Home /News /astrology /

दैनंदिन राशिभविष्य : धनलाभ होईल पण 'या' राशीच्या व्यक्तींचं आर्थिक नुकसानही होणार

दैनंदिन राशिभविष्य : धनलाभ होईल पण 'या' राशीच्या व्यक्तींचं आर्थिक नुकसानही होणार

Daily Horoscope 22 June 2022 : आजचा दिवस भाग्यदायक आहे.

आज दिनांक 22 जून 2022. वार बुधवार. ज्येष्ठ कृष्ण नवमी. चंद्र सायंकाळपर्यंत मीन राशीत असून गुरूशी योग करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य . मेष आज दिवस तुम्हाला भाग्यदायक आहे. चंद्र मन आनंदित ठेवेल. धनस्थानातील शुक्र स्त्रीवर्गाकडून अकल्पित लाभ प्राप्त करून देईल. संततीची काळजी घ्या. दिवस शुभ. वृषभ आज आर्थिकदृष्ट्या दिवस मध्यम आहे. अनपेक्षित खर्च झाले तरी आनंद मिळेल. नावलौकिक वाढेल. दिवस शुभ फल देईल. मिथुन अचानक कामासाठी प्रवास योग आहे. भाग्यात शनी, धार्मिक कार्यात यश देतील. शुक्राचा आनंददायक वावर तुम्हाला नवीन शुभ घटनांची चाहूल देईल. प्रकृती सांभाळून असा. दिवस मजेत जाईल. कर्क राशीच्या भाग्यस्थानातील चंद्र अचानक उलाढाल घडवेल. तुम्हाला काही नवीन जबाबदारी येईल. घरातदेखील काम राहिल. दिवस उत्तम जाईल. सिंह आज दिवस भाग्यदायक असून अध्यात्मिक अनुभव देईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहिल. आर्थिक लाभ होतील. गाठीभेटी होतील. दिवस सौख्याचा जाईल. कन्या आज दिवस गडबडीचा आणि कष्टाचा आहे. अंगावर घेतलेली जबाबदारी जास्त ताण देईल. मात्र विचलित होऊ नका. जोडीदार आनंदी राहिल. दिवस शांतपणे घालवा. तूळ आज जोडीने आनंदात गृहसौख्य अनुभव कराल. हर्ष आणि उल्हास याने मन भरून जाईल. नातेवाईक भेटतील. दिवस शुभ. वृश्चिक आज दिवस कोणाशीही वाद विवाद न करता घालवा. शत्रू निर्माण होतील. मात्र दिवस ईश्वराची सेवा करण्यात घालवां. आर्थिक बाजू जपा. चांगला दिवस. धनु राशीच्या चतुर्थ स्थानातील चंद्र सामाजिक जीवनात प्रतिष्ठा आणि आनंद मिळवून देईल. घरात शुभ घटना घडतील. आर्थिक लाभ होतील. मुलांसोबत दिवस सुखात जाईल. मकर तुमच्या धनस्थनातील वक्री शनी अजूनही ताण देत आहे तरी आज भाग्य उजळेल. आनंदात दिवस साजरा करताना त्रास विसरून जाल. प्रवास योग येतील. दिवस शुभ आहे. कुंभ राशीच्या व्यक्तींनी आर्थिक हानीपासून जपावं. मात्र अचानक होणारा धनलाभ आनंद देईल. नवीन वस्त्र, दागिने खरेदी कराल. दिवस उत्तम. मीन आज उच्च प्रतीचा लाभ मिळणार असून आर्थिक बाजू समृद्ध होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहिल. दिवस अतिशय गडबडीत जाईल. शुभम भवतू !!
Published by:Priya Lad
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या