Home /News /astrology /

राशीभविष्य: विजयादशमीचा मुहूर्त कोणाला अधिक लाभदायक वाचा..

राशीभविष्य: विजयादशमीचा मुहूर्त कोणाला अधिक लाभदायक वाचा..

आज दिनांक 15 ऑक्टोबर 2021.शुक्रवार. अश्विन शुद्ध दशमी. विजया दशमी. वर्षातला मोठा शुभ मुहूर्त. कुणाला हा दिवस किती आणि कसं फळ देईल वाचा..

आज दिनांक 15 ऑक्टोबर 2021.शुक्रवार. अश्विन शुद्ध दशमी. विजया दशमी.  वर्षातला मोठा शुभ मुहूर्त. साडेतीन मुहूर्तापैकी एक. आजच्या दिवशी मातेने असुरांचे निर्दालन केलं . विजय मिळवला. सीमोल्लंघन केलं. पांडवांनी आपला वनवास संपवून आपली शस्त्रे मिळवली. दुष्टांचा नाश करून सर्व सज्जनांच्या विजया निमित्त ही दशमी साजरा केली जाते  या दिवशी  शस्त्र पूजन करतात. तोरण लावुन  घर शृंगारतात.  श्रीरामांनी रावणाला मारून सीतेची सुटका केली. लंके वर विजय प्राप्त केला. त्या निमित्ताने रावण दहन केल्या जाते. जगदंबे च्या नवरात्रा ची  सांगता केल्या जाते. सर्वाना विजया दशमीच्या  हार्दिक शुभेच्छा. आज  रात्री  नऊ पर्यंत   चंद्र मकर राशीतून भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष आज दशम स्थानात मंगळ बुध कार्य क्षेत्रात  मोठी हालचाल निर्माण करेल. तुम्ही कुठल्याही कार्यक्रमात अग्रेसर राहाल. नावलौकिक मिळेल. आर्थिक स्थिती ठीक राहील. प्रकृती जपून. शत्रू पिडा संभवते. दिवस चांगला. वृषभ आज भाग्य स्थानातील ग्रह अनुकूल फळ देतील. जोडीदाराची साथ लाभेल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. थोडी  नकारात्मक मानसिकता होईल. दिवस  समाधानात जाईल. मिथुन राशीच्या अष्टम स्थानात होणारे  ग्रहांचे भ्रमण प्रकृती चिंता निर्माण करेल. आर्थिक व्यय होईल. धार्मिक कार्य घडेल. कौटुंबिक सुख मिळेल. संतती संबंधी शुभ वार्ता मिळतील. दिवस शुभ. कर्क आज चंद्र शनि  गुरू सप्तम स्थानात असून जोडीदारासाठी  विशेष अनुकूल नाही. मानसिक आरोग्य जपा. खर्च जपून करा. अष्टमात गुरू आध्यात्मिक प्रगती होईल.  दिवस शुभ. सिंह राशीच्या धनस्थानातील मंगळ बुध आर्थिक घडामोडी  घडवून आणतील. तुमचा कुटुंबातील व्यक्तींवर प्रभाव पडेल. षष्ठ चंद्र  आज तुम्हाला  नोकरीच्या ठिकाणी प्रतिष्ठा मिळवून देईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. दिवस मध्यम. कन्या राशीतील मंगळ शत्रुत्व वाढवेल. नातेवाईकांना अंतरावर ठेवा. संतती चिंता वाढेल. त्वचा रोग किंवा  पोटाचे विकार त्रास देतील. मात्र  आर्थिक लाभ होत राहतील. दिवस चांगला. तुला आज राशी च्या धन स्थानातील शुक्र व चतुर्थातील चंद्र गुरू शुभ फळ देतील. घरासाठी नवीन वस्तु, शुभ कार्य  संभवतात. मात्र  नुकसान होऊ नये याची काळजी घ्या. दिवस चांगला. वृश्चिक आज तृतीय चंद्र  प्रवास योग आणेल. काही जुने हितसंबंध पुन्हा  भेटतील. भावंडाची गाठभेट होईल. बोलण्यावर ताबा ठेवावा. दिवस चांगला. धनु धन कुटुंब वाणी स्थानात होणारे चंद्र भ्रमण शुभ फळ देईल. आर्थिक व्यवहार होतील. पण जरा जपून.  परदेश संबंधी  व्यवहार होतील. नवीन खरेदी, कपडे मित्र मैत्रिणींना भेट  असा  दिवस उत्तम पार पडेल. मकर राशीतून होणारे चंद्र भ्रमण मिश्र फळ देणार आहे. आर्थिक दृष्टय़ा चांगला काळ. नकारात्मक मानसिकता ठेऊ नका. गुरु उपासना करा. दिवस बरा जाईल. कुंभ व्यय स्थानात चंद्र शनि  मुळे तुमची मानसिकता बिघडेल. हॉस्पिटल कोर्ट कचेरी मध्ये वेळ जाईल. कायदा पाळा. आरोग्य  संभाळा. अष्टमात ग्रह अपघात, अग्नी पासून भय दाखवत आहे. दिवस मध्यम जाईल. मीन राशीच्या लाभ स्थानातील चंद्र मित्र मैत्रिणीं ज्येष्ठ व्यक्ती पासून लाभ दर्शवतो. संतती कडे लक्ष ठेवा.जोडीदाराची साथ मिळेल  पण वाद नको. दिवस शुभ. शुभम  भवतु!!
First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya

पुढील बातम्या