Home /News /astrology /

दैनंदिन राशिभविष्य : आर्थिक लाभ होणार पण या 2 राशींचा खर्चही वाढणार

दैनंदिन राशिभविष्य : आर्थिक लाभ होणार पण या 2 राशींचा खर्चही वाढणार

Horoscope 20 May 2022 : आजचा दिवस शुभ असून शुभवार्ता मिळेल. पाहा तुमचं आजचं राशिभविष्य.

आज दिनांक 20 मे 2022, शुक्रवार. आज वैशाख कृष्ण पंचमी. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत होणार आहे. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष आज चंद्र भाग्यस्थानात असून आर्थिक, मानसिक लाभ होतील. व्यय मंगळ प्रकृतीची काळजी घ्या असं सुचवत आहे. राशीतील रवी व्यय मंगळ कायद्याचे बंधन पाळा असे सांगत आहे. उत्तम दिवस. वृषभ राशीच्या अष्टमातील चंद्र आज आर्थिक शुभवार्ता देईल. मित्रमैत्रिणींना भेटण्याचा, सामाजिक जीवनात आनंद घेण्याचा उत्तम दिवस आहे. मिथुन कार्यक्षेत्रातील वाढती जबाबदारी तुम्हाला फलदायी ठरेल. जोडीदाराशी संबंध सुधारतील. आर्थिक घडामोडी होतील. आज काही महत्त्वाच्या भेटी होण्याची शक्यता आहे. दिवस शुभ. कर्क भाग्यकारक दिवस असून धार्मिक गोष्टीत मन रमेल. संततीसंबंधी शुभ काळ. मेजवानीचा योग येईल. प्रवास होतील. एकूण दिवस समाधानात जाईल. सिंह आज पंचम चंद्राचा दिवसावर अनुकूल प्रभाव पडेल. फार ताण घेऊ नका. जास्तीचं काम पडेल. शांत राहून दिवस घालवा. कन्या भाग्यस्थानातील चंद्र जीवनात गोडी निर्माण करेल. मौजमजेसाठी बाहेर जाण्याचं ठरेल. घरगुती कार्यक्रम होईल. भावंडं भेटतील. आनंद आणि उत्साहात दिवस पार पडेल. तूळ आज चंद्र उच्च प्रतीचे फळ देण्यास सज्ज आहे. शिक्षणआणि कार्यक्षेत्रात चांगला लाभ मिळेल. आर्थिक लाभ होतील. दिवस चांगला. वृश्चिक संततीसाठी काही तरी विशेष करण्याचा दिवस आहे. सामाजिक जीवनात यश मिळेल. भाग्य उदयास येईल. आर्थिक लाभ होतील. उच्च शिक्षणासाठी काही खर्च होईल. विद्यार्थ्यांना उत्तम दिवस. धनु आज कार्यक्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींकडे लक्ष असू द्या. राशीतील चंद्र खर्चात वाढ करेल. तुमचे विरोधक सध्या बलवान आहेत. काळजी घ्या. दिवस शुभ. मकर प्रवास, घरामध्ये काही नवीन घटना, महत्त्वाचे फोन असा हा दिवस आहे. आर्थिक खर्च होतील. भावंडासोबत मजेत एकत्र घालवा. प्रवासाचे योग येतील. कुंभ आर्थिक लाभ करून देणारा दिवस आहे. राशीतील शनी सर्व बाजूने मदत करेल. काही कौटुंबिक कार्यक्रमात सहभाग घ्याल. प्रकृती जपा. दिवस शुभ. मीन दशम स्थानातील चंद्र कामाच्या ठिकाणी स्वास्थ्य देईल. मात्र दिवस एकूण खूप गडबडीत जाणार आहे. शिक्षण क्षेत्रात यशस्वी व्हाल. उत्तम असा दिवस आहे. शुभम भवतू!!
Published by:Priya Lad
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या