मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

PM Modi Birthday Horoscope : पंतप्रधान मोदींना आज ग्रहांचीही साथ; तुमच्या राशीत काय पाहा राशिभविष्य

PM Modi Birthday Horoscope : पंतप्रधान मोदींना आज ग्रहांचीही साथ; तुमच्या राशीत काय पाहा राशिभविष्य

17 सप्टेंबर 2022 रोजीचं मोदींसह तुमचंही राशिभविष्य.

17 सप्टेंबर 2022 रोजीचं मोदींसह तुमचंही राशिभविष्य.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची सूर्यरास कन्या आहे. सूर्यराशीनुसार मोदी आणि तुमचंही आजचं राशिभविष्य.

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 17 सप्टेंबर 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) एखाद्या नव्या संधीला होकार देताना तुमच्या अंतर्मनावर विश्वास ठेवा. नकारात्मक भावनेला खतपाणी घालणारा एखादा अनुभव किंवा आठवण विसरणं हिताचं असतं. गोष्टी अधिक चांगल्या करण्यासाठी आजचा दिवस ही नवी संधी समजा. LUCKY SIGN – A novel वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) कुठल्या तरी विषयात आज विजय मिळण्याची चिन्हं दिसत आहेत. तुमची दैनंदिन कामं सुलभ करा आणि तुमचा दृष्टिकोन अधिक शिस्तबद्ध करा. LUCKY SIGN – A vibrant bag मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) तुमचा आधीचा संवाद पारदर्शक ठेवल्याबद्दल तुम्हाला आज हायसं वाटू शकतं. यामुळे तुम्ही दुसऱ्यांच्या आदराला आणि विश्वासाला पात्र ठरू शकाल. प्रोफेशनल्स आणि सार्वजनिक सेवेमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना आज कामाच्या ठिकाणी अनपेक्षितरीत्या खूप बिझी राहावं लागेल. LUCKY SIGN – An indoor plant कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) गेले काही दिवस कंटाळवाणे गेले असतील तर आजचा दिवस सोशलायझेशमधून तुमची ऊर्जा पुनरुज्जीवित करणारा असू शकतो. तुमची नियोजित कामं पूर्ण करण्याची इच्छा तुम्हाला आनंद देऊ शकेल. तुमचा जोडीदार अचानक शांत राहिला असेल. तुम्ही त्यांच्यावर लक्ष जरूर ठेवा. LUCKY SIGN – A glass table सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) आज तुम्हाला फार उदार झाल्यासारखं वाटेल आणि तुम्ही कुणाला मदतही कराल. तुमच्या आई-वडिलांनी एखाद्या मुद्द्याबाबत आधी नाराजी व्यक्त केली असेल, तर आता ते तुमच्या मुद्द्याशी सहमत होऊ शकतील. हळूहळू झालेली प्रगती हे चांगल चिन्ह आहे. LUCKY SIGN – A rooftop कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) सध्या घडत असलेल्या घडामोडींबद्दल तुम्ही व्यक्त झाला नाहीत, तर इतरांना चुकीचा संदेश जाऊ शकतो. आजचा दिवस कृती आणि अंमलबजावणीचा आहे. तुम्ही नियोजित केलेली गोष्ट पूर्ण करण्यासाठी ग्रहांकडूनही तुम्हाला पुरेसा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN – A pet shop तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) आजच्या ऊर्जेचा कल सेलिब्रेशन करण्याकडे दिसत आहे. तुम्हाला अनपेक्षित संधी मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक गेट टुगेदर आज घडण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या किरकोळ तक्रारींमुळे तुम्ही व्यग्र राहाल. LUCKY SIGN – Silverware वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) एखाद्या गोष्टीत निराशा हाती आल्याने तुम्हाला हताश वाटण्याची शक्यता आहे; पण ते विचार सोडून लगेचच पुढे जा. तुम्हाला दिलेल्या पर्यायांबाबत जास्त चोखंदळपणा करू नका. वेळ लवकरच त्याची भरपाई करू शकतो. एखादा नवा क्रीडाप्रकार तुमचं लक्ष वेधून घेण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN – A bouquet धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) आज नशीब तुमच्या बाजूने असावं. रखडलेली कामं मार्गी लागू शकतील. एखाद्या वृद्ध व्यक्तीकडून तुम्हाला चांगला सल्ला दिला जाण्याची शक्यता आहे. वर्क-लाइफ बॅलन्स साधल्यास तुमचा दिवस आणखी सुरळीत जाऊ शकेल. LUCKY SIGN – A newspaper मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) छोट्या अंतराचा प्रवास आज घडू शकतो. तुमचे बॉस किंवा वरिष्ठांकडून तुमच्या खांद्यावर मोठी जबाबदारी टाकली जाऊ शकते. ती तुम्ही आता नाकारू शकता. तुमच्या जोडीदारालाही एखाद्या छोट्या ब्रेकची अपेक्षा असू शकते. LUCKY SIGN – A yellow sapphire कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) कोणत्याही नवीन भूमिकेसाठी थोडे जास्त कष्ट आणि संयमाची गरज भासू शकते. तुमची मुलं तुम्हाला आणि तुमच्या जीवनशैलीला आदर्श मानतात. एखाद्याचं गुपित राखणं आता तुमच्यासाठी आव्हान ठरू शकतं. LUCKY SIGN – Almond cake मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) काही महत्त्वांच्या कागदपत्रांच्या कामात तुमचा अर्धा दिवस व्यतीत होऊ शकतो. सर्वांत अनपेक्षित व्यक्तीकडून आज तुम्हाला कॉल येऊ शकतो. जवळच्या मित्रांच्या सोबतीत तुमची संध्याकाळ इंटरेस्टिंग जाण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबी सुरळीत राहतील. LUCKY SIGN – A diary
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, PM Modi birthday, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या