णय, फोनवर संवाद होतील. पण प्रवास टाळा. आर्थिक लाभ होतील. जोडीदार आनंदी राहील. दिवस बरा आहे.

धनु

काही बाबतीत जपून राहण्याचा दिवस आहे. व्यवहार असतील तर ते उद्यावर टाका. संततीला काही अडचणी येतील. गृहविषयी समस्या येतील. दिवस मध्यम.

मकर

पंचम चंद्र आहे. दिवस जरा मध्यम जाईल. मन काहीसे उदास राहील. जोडीदाराची मदत घ्या. संततीला जपा. घरात जास्तीचे काम निघेल. दिवस संथ आहे.

कुंभ

व्यय स्थानात झालेली शनी ग्रहाची मार्गी स्थिती आर्थिक आणि शारीरिक कष्ट दाखवत आहे. चतुर्थ चंद्र आहे. घरी जबाबदारी येईल. द्वितीय गुरू परिस्थितीवर नियंत्रण ठेवेल. दिवस चांगला आहे.

मीन

आज दिवस कार्यक्षेत्रात कामगिरी करण्याचा आहे. काहीशी हुरहूर जाणवत असली तरी शांत रहा. कोणी अधिकारी व्यक्ती भेटेल. आर्थिक लाभ होतील. प्रवास टाळा. दिवस शुभ.

शुभम भवतू!!

First published:

Tags: Astrology and horoscope, Horoscope, Lifestyle, Rashibhavishya