Home /News /astrology /

Ekdant Sankashti Chaturthi Horoscope : संकष्टी चतुर्थीच्या शुभ दिवशी काय लाभ होणार; पाहा तुमचं राशिभविष्य

Ekdant Sankashti Chaturthi Horoscope : संकष्टी चतुर्थीच्या शुभ दिवशी काय लाभ होणार; पाहा तुमचं राशिभविष्य

Ekdant Sankashti Chaturthi Horoscope 19 May 2022 : आज संकष्टी चतुर्थी. आज दिवस शुभ आहे.

आज दिनांक 19 मे 2022 गुरुवार. तिथी वैशाख कृष्ण चतुर्थी. संकष्टी चतुर्थी. श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना. आज दिवस शुभ आहे. आज चंद्र धनु राशीतून भ्रमण करेल. पाहुया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष सध्या मानसन्मानात वाढ, आर्थिक लाभ कार्यक्षेत्रात संधी असा काळ आहे. आज भाग्य तुमच्या सोबत राहिल. संततीला वेळ द्या. शांत रहा. चांगला दिवस . वृषभ आज अष्टम स्थानात चंद्र भ्रमण आहे. तुम्हाला घरगुती जीवनात अनेक नवीन प्रस्ताव येतील. कार्यक्षेत्रात लाभ होईल. नातेवाईक भेट असा हा दिवस आहे. प्रकृती आणि मनस्वास्थ्य सांभाळा. मिथुन आज जोडीदार आणि कुटुंबीय ही तुमची प्राथमिकता असेल. आनंददायी खरेदी, प्रवास काही घरासाठी विशेष वस्तू तुम्ही खरेदी कराल. दिवस शुभ. कर्क दिवस काही महत्त्वाचे व्यवहार घडवून आणेल. घरात विशेष काम निघेल. मात्र त्यात अडचणी येतील. खर्च झाला तरी प्राप्ती होईल. मध्यम दिवस आहे. सिंह आज कुठूनतरी सामाजिक कार्यक्रमात भाग घेण्याचे योग येतील. संततीचे सुख चांगले असून शेजाऱ्यांशी सांभाळून वागा. कामात वाढ होईल. दिवस शुभ आहे. कन्या घरामध्ये किंवा सामाजिक जीवनात यश मिळेल. शांत रहा. तुमचा हेवा वाटणारे लोक फायदा घेतील. आर्थिक लाभ संभवतात. घरात जास्तीचे काम येईल. दिवस उत्तम. तूळ चंद्राचे तृतीय स्थानातून भ्रमण आणि सप्तम राहू आज जपून राहण्याचे संकेत देत आहे. आर्थिकदृष्ट्या दिवस चांगला असेल. काही अचानक खर्च होईल. दिवस मध्यम. वृश्चिक मंगळ घरामध्ये काही तरी ताण निर्माण करेल. सूर्य सप्तम स्थानात असून जोडीदाराला शुभ आहे. तेज वाढेल. आर्थिक लाभ होतील. दिवस शुभ. धनु आज कार्यक्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींकडे लक्ष असू द्या. तुमचे विरोधक सध्या बलवान आहेत. कुठेतरी अडकण्याची शक्यता आहे. मात्र नवीन संधी मिळेल. दिवस शुभ. मकर आज दिवस शुभ असून भाग्य जोरात आहे. मंगळ शुक्र आरोग्य समस्या निर्माण करतील. कार्यक्षेत्र गाजवाल. आर्थिक लाभ. दिवस शुभ. कुंभ दिवस आनंददायक आहे. शांत रहा. होणाऱ्या खर्चाला आवर घाला. थोडे नकारात्मक वातावरण राहिल. जोडीदार आनंदी राहिल. दिवस शुभ. मीन व्यवसाय आणि नोकरी करणाऱ्या व्यक्तींना शुभ लाभ मिळतील. वैवाहिक सुख मिळेल. सध्या गुरू शुक्र शुभ असल्याने काही तरी धार्मिक कार्यक्रम कराल. दिवस चांगला. शुभम भवतू!!
Published by:Priya Lad
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या