Home /News /astrology /

Chandrama Effect: राशीतील शक्तीशाली चंद्रामुळे मिळते सुख-समृद्धी, त्यासाठी या सोप्या उपायांचा करा अवलंब

Chandrama Effect: राशीतील शक्तीशाली चंद्रामुळे मिळते सुख-समृद्धी, त्यासाठी या सोप्या उपायांचा करा अवलंब

Chandrama Upay: चंद्र खराब स्थानी असेल तर सर्वकाही उलटं घडत जातं. जीवनात अनेक समस्या येतात. काही ज्योतिषीय उपाय करून तुम्ही तुमचा चंद्र ग्रह मजबूत करू शकता आणि येणाऱ्या समस्यांवर उपाय मिळवू शकता.

    मुंबई, 25 डिसेंबर : ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा रात्रीचा राजा आहे असं म्हटलं जातं. कुंडलीतील बलवान चंद्र व्यक्तीला सुख आणि समृद्धी देतो. आयुष्य प्रेमळ बनतं. परंतु, हाच चंद्र खराब स्थानी असेल तर सर्वकाही उलटं घडत जातं. जीवनात अनेक समस्या येतात. काही ज्योतिषीय उपाय करून तुम्ही तुमचा चंद्र ग्रह मजबूत करू शकता आणि येणाऱ्या समस्यांवर उपाय मिळवू शकता. जाणून घेऊया या ज्योतिषीय (Chandrama) उपायांबद्दल. राशीचा चंद्र बलवान करण्यासाठी उपाय - 1. ज्यांना चंद्र बलवान बनवायचा असेल त्यांनी किमान 10 सोमवार उपवास ठेवावे. चंद्राची पूजा करावी, असे केल्याने तुमच्या राशीचा चंद्र बलवान राहील आणि मानसिक शांतीही मिळेल. तुम्ही 54 सोमवारी उपवास देखील करू शकता. 2. चंद्राचे बल मिळवण्यासाठी सोमवारी शुभ्र वस्त्रे परिधान करा आणि स्नानानंतर ओम श्रम श्रीं श्रोणः चांद्राय नमः या मंत्राचा 3, 5 किंवा 11 वेळा म्हणावा. 3. मीठाशिवाय दही, दूध, तांदूळ, साखर, तूप यापासून बनवलेले पदार्थ खाल्ल्यानेही चंद्र बलवान राहतो. 4. व्यवसायात नफा आणि कामात यश मिळण्यासाठी तुम्ही सोमवारीही उपवास करू शकता. यामुळे चंद्र बलवान होईल आणि तुमचे भाग्य उजळेल. 5. सोमवारी ब्राह्मण किंवा पात्र व्यक्तीला तूप, दही, शंख, पांढरे वस्त्र, मोती किंवा चांदीचे भांडे दान केल्यानेही चंद्राचे दोष दूर होतात. तो तुमच्यासाठी बलवान होतो. 6. चंद्राचे बल मिळवण्यासाठी तुम्ही त्याचे रत्न मोती परिधान करू शकता किंवा चंद्रकांत मणी, चंद्राचे उप-रत्न घालू शकता. हे वाचा - Food Miss Combination : चुकूनही एकत्र खाऊ नका हे पदार्थ; होईल गंभीर दुष्परिणाम 7. तुम्ही दररोज तुमच्या आईच्या चरणांना स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेतले, तरीही तुमचा चंद्र बलवान होईल. 8. दररोज भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली तरी चंद्र बलवान बनेल. कारण, भगवान शिव स्वतः चंद्रशेखर आहेत. त्यांच्या डोक्यावरतीच चंद्र विराजमान आहे. हे वाचा - Muscle Pain: हिवाळ्यात शरीराच्या या अवयवांमध्ये होतात सतत वेदना; हे उपाय ठरतील गुणकारी 9. ज्यांच्यावर चंद्राची छाया कमजोर आहे, त्यांनी आपल्या मित्र आणि वडिलधाऱ्यांशी चांगले आचरण ठेवले पाहिजे. आपल्या मुलाची चांगली काळजी घ्यावी. यामुळेही तुमचा चंद्र बलवान होतो. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य गृहितकांवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Rashibhavishya, Rashichark

    पुढील बातम्या