मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

PM Modi Birthday Horoscope : आज वाढदिवशी पंतप्रधान मोदींच्या राशीत काय? सोबत तुमचंही राशिभविष्य पाहा

PM Modi Birthday Horoscope : आज वाढदिवशी पंतप्रधान मोदींच्या राशीत काय? सोबत तुमचंही राशिभविष्य पाहा

17 सप्टेंबर पंतप्रधान मोदींचा वाढदिवस आणि आजचं राशिभविष्य.

17 सप्टेंबर पंतप्रधान मोदींचा वाढदिवस आणि आजचं राशिभविष्य.

आज चंद्र वृषभ राशीत असून सूर्य कन्या राशीत प्रवेश करेल. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त त्यांचं आणि तुमचंही आजचं राशिभविष्य.

आज दिनांक 17 सप्टेंबर 2022. वार शनिवार. भाद्रपद कृष्ण सप्तमी. चंद्र वृषभ राशीत असून सुर्य कन्या राशीत प्रवेश करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष आज दिवस तुम्हाला बरा आहे. रोहिणी नक्षत्रात चंद्र मन आनंदी ठेवेल. पंचम स्थानातील शुक्र संततीला शुभ काळ आहे. आर्थिक कौटुंबिक दृष्ट्या दिवस शुभ. वृषभ आज आर्थिकदृष्ट्या दिवस अवघड आहे. पण अनपेक्षित खर्च झाले तरी आनंद मिळेल. नाव लौकिक वाढेल. प्रवास योग येतील. संतती आनंदी राहिल. दिवस मध्यम फल देईल. मिथुन आज प्रवास योग आहे. अष्टम स्थानातील शनी धार्मिक कार्यात यश देईल. शुक्राचा आनंद दायक वावर तुम्हाला नवीन शुभ घटनांची चाहूल देईल. प्रकृती सांभाळून असा. दिवस मजेत जाईल. कर्क राशीच्या लाभ स्थानातील चंद्र अचानक उलाढाल घडवेल. तुम्हाला काही नवीन जबाबदारी येईल. घरात देखील काम राहील. मित्रमंडळीसाठी खर्च कराल. उत्तम खरेदी कराल. दिवस आनंदात जाईल. सिंह आज दिवस भाग्यदायक असून अध्यात्मिक अनुभव देईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहिल. आर्थिक लाभ होतील. गाठीभेटी होतील. दिवस सौख्याचा जाईल. कन्या आज दिवस आनंद देणारा आहे. अंगावर घेतलेली जबाबदारी ताण देईल. मात्र भाग्य साथ देईल. कुठल्याही प्रसंगात विचलित होऊ नका. जोडीदाराला त्रास राहिल. दिवस शांतपणे घालवा. तूळ आज दिवस अष्टम चंद्राच्या प्रभावात आहे. मंगळ वारंवार प्रवास योग आणेल. गृहसौख्य,आर्थिक लाभ होतील. मन आनंदी राहिल. प्रकृती जपा. नातेवाईक भेटतील. दिवस मध्यम. वृश्चिक आज दिवस कोणाशीही वाद विवाद न करता घालवा. जोडीदार आक्रमक होईल. दिवस कलह न करता घालवा. आर्थिक बाजू ठीक राहिल. चांगला दिवस. धनु षष्ठ स्थानातील चंद्र जीवनात यश मिळवून देईल. घरात शुभ घटना घडतील .आर्थिक खर्च होतील. मुलासोबत दिवस सुखात जाईल. मध्यम दिवस. मकर तुमच्या पंचम स्थानातील चंद्र भ्रमण सामाजिक प्रतिष्ठेचे संकेत देत आहे. आज भाग्य उजळेल. आनंदात दिवस साजरा करताना त्रास विसरून जाल. संततीला शुभ योग येतील. दिवस शुभ आहे. कुंभ राशीच्या व्यक्तींनी आर्थिक हानीपासून जपावं. मात्र अचानक होणारा धनलाभ आनंद देईल. प्रवास योग येतील. नवीन वस्त्र, दागिना खरेदी कराल. संतती खूश राहिल. दिवस उत्तम. मीन आज उत्तम प्रतीचा लाभ मिळणार असून आर्थिक बाजू समृद्ध होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहिल. प्रवास योग, संपर्क यात दिवस अतिशय गडबडीत जाईल. शुभम भवतू !!
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, PM Modi birthday, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या