मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

दैनंदिन राशिभविष्य : आज Gudi Padwa; नववर्षाचा पहिला दिवस कसा जाणार?

दैनंदिन राशिभविष्य : आज Gudi Padwa; नववर्षाचा पहिला दिवस कसा जाणार?

Gudi Padwa 2022 Horoscope : आज चैत्र शुद्ध प्रतिपदा. हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. गुढीपाडवा. आजचा दिवस शुभ आहे.

Gudi Padwa 2022 Horoscope : आज चैत्र शुद्ध प्रतिपदा. हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. गुढीपाडवा. आजचा दिवस शुभ आहे.

Gudi Padwa 2022 Horoscope : आज चैत्र शुद्ध प्रतिपदा. हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. गुढीपाडवा. आजचा दिवस शुभ आहे.

आज दिनांक 02 एप्रिल 2022 वार शनिवार. आज चैत्र शुद्ध प्रतिपदा. हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. गुढीपाडवा. आनंद नाम संवत. या अत्यंत पवित्र अशा शुभ दिनाच्या सर्व बांधवांना मन:पूर्वक शुभेच्छा. नववर्ष आपण सर्वांना आनंद आणि आरोग्य पूर्ण जावो .आजपासून चैत्री नवरात्र सुरू होते. आज चंद्र मेष राशीत आहे.पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. ब्रह्मध्वज नमस्तेरस्तु सर्वाभिष्ट फलप्रद। प्राप्तेरस्मिन्वत्सरे नित्यं मदगृहे मंगल कुरु मेष आज नववर्षाचा पहिला दिवस तुम्हाला भाग्यदायक आहे. राशीतील चंद्र मन आनंदित ठेवेल. लाभ स्थानातील शुक्र स्त्री वर्गा कडून अकल्पित लाभ प्राप्त करून देईल. दिवस शुभ. वृषभ आज आर्थिकदृष्ट्या दिवस मध्यम आहे. अनपेक्षित खर्च झाले तरी आनंद मिळेल नावलौकिक वाढेल. गुढीपाडवा शुभ फळ देईल. मिथुन अचानक प्रवास योग, भाग्यातील शुक्राचा आनंददायक प्रवेश तुम्हाला नवीन शुभ घटनांची चाहूल देईल. प्रकृती सांभाळा. गुढीपाडवा मजेत जाईल. कर्क राशीच्या दशमातील चंद्र कार्यक्षेत्रात अचानक उलाढाल घडवेल. दिवस सुट्टीचा आहे तरी तुम्हाला काही नवीन जबाबदारी येईल. घरातदेखील काम राहिल. दिवस आनंदात जाईल. सिंह आज दिवस भाग्यदायक असून अध्यात्मिक अनुभव देईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहिल. गाठीभेटी होतील. गुढीपाडवा सौख्याचा जाईल. कन्या आज दिवस गडबडीचा आणि कष्टाचा आहे. अंगावर घेतलेली जबाबदारी जास्त ताण देईल. मात्र विचलित होऊ नका. दिवस शांतपणे घालवा. तूळ आज जोडीने आनंदात गुढीपाडवा साजरा कराल. हर्ष आणि उल्हास याने मन भरून जाईल. नातेवाईक भेटतील. दिवस शुभ. वृश्चिक आज दिवस कोणाशीही वाद विवाद न करता घालवा. शत्रू निर्माण होतील. मात्र नवीन वर्षात दिवस ईश्वराची सेवा करण्यात घालवा. आर्थिक बाजू जपा. धनु राशीच्या पंचम स्थानातील चंद्र सामाजिक जीवनात प्रतिष्ठा आणि आनंद मिळवून देईल. मुलासोबत दिवस सुखात जाईल. मकर तुमच्या राशीतील शनी मंगळ अजूनही ताण देत अडले तरी आज गृहसौख्य मिळेल. आनंदात सण साजरा करताना त्रास विसरून जाल. गुढीपाडवा शुभ आहे. कुंभ राशीच्या व्यक्तींनी आर्थिक हानीपासून जपावं. मात्र अचानक होणारा धनलाभ आनंद देईल. नवीन वस्त्र, दागिना खरेदी कराल. दिवस उत्तम. मीन आज उच्च प्रतीचा लाभ मिळणार असून आर्थिक बाजू समृद्ध होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहिल. गुढीपाडवा अतिशय सुखद जाईल. शुभम भवतु !!
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या