Horoscope 2021 Aries: नव्या वर्षात मेष राशीच्या व्यक्तींना मिळणार भाग्याची साथ; पण...

Horoscope 2021 Aries: नव्या वर्षात मेष राशीच्या व्यक्तींना मिळणार भाग्याची साथ; पण...

Rashifal 2021: मेष (Aries) राशीच्या व्यक्तींसाठी नवं वर्ष काही चांगल्या गोष्टी घेऊन येणार आहे आणि काही अडचणीही. जाणून घेऊ या तुमच्यासाठी कसं असेल हे वर्ष...

  • Share this:

नवं वर्ष सुरू झालं, की प्रत्येकाच्या मनात नवी उमेद जागृत होते. नवं वर्ष (New Year) जुन्या वर्षापेक्षा चांगलं जाण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. 2021च्या बाबतीतही लोक हाच विचार करत असतील, की 2020पेक्षा हे वर्ष चांगलं जावं आणि यश मिळावं. तुमचं भविष्य उत्तम असावं, अशी आम्हीही इच्छा करतो. म्हणूनच 2021 या वर्षाचं राशिफल कसं असेल, यातली महत्त्वाची माहिती आम्ही लेखातून तुम्हाला देणार आहोत. यातून तुम्हाला तुमच्या भविष्याची झलक पाहायला मिळेल आणि त्याच्या साह्याने तुम्ही 2021 अधिक चांगलं जाण्यासाठी प्रयत्न करू शकाल. राशिचक्रातली पहिली रास म्हणजे मेष (Aries). या राशीतल्या व्यक्तींसाठी करिअर, शिक्षण, आरोग्य आदी संदर्भाने 2021 हे वर्ष कसं असेल, याची माहिती घेऊ या.

मेष राशीच्या व्यक्तींना 2021 हे वर्ष करिअर (Career) आणि व्यवसायाच्या (Business) दृष्टीने चांगलं जाण्याची शक्यता आहे. या वर्षात तुमची इच्छाशक्ती तीव्र असेल. त्यामुळे कठीण कामंही तुम्ही सहजपणे पूर्ण करू शकाल. या राशीच्या ज्या व्यक्ती नोकरीत असतील, त्यांना याचं चांगलं फळ मिळेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सन्मान होण्याची शक्यता आहे. या राशीच्या व्यक्तींसाठी वर्षाची सुरुवात चांगली असेल. पूर्वी केलेल्या प्रयत्नांची चांगली फळं या काळात मिळू शकतील.

आर्थिक आणि कौटुंबिक जीवन

मेष राशीच्या व्यक्तींसाठी 2021 या वर्षाची सुरुवात आर्थिकदृष्ट्या (Economic) फार चांगली असेल असं सांगता येत नाही. या काळात तुम्हाला इच्छा नसूनही काही खर्च करावे लागू शकतील. एप्रिल महिन्यानंतर मात्र तुमच्या आर्थिक परिस्थितीत बदल होण्यास सुरुवात होऊ शकेल आणि तुम्ही धनवृद्धी करण्यात यशस्वी होऊ शकाल. या वर्षाच्या मध्यात गुंतवणूक करताना किंवा काही मौल्यवान वस्तू खरेदी करताना सावधानता बाळगायला हवी. या वर्षाचा शेवट तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या चांगला असेल. या राशीच्या व्यक्तींना या वर्षात कौटुंबिक जीवनात काही अडचणींना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. घरातल्या व्यक्तींसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. या राशीच्या काही व्यक्ती घरापासून दूर जाण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुम्हाला चांगला विचार करणं आवश्यक आहे.

प्रेम आणि वैवाहिक जीवन

या राशीच्या प्रेमजीवनातही (Love Life) वर्षाच्या सुरुवातीला काही अडचणी संभवतात. छोट्या छोट्या कारणांवरून तुमच्या जोडीदारासोबत भांडणं होऊ शकतात; मात्र वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांनंतर परिस्थितीत सकारात्मक बदल होतील. या राशीच्या काही व्यक्तींची प्रेमप्रकरणे यंदा लग्नात (Marriage) रूपांतरित होऊ शकतील. या राशीच्या विवाहित व्यक्तींनी वर्षाच्या सुरुवातीला मतभेद न होण्यासाठी सावधानता बाळगावी. वर्षाच्या मध्यात तुम्ही जोडीदारासमवेत चांगला काळ घालवू शकाल. तसंच जोडीदारासोबत एखाद्या सुंदर ठिकाणी फिरायला जाण्याचा योगही आहे.

शिक्षण आणि आरोग्य

या राशीच्या विद्यार्थ्यांनी चुकीच्या व्यक्तींशी साथसंगत होणार नाही याची काळजी घ्यावी. अभ्यासात मन रमण्यासाठी तुम्ही योग (Yoga), ध्यान (Meditation) आदी गोष्टी कराव्यात असा सल्ला आहे. या राशीच्या व्यक्तींचं आरोग्य या वर्षी चांगलं राहील. ऋतुबदलाच्या कालावधीत तब्येतीला जपा. या काळात तब्येत बिघडली तरी लवकर बरे व्हाल; मात्र खाण्यापिण्याच्या सवयींकडे विशेषत्वाने लक्ष देण्याची गरज आहे.

(साभार-AstroSage.com)

First published: December 31, 2020, 9:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading