मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

दत्तगुरूंच्या कृपेने कसा जाईल तुमचा आजचा दिवस; पाहा राशिभविष्य

दत्तगुरूंच्या कृपेने कसा जाईल तुमचा आजचा दिवस; पाहा राशिभविष्य

07 डिसेंबर, 2022 रोजीचं राशिभविष्य.

07 डिसेंबर, 2022 रोजीचं राशिभविष्य.

आज दत्तजयंती. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

आज दिनांक 07 डिसेंबर 2022. वार बुधवार. आज मार्गशीर्ष पौर्णिमा सकाळी 8.01 मिनिटांनी प्रारंभ होईल. आज दत्तजयंती. अत्रि अनसूया पुत्र दत्तात्रेयांचा आज जन्मोत्सव. 'अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त'. दत्तगुरूची आपणा सर्वांवर कृपा राहो. चंद्र आज वृषभ राशीत असेल. मंगळ चंद्र युती होईल. पाहुया आजचे बारा राशींचे भविष्य.

मेष

दिवस आनंद निर्माण करणारा आहे. चंद्र कुटुंबात काही शुभ घटना घडवेल. वैवाहिक जीवनात आनंद निर्माण होईल. घरात जबाबदारी वाढेल. आर्थिक लाभ होतील. दिवस उत्तम आहे.

वृषभ

आज जवळपासचे प्रवास संभवतात काही महत्त्वाचे निर्णय होतील. प्रयत्न करा. धैर्य खचू देऊ नका. मंगळचंद्र योग लाभ देईल. अष्टम रवी जपून राहण्याचे संकेत देत आहे. दिवस उत्तम.

मिथुन

आर्थिक लाभ झाला तरी खर्चाचे वाढते प्रमाण त्रास देईल. व्यय मंगळ वैवाहिक जीवनात अचानक काही ताण निर्माण करेल. गुरुबळ उत्तम आहे. शुक्र शुभ अवस्थेत आहे. दिवस उत्तम.

कर्क

आज दिवस भाग्यदायक आहे. रवी सावधगिरीने वागण्याचा संकेत देत आहे. कलह टाळा. प्रकृती जपा. मित्र घरी येतील. नवीन घडामोडी होतील. शुभ दिवस.

सिंह

चंद्र मंगळ योग अधिक काम, घरात जास्तीची जबाबदारी असे परिणाम देईल. भावंडं सुख लाभेल. शुक्र शुभ आहे. प्राप्ती होईल. वाहन सुख लाभेल. दिवस शुभ.

कन्या

मन आशंकित राहिल. जवळच्या व्यक्तीची किंवा जोडीदाराची चिंता सतावेल. घाबरू नका. चंद्र अनुकूल आहे.जोडीदार आनंदी राहिल. लाभ होतील. संततीची काळजी घ्या. दिवस शुभ.

तूळ

अष्टम चंद्र मंगळ योग आहे. जास्तीचे काम, प्रवास जवळपास जाण्याचे बेत केले जातील. आर्थिक स्थिती ठिक राहिल. आईवडिलांच्या प्रकृतीची काळजी वाटेल. दिवस चांगला.

वृश्चिक

सप्तम स्थानातील चंद्र मंगळ योग सुखद अनुभव देईल. तुम्ही स्वयंपूर्ण राहाल. धार्मिक कामात रस घ्याल. तुमच्या मनासारख्या गोष्टी घडतील. प्रवास, संपर्क असा हा दिवस उत्तम जाईल.

धनु

आज दिवस आनंदात राहण्याचा आहे. षष्ठ स्थानातील चंद्र व्यावसायीक भेट घडवेल. मंगल शत्रू स्थानात आहे. जोडीदाराची काळजी घ्या. दिवस मध्यम जाईल.

मकर

राशीच्या पंचम आणि भाग्य स्थानातील चंद्र गुरू योग काही घडामोडी घडवेल. आनंददायक दिवस. राशी स्थानातील शनी कष्टदायक परिणाम देईल. दिवस उत्तम आहे.

कुंभ

गुरू महाराज शनीवर अंकुश ठेवतील. मातृ पितृ भेट होऊ शकते. मोठ्या व्यक्तीशी संपर्क होईल. भाग्य साथ देइल. आर्थिक लाभ संभवतात. गृहसौख्य मिळेल. दिवस उत्तम.

मीन

आज चंद्र मंगळ योग सर्व दृष्टया उत्तम आहे. सामाजिक जीवनात यशस्वी होणार आहात. संततीची भरभराट होईल. .प्रकृती उत्तम राहील. वैवाहिक जीवन ठीक . दिवस उत्तम.

शुभम भवतू!!

First published:

Tags: Astrology and horoscope, Horoscope, Lifestyle, Rashibhavishya