मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /राशीभविष्य: गणेश चतुर्थीच्या शुभ दिवशी फळफळणार भाग्य

राशीभविष्य: गणेश चतुर्थीच्या शुभ दिवशी फळफळणार भाग्य

आज दिनांक 10 September 2021 शुक्रवार. गणेशाचं आगमन होत आहे. तुमच्या राशीचं भविष्य वाचा आणि जाणून घ्या गणेश प्रतिष्ठापनेचा शुभमुहूर्त..

आज दिनांक 10 September 2021 शुक्रवार. गणेशाचं आगमन होत आहे. तुमच्या राशीचं भविष्य वाचा आणि जाणून घ्या गणेश प्रतिष्ठापनेचा शुभमुहूर्त..

आज दिनांक 10 September 2021 शुक्रवार. गणेशाचं आगमन होत आहे. तुमच्या राशीचं भविष्य वाचा आणि जाणून घ्या गणेश प्रतिष्ठापनेचा शुभमुहूर्त..

  आज दिनांक 10 September 2021. शुक्रवार.  तिथी भाद्रपद शुक्ल चतुर्थी. गणेश चतुर्थी. श्री गणरायांची प्रतिष्ठापना .पार्थिव गणपती पूजन. हे पूजन तिथी प्रधान आहे त्यामुळे  सकाळपासून ते सायंकाळी सुर्यास्त होण्याच्या आत करता येते. उद्या सकाळी 11.38 नंतर माध्यान्ही पर्यंत मुहूर्त  आहे. षोडशोपचारे श्रींची पुजा करावी, सर्वांना दीर्घायुष्य, आरोग्य  लाभावे, सर्वत्र मंगल व्हावे हीच प्रार्थना..

  आज चंद्र  तुला राशीत भ्रमण करीत आहे.अनेक शुभ योग आज होत आहेत. गुरु चंद्र नवपंचम योग. उच्च राशीत शुक्र, शनि व सूर्य. एकूण दिवस अतिशय शुभ आहे.

  मेष

  आज श्री गणरायाचं पूजन  करण्यात  वेळ आनंदात जाईल. दोघांनी जोडीने सर्व कार्य पार पाडावे  व्यवसाय पूरक दिवस आहे. आर्थिक दृष्टय़ा उत्तम दिवस.

  वृषभ

  षष्ठ स्थानात चंद्र शुक्र अतिशय शुभ असुन वैचारिक, आर्थिक लाभ होतील. दिवस  समारंभ पूरक आहे .नातेवाईकांना भेट द्याल. नोकरीत उत्तम दिवस.

  मिथुन

  राशीच्या पंचमात शुक्र चंद्र अत्यंत शुभ आहेत. उच्च प्रतीचे ज्ञान मिळावे म्हणून प्रयत्‍न करावा  अध्यात्मिक अनुभव, सामाजिक पद ,प्रतिष्ठा मिळवून देणारा दिवस. संतती आनंदी राहील. शुभ दिवस.

  कर्क

  आज घरातल्या गणेश पूजन विधी मध्ये दिवस अतिशय आनंदात जाईल. मनापासून केलेल्या प्रार्थनेचे फळ देणारा दिवस आहे. घरत मिष्टान्न, उंची कपडे,वस्तु खरेदी होतील. आईवडील तुमच्यावर खुश राहतील. दिवस शुभ.

  सिंह

  आज कोणाकडे तरी उत्सवाच्या निमित्ताने जाणे होईल. भेटी, फोन, आनंदी वातावरण राहील. प्रवास सुखकर होतील. आर्थिक स्थिती सांभाळा. धन आगमन होईल  पण खर्च देखील वाढेल.  दिवस उत्तम.

  कन्या

  धन कुटुंब वाणी स्थानात होणारे  चंद्र भ्रमण अनुकूल फळ देणार असून आर्थिक बाबतीत यश मिळवून देईल. अचानक लाभ होतील. कुटुंबात आनंदाचे क्षण येतील. शुभ दिवस.

  तुला

  आज राशीत आलेला स्वगृही शुक्र चंद्रा सोबत असून तुम्हाला मौज मजा करण्याची इच्छा होईल .पुजा अर्चना  आरती यात रमून जाल. खरेदी होईल. गणरायाच्या कृपेने दिवस शुभ.

  वृश्चिक

  आज व्ययस्थानातील स्थानातील चंद्र शुक्र जरा जास्तीचा खर्च करतील. पण त्यात ही आनंद असेल. मनात असलेली चिंतेची छाया आज विसरून जा. ईश्वरी कृपा सर्व ठीक करेल. दिवस बरा जाईल

  धनु

  दशमातील मंगळ बुध योग  वाणी वर ताबा ठेवावा असे सुचवतो आहे. कार्यक्षेत्रातील प्रगती सुरू राहील. लाभ होतील. मित्र मैत्रिणींना भेट द्याल. आनंदात दिवस जाईल.

  मकर

  अष्टमात सूर्य, नवम स्थानात मंगळ बुध, अणि दशमातील चंद्र शुक्र ही ग्रहस्थिती  वडीलधारी व्यक्ती  लाभ करून देईल असे सुचवत आहे.

  एक आनंद देणारा दिवस. घरातल्या प्रत्येक व्यक्तीला खुश कराल.

  कुंभ

  अष्टमात होणारी  मंगळ बुध युती जपून राहण्याचा संकेत देत आहे. भाग्य स्थानातील चंद्र शुक्र धार्मिक कार्य घडवून आणेल. संतती सुख चांगले. सुखद घटनांची सुरवात.

  मीन

  चंद्र शुक्र अष्टमात असले तरी आज दिवस अनुकूल फळ देईल. थोडे मानसिक द्वंद्व चालू राहील  प्रकृती जपून काम करा. आर्थिक लाभ होतील. दिवस मध्यम.

  First published:
  top videos

   Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya