Home /News /astrology /

Holi 2022 - आज फाल्गुन पौर्णिमा कशी जाणार? पाहा होळीच्या दिवसाचं तुमचं राशिभविष्य

Holi 2022 - आज फाल्गुन पौर्णिमा कशी जाणार? पाहा होळीच्या दिवसाचं तुमचं राशिभविष्य

आज फाल्गुन पौर्णिमा दुपारनंतर सुरू होईल. कसा असेल तुमचा आजचा दिवस.

आज दिनांक 17 मार्च 2022. वार गुरुवार. आज फाल्गुन पौर्णिमा दुपारनंतर सुरू होईल. होळी पौर्णिमेच्या सर्वांना खूप शुभेच्छा. आज चंद्र कन्या राशीतून भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष आज षष्ठस्थानातील चंद्र भ्रमण बरे असून काही ताण असेल तर शांत रहा. लाभ स्थानातील गुरू, रवी धार्मिक आस्था निर्माण करतील. पौर्णिमा आनंदात जाईल. दिवस शुभ. वृषभ राशीच्या पंचम स्थानातील चंद्र आज संततीची काळजी निर्माण करेल. प्रकृती नरम राहिल. भाग्य स्थानातील मंगळ शनि फारसं अनुकूल नाही. पौर्णिमा आनंदात घालवा. मिथुन आज चतुर्थ स्थानातील चंद्र आईकडून लाभ मिळवून देइल. शनी, मंगळ मात्र प्रकृतीची काळजी घ्या असं सुचवत आहे. पौर्णिमा शुभ जाईल. कर्क चंद्र आज विविध क्षेत्रात विशेष घडामोडी घडवून आणेल. तुमच्यावर नवीन जबाबदारी येईल आणि ती तुम्ही उत्तमप्रकारे पार पाडाल. पौर्णिमा विशेष लाभ देईल. सिंह आज दिवस अनेक भाग्याचे दरवाजे उघडणार आहे. आज मन आनंदी राहिल. गुरुकृपेने मार्ग मोकळा होईल. आर्थिक लाभ होतील. पौर्णिमा आर्थिक लाभ घडवेल. कन्या आज दिवस मध्यम असून प्रकृती जरा जपून असावी. काही विचित्र अशी हुरहूर लागून राहिल. प्रवास योग येतील. काळजी घ्या. पौर्णिमा बरी जाईल. तूळ राशीच्या व्यय स्थानात चंद्र जीवनात सुखाचे क्षण निर्माण करेल. खरेदी कराल. आर्थिकदृष्ट्या लाभ होईल. घरात काही विशेष घटना घडतील. पौर्णिमा लाभाची. वृश्चिक चंद्र भ्रमण प्रकृतीच्या तक्रारी कमी करेल. आर्थिक घडामोडी, आध्यात्मिक व्यक्तींची भेट घडवून आणेल. शांत राहून दिवस व्यतीत करा. पौर्णिमा शुभ. धनु चंद्रभ्रमण आज कार्यालयीन जीवनात यश देईल. संततीला वेळ द्यावा लागेल. मंगळ, शनी स्वभावात थोडे उग्र स्वरूप आणेल. पौर्णिमा बरी जाईल. मकर राशीच्या भाग्यस्थानातील चंद्र भ्रमण घरामध्ये काही जबाबदारी आणेल. त्यात तुम्ही गुंतून जाल.मंगळ शुक्र खर्चाचे नवीन मार्ग तयार करतील. दिवस चांगला आहे. पौर्णिमा शुभ. कुंभ चंद्र अष्टम स्थानात आहे. प्रवास टाळा. व्यय शनि मंगळ कायदा पाळा असे सांगत आहे. सांभाळून असा. दिवस बरा. पौर्णिमा मध्यम जाईल. मीन कौटुंबिक भान देणारा हा दिवस आहे. कुठूनतरी अचानक लाभ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहिल. वैवाहिक जीवन सुखाचे राहिल. पौर्णिमा अतिशय शुभ आहे. शुभम भवतू.
Published by:Priya Lad
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या