मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Horoscope 2021 Sagittarius: धनु राशीच्या व्यक्तींना परदेशी जायला मिळणार संधी

Horoscope 2021 Sagittarius: धनु राशीच्या व्यक्तींना परदेशी जायला मिळणार संधी

New Year 2021 Rashifal: धनु (Sagittarius) राशीच्या व्यक्तींना नव्या वर्षात व्यवसायात फायदा होईल. आरोग्य, वैवाहिक आयुष्य कसं राहील पाहा वार्षिक भविष्य

New Year 2021 Rashifal: धनु (Sagittarius) राशीच्या व्यक्तींना नव्या वर्षात व्यवसायात फायदा होईल. आरोग्य, वैवाहिक आयुष्य कसं राहील पाहा वार्षिक भविष्य

New Year 2021 Rashifal: धनु (Sagittarius) राशीच्या व्यक्तींना नव्या वर्षात व्यवसायात फायदा होईल. आरोग्य, वैवाहिक आयुष्य कसं राहील पाहा वार्षिक भविष्य

    नवीन वर्ष (New Year 2021) आलं की प्रत्येक व्यक्तीच्या मनात आशा पल्लवित होतात. आधीच्या वर्षापेक्षा या नवीन वर्षात अधिक चांगलं काम करण्याचं प्रत्येकजण ठरवत असतो. 2021चं स्वागत करतानाही प्रत्येकजण हाच विचार करत असेल. वार्षिक भविष्य 2021 च्या आधारे तुम्ही या वर्षातील आपल्या राशीचं भविष्य जाणून घेऊन त्याआधारे नियोजन करू शकता. धनु राशीचं (Sagittarius Horoscope) भविष्य आपण जाणून घेऊ या... करिअर आणि व्यवसाय : धनु राशीच्या लोकांना यंदा करिअरमध्ये अनुकूल संधी मिळेल. या आधी तुम्ही जे कष्ट घेतले आहेत, त्याची चांगली फळं तुम्हाला आता मिळतील. तुमच्या कार्यक्षेत्रातील सहकारी तुमची साथ देतील, जेणेकरून तुम्हाला तुमचं काम सहजपणे पूर्ण करता येईल. या वर्षी या राशीतील लोकांना कामानिमित्त परदेशी (Foreign trip in horoscope) जाण्याचीही संधी मिळू शकते. व्यवसाय, उद्योग करणाऱ्या लोकांनाही हे वर्ष चांगले जाईल. भागीदारीत व्यवसाय असेल तर तुमचे तुमच्या भागीदारासोबत चांगले पटेल आणि व्यवसायात फायदाही होईल. आर्थिक आणि कौटुंबिक जीवन : या वर्षी तुमची आर्थिक स्थिती उत्तम राहील. पैसे साठवणे शक्य होईल. नव्या वर्षातील पहिल्याच महिन्याच्या मध्याला तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. यंदा आर्थिक बाबतीत नशिबाची चांगली साथ लाभेल. आर्थिक बाजू भक्कम झाल्यानं अनेक अडचणी दूर होतील. कौटुंबिक आघाडीवरही सौख्य लाभेल. मागील काळात काही तणाव, अडचणी आल्या असतील तर त्या दूर होतील. घराच्या नूतनीकरणाचाही तुम्ही विचार करू शकता. प्रेम आणि वैवाहिक जीवन : धनु राशीच्या लोकांचं प्रेम जीवन (Love life) यंदा सामान्य असेल. तुमची आणि तुमच्या प्रिय व्यक्तीची लहानसहान भांडणे होतील. अर्थात यातून गंभीर काही घडणार नाही; पण अडथळे येतील. यावर्षी तुम्ही अधिक भावनावश होणं टाळलं पाहिजे. या राशीचे लोक आपल्या जोडीदाराबरोबर वर्षाच्या सुरुवातीला चांगला काळ घालवतील; मात्र तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याच्या काही तक्रारी उद्भवू शकतात, त्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. शिक्षण आणि आरोग्य : शिक्षणासाठी (Education) घेतलेल्या मेहनतीचं फळ यंदा तुम्हाला मिळेल. शिकण्याकडं तुमचा ओढा वाढेल, काही गूढ विषयांच्या अभ्यासाकडं तुम्ही वळण्याची शक्यता आहे. या राशीचे जे लोक उच्च शिक्षण घेत आहेत, त्यांनाही वर्षाच्या सुरुवातीलाच चांगले लाभ मिळतील. मन भरकटत असेल तर विद्यार्थ्यांनी योग, ध्यानधारणा यांचा आधार घ्यावा. आरोग्याच्या (Health) दृष्टीनं हे वर्ष तुम्हाला चांगले जाणार आहे. तुम्ही तुमच्या आरोग्याची चांगली काळजी घ्याल. आरोग्यात चांगली सुधारणा दिसेल. त्वचेशी संबधित काही किरकोळ आजार उद्भवू शकतात, मात्र त्याचा तुमच्या आयुष्यावर फार मोठा परिणाम होणार नाही.
    First published:

    Tags: Rashibhavishya

    पुढील बातम्या