मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

PM Modi Birthday Numerology : पंतप्रधान मोदींच्या जन्मतारखेनुसार त्यांचं भविष्य काय? 17 सप्टेंबरचं अंकशास्त्र

PM Modi Birthday Numerology : पंतप्रधान मोदींच्या जन्मतारखेनुसार त्यांचं भविष्य काय? 17 सप्टेंबरचं अंकशास्त्र

17 सप्टेंबर 2022 रोजीचं अंकशास्त्र.

17 सप्टेंबर 2022 रोजीचं अंकशास्त्र.

अंकशास्त्रात जन्मतारखेनुसारही भविष्य वर्तवलं जातं. त्यानुसार 17 सप्टेंबरला जन्मलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं त्यांचं जन्मतारखेनुसार आजचं भविष्य काय आहे पाहा.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 17 सप्टेंबर 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजचा दिवस आत्मविश्वासाची पातळी वाढवण्याचा आहे. बहुतांश समस्या संपण्याच्या मार्गावर आहेत. आयुष्यात काही तरी नवीन गोष्ट लवकरच सुरू होईल. नवी जागा, पद, मित्र, बिझनेसमधली गुंतवणूक, नोकरी, घर किंवा नवी गाडी यांपैकी ते काहीही असू शकतं. प्रॉपर्टीशी संबंधित प्रकरणांमध्ये उशीर होऊ शकतो. मानसिक आरोग्य चांगलं राखण्यासाठी आज उशिरापर्यंत काम करू नका. वैद्यकीय व्यायसायिकांना आज नवी ऑफर मिळेल. शेती आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रांमध्ये भरपूर नफा होईल. शुभ रंग : Aqua शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 9 दान : आश्रमात गहू दान करा. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) सकाळी दुधाच्या पाण्याने आंघोळ करा. तुमचे कष्ट आणि प्रामाणिकपणा ही यश मिळण्याची कारणं आहेत. शहाणपणा, हुशारी जागृत ठेवा. कारण लोक तुमच्या निरागसपणाचा फायदा उठवण्याची शक्यता आहे. एक्स्पोर्ट-इम्पोर्ट व्यावसायिक, डॉक्टर्स, इंजिनीअर्स, ब्रोकर्स, ट्रॅव्हल एजन्सीज, स्टॉक मार्केट आणि पार्टनरशिप फर्म्स यश साजरं करतील. पीअर्सकडून एकनिष्ठतेचा भंग झाल्यामुळे भावनिकदृष्ट्या धक्का बसेल. शुभ रंग : Blue शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 6 दान : गायींसाठी पाणी दान करा. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) सर्जनशील विचार आणि जादुई भाषण यांमुळे कामाच्या ठिकाणी बॉस आणि घरी कुटुंबीय प्रभावित होतील. सर्व प्रकारच्या परिस्थितीमध्ये काम करण्यासाठी तुम्ही पुरेसे लवचिक आहात. त्यामुळे यश फारसं दूर नाही. पैसे हाताळताना सावधगिरी बाळगा. क्रिएटिव्ह व्यक्ती आणि पब्लिक फिगर्सना प्रसिद्धी मिळेल. स्पोर्ट्स कोचेसना विजय आणि आर्थिक बक्षीस मिळेल. बांधकाम आणि शेती क्षेत्रात गुंतवणुकीसाठी उत्तम काळ. सकाळी कपाळावर चंदन लावा. शुभ रंग : Orange & Blue शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3, 9 दान : गरिबांना सूर्यफूल तेल दान करा. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) उच्चपदस्थ व्यक्तींची आणखी उत्तरोत्तर प्रगती होईल. आर्थिक प्लॅन्स कोणाशीही शेअर करू नका. इच्छुक विद्यार्थ्यांनी सरकारी नोकरीसाठी जरूर अर्ज करावा. कारण त्या दृष्टीने अनुकूल परिस्थिती आहे. नशिबाची साथ मिळण्यासाठी हिरव्या पालेभाज्या दान करणं चांगलं राहील. खेळाडूंची आर्थिक कमाई मोठी असेल आणि त्यांच्या कामगिरीचं कौतुकही होईल. तुम्ही इतके बिझी असाल, की कुटुंबीय, मित्र यांच्यासमवेत वेळ व्यतीत करता येणार नाही. त्यामुळे त्यांच्या तक्रारी शांतपणे ऐकून घ्याव्या लागतील. आज दानधर्म करणं गरजेचं आहे. शुभ रंग : Blue & Grey शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : भिकाऱ्यांना चपला दान करा. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) ऑफिसमधल्या टेबलवर क्रिस्टलचं कमळ ठेवा. आजच्या दिवसात अडथळे कमी करण्यासाठी नशीब महत्त्वाची भूमिका निभावेल. तुमच्या भावना जोडीदाराला सांगून प्रपोझ करण्यासाठी आदर्श दिवस. मशीनरी खरेदी करण्यासाठी, प्रॉपर्टी विक्रीसाठी, ऑफिशियल डॉक्युमेंट्सवर सह्या करण्यासाठी, तसंच ट्रिपसाठी बाहेर जाण्याकरिता चांगला दिवस आहे. वृत्तनिवेदक, अभिनेते, हस्तकला आर्टिस्ट, इंजिनीअर्स आदींचं कौतुक होईल. गुंतून जाणं टाळा. कारण तो शत्रूंकडून लावलेला सापळा असू शकतो. शुभ रंग : Teal शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : अनाथाश्रमातल्या मुलांना हिरवी फळं दान करा. #नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) दुपारच्या जेवणानंतर कामाचे चांगले रिझल्ट्स मिळतील. आज तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी तयार राहा. कारण आज तुमच्या कृतींना वेळेची साथ आहे. आज सर्व प्रकारच्या लाभांचा आनंद घ्याल. कुटुंबीयांचं प्रेम आणि पाठिंबा यांमुळे समृद्धी मिळेल. आजचा दिवस आरामदायी सुविधांमध्ये व्यतीत कराल. डिझायनर्स, वकील, तंत्रज्ञ, राजकीय नेते आणि अभिनेते यांना स्पेशल अप्रैझल आणि स्थिरता मिळेल. शुभ रंग : Sky Blue शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6, 9 दान : गरिबांना दहीभात दान करा. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) व्यावसायिक प्रगती आणि यश मोठ्या प्रमाणावर मिळेल; मात्र विश्वासघातामुळे तुम्हाला मानसिक त्रास होईल. तुम्ही प्रॅक्टिकल विचार करणाऱ्या व्यक्ती असल्याने यातून लवकर बाहेर याल. रिलेशनशिप्स, परफॉर्मन्स आणि आर्थिक प्रगती या गोष्टींचा आनंद घेण्याचा काळ लवकरच येत आहे. आज बिझनेसमध्ये नातेवाईक आणि मित्रांपासून सावध राहा. खेळाडूंनी पुढील वाद टाळण्यासाठी आज प्रतिस्पर्ध्यांपासून दूर राहावं. आज विरुद्धलिंगी व्यक्तीमुळे नशीब खुलेल. देवाचे आशीर्वाद मिळण्यासाठी भगवान शिवशंकरांचा पूजाविधी करा. शुभ रंग : Green शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 6 दान : अनाथाश्रमात दूध दान करा. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) वृद्धाश्रमातल्या व्यक्तींची सेवा करा आणि सकारात्मक कर्मांमध्ये भर घाला. नेतृत्व एंजॉय करण्याचा काळ आहे. कारण तुमच्या सभोवतालच्या सर्व व्यक्ती तुमचे निष्ठावान फॉलोअर्स आहेत. अकाउंट्सची काळजी घ्या. कुटुंबीयांसमवेत वेळ व्यतीत करा. दानधर्मामुळे जादुई परिणाम मिळतील. ग्रीन गार्डनमध्ये काही काळ व्यतीत करा. शुभ रंग : Purple शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : गरिबांना छत्री दान करा. #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज नशिबाचं चक्र सकारात्मक वळण घेईल. डॉक्टर्स, सर्जन्स, राजकीय नेते आणि खेळाडू आदींची दखल घेतली जाईल, पुरस्कार मिळतील. आजचा दिवस प्रसिद्धीचा, मजेचा, ऊर्जेचा आणि उत्साहाचा असेल. या दिवसाचा उपयोग तुमच्या उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने करा. आर्थिक लाभ आणि प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन्स आज अगदी सहज होतील. विश्वासामुळे रिलेशनशिप बहरेल आणि समृद्धी मिळेल. शुभ रंग : Red शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : लाल हातरुमाल दान करा. 17 सप्टेंबर रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : नरेंद्र मोदी, रविचंद्रन आश्विन, टी. सुब्बरामी रेड्डी, पेरियार ई. व्ही. रामास्वामी, एम. एफ. हुसैन
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Numerology, PM Modi birthday

पुढील बातम्या