मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

दैनंदिन राशिभविष्य : तुमच्यासाठी किती शुभ ठरणार दसरा? विजयादशमीचं तुमचं राशिभविष्य

दैनंदिन राशिभविष्य : तुमच्यासाठी किती शुभ ठरणार दसरा? विजयादशमीचं तुमचं राशिभविष्य

फोटो सौजन्य (Canva)

फोटो सौजन्य (Canva)

आश्विन शुक्ल दशमी. विजयादशमी. साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

आज दिनांक 05 ऑक्टोबर 2022, वार बुधवार. आश्विन शुक्ल दशमी. विजयादशमी. साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे.सर्वांना या मंगल दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. चंद्र मकर राशीतून भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

मेष

राशीतील राहू आणि दशम  चंद्र शनी चिंता वाढवेल. षष्ठातील शुक्र बुध शुभ घटना घडवतील. दिवस आनंदात जाईल. शारीरिक, मानसिक ताण घेऊ नका. दिवस उत्तम.

वृषभ

आज भाग्यात चंद्राचे भ्रमण शुभ फळ देईल. कुटुंबात महत्त्वाचे निर्णय होतील. आर्थिक लाभ होतील. व्यय राहू सावधगिरीचा इशारा देत आहे. भेट होईल. दिवस शुभ आहे .

मिथुन

राशी स्वामी बुध कन्या राशीत सूर्यासोबत आहे. सरकारी काम, कार्यालयीन कामकाज वाढेल. शुक्राचे चतुर्थ स्थानातील भ्रमण गृह लाभ घडवेल. शुभ कार्य होतील. दिवस चांगला.

कर्क

आज सप्तम स्थानात चंद्र शनी असून काही संकेत मिळतील. भाग्य स्थानात गुरू धार्मिक आस्था वाढवेल. सप्तम शनी जपून रहा असं सुचवत आहे. खंबीर रहा. दिवस मध्यम आहे.

सिंह

आज चंद्र भ्रमण षष्ठ स्थानात असून प्रकृती नरम गरम राहिल. मन थोडं चिंतित राहिल. पण काळजी नको. गुरूची उपासना करत राहा. लवकरच शुभ घटना घडणार आहेत. दिवस चांगला.

कन्या

पंचम स्थानातील चंद्र आर्थिक यश देईल. आज दिवस कार्यालयीन जीवनात काही विशेष घडेल असा आहे. संततीसाठी खरेदी कराल. हाताने शुभ काम होईल. लाभ होतील. दिवस उत्तम.

तूळ

चंद्राचे भ्रमण चतुर्थ स्थानात आहे. घरात खूप काम येईल असे संकेत आहेत. कुटुंबाशी मतभेद होऊ शकतात. आर्थिक व्यवहार होतील. भावंडांचे सुख लाभेल. शांततेत दिवस घालवा.

वृश्चिक

काही आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. मन आनंदी राहिल. लाभ होईल पण खर्च जपून करा. घर ही तुमची प्राथमिकता राहिल. दिवस मध्यम आहे.

धनु

आज दिवस घरातल्या विशेष कामांसाठी खर्च होईल. काही जबाबदाऱ्या येतील तरी चांगला दिवस आहे. आर्थिकदृष्ट्या उत्तम दिवस. प्रवास होतील. दिवस शुभ.

मकर

शनी चंद्र तुम्हाला नैराश्याला समोर जायला लावेल. खर्चाचे, सामाजिक जबाबदारी घेण्याचे योग आणेल. शनी व्यवसायात कष्ट करायला भाग पाडेल. दिवस शुभ.

कुंभ

आज विशेष घडामोडीचा दिवस आहे. अचानक होणारे लाभ प्रसन्न करतील. कायदा मोडू नका. अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागेल. दिवस मध्यम.

मीन

राशीच्या लाभ स्थानातील चंद्र भरपूर काम देईल. जास्तीचे खर्च करावे लागतील. भटकंतीचे योग येतील. घरात पाहुणे येण्याची शक्यता आहे. प्रकृती बरी राहिल. दिवस उत्तम आहे.

शुभम भवतू!!

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs