मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

दैनंदिन राशिभविष्य : शुक्र बदलणार रास; 'या' राशीच्या आयुष्यात शुभ घटनांची सुरुवात होणार

दैनंदिन राशिभविष्य : शुक्र बदलणार रास; 'या' राशीच्या आयुष्यात शुभ घटनांची सुरुवात होणार

Horoscope 18 June 2022 : शुक्र आज वृषभ या आपल्या उच्च राशीत प्रवेश करत आहे.

Horoscope 18 June 2022 : शुक्र आज वृषभ या आपल्या उच्च राशीत प्रवेश करत आहे.

Horoscope 18 June 2022 : शुक्र आज वृषभ या आपल्या उच्च राशीत प्रवेश करत आहे.

आज दिनांक 18 जून 2022, वार शनिवार. आज ज्येष्ठ कृष्ण पंचमी. आज चंद्र मकर राशीत भ्रमण करेल. आज शुक्राचे राशी परिवर्तन होणार असून शुक्र वृषभ या आपल्या उच्च राशीत प्रवेश करेल. पाहूया आजचे बारा राशींचे राशिभविष्य. मेष आर्थिक घडामोडींना वेग येईल. काही कर्ज वगैरे देऊ नका. मानसिक प्रसन्नता जाणवेल. कार्यालयीन कामकाज सुरळीत राहिल. लाभ होतील. दिवस मध्यम. वृषभ आयुष्यात नवीन शुभ घटनांची सुरवात होईल. रवी, बुध आर्थिक लाभाचे नवीन मार्ग देतील. चंद्र काही नवीन जबाबदारी निर्माण करेल. शांत रहा. दिवस शुभ. मिथुन चंद्र मानसिक ताण निर्माण करेल. आज कुठलाही आर्थिक व्यवहार करू नका. परदेशबाबत शुभ फळ मिळेल. दिवस शांततेत घालवा. कर्क आज कौटुंबिक जीवनात काही समस्या निर्माण होऊ शकतात. प्रकृतीची काळजी घ्या. व्यय स्थानात रवी कायद्यापासून जपा असे संकेत देत आहे. दिवस शुभ आहे. सिंह राशी स्वामी रवी सध्या सकारात्मक मानसिकता देईल. शरीरात ऊर्जा वाटेल. चंद्र कार्यक्षेत्रात विशेष वर्तमान आणेल. आज दिवस मध्यम जाईल. कन्या भाग्य चंद्र असून आज घराविषयक काही सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. जास्तीची जबाबदारी येईल. धार्मिक क्षेत्रात भरीव कामगिरी होईल. दिवस चांगला. तूळ घरात अशांतता निर्माण होईल असे वागू नका. कलह टाळा. जास्तीचे काम अंगावर घेऊ नका. प्रवास योग येतील. आर्थिकदृष्ट्या दिवस मध्यम आहे. पूजनात दिवस घालवा. वृश्चिक अतिशय धावपळीचा असा हा दिवस असणार आहे. खूप महत्त्वाचे निर्णय, फोनवर संवाद होतील. पण प्रवास टाळा. नुकसान होईल. दिवस बरा आहे. धनु आर्थिकबाबतीत जपून राहण्याचा दिवस आहे. काही व्यवहार असतील तर ते उद्यावर टाका. कुटुंबात काही अडचणी येतील. दिवस मध्यम. मकर वक्री शनी, राशीतील चंद्र दिवस जरा कठीण जाईल. मन काहीसं उदास राहिल. जोडीदाराची मदत घ्या. संततीला जपा. दिवस संथ आहे. कुंभ राशी स्थानात झालेली शनी ग्रहाची वक्री स्थिती आर्थिक आणि शारीरिक कष्ट दाखवत आहे. व्यय चंद्र आहे. द्वितीय गुरू नियंत्रण ठेवेल. दिवस मध्यम आहे. मीन आज दिवस नातेवाईकांना भेट, संपर्क करण्याचा आहे. काहीशी हुरहूर जाणवत असली तरी शांत रहा. कोणी अधिकारी व्यक्ती भेटेल. प्रवास टाळा. दिवस शुभ. शुभम भवतू!!
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या