मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

राशीभविष्य: मार्केटिंग, सेल्समध्ये असलेल्या या राशीच्या लोकांना आज मिळणार फायदा

राशीभविष्य: मार्केटिंग, सेल्समध्ये असलेल्या या राशीच्या लोकांना आज मिळणार फायदा

आज गुरुवार दिनांक 12 ऑगस्ट 2021. तिथी श्रावण शुक्ल चतुर्थी. पाहा आजचं ग्रहमान काय आणि त्याचा तुमच्या दिवसावर काय परिणाम होणार?

आज गुरुवार दिनांक 12 ऑगस्ट 2021. तिथी श्रावण शुक्ल चतुर्थी. पाहा आजचं ग्रहमान काय आणि त्याचा तुमच्या दिवसावर काय परिणाम होणार?

आज गुरुवार दिनांक 12 ऑगस्ट 2021. तिथी श्रावण शुक्ल चतुर्थी. पाहा आजचं ग्रहमान काय आणि त्याचा तुमच्या दिवसावर काय परिणाम होणार?

आज गुरुवार दिनांक 12 ऑगस्ट 2021. तिथी श्रावण शुक्ल चतुर्थी. आज चंद्र शुक्र कन्येत असतील. पाहूया बारा राशींचे भविष्य.

मेष

आज तुमच्या शरीराला आरामाची गरज आहे. विश्रांती घ्या. देणे घेणे करू नका. शत्रू पासून सावध रहा .कुठेही अनावश्यक धाडस करू नका. दिवस बरा जाईल.

वृषभ

संतती कडे लक्ष देणे गरजेचे आहे . मार्केटिंग क्षेत्रातल्या व्यक्ती साठी आजचा दिवस शुभ आहे. मानसिक हुरहूर राहील. आर्थिक बाजु चांगली राहील. दिवस चांगला.

मिथुन

आज शरीर जरा थकलेले राहील. घरीच आराम करावा. आई वडीलांचे आरोग्य चांगले राहील. शुभ कार्य घडतील. आर्थिक बाजू  उत्तम .दिवस शुभ आहे.

कर्क

आज छोटीशी पार्टी, किंवा कोणाला भेटण्याचा योग येईल. बिझनेस निमित्त केलेले प्रवास यशस्वी होतील. नवीन संधी मिळतील. दिवस उत्तम  आहे.

सिंह

धनलाभ  होईल. कुटुंबात आनंदाचे क्षण येतील..आजकाल प्राप्ती अणि खर्च सारखे होत आहे. जोडीदाराला काही नवीन संधी मिळवुन देईल,दिवस शुभ आहे .

कन्या

राशीतील शुक्र चंद्र सौंदर्य बहाल करतील. आर्थिक लाभ होतील. स्त्रीवर्ग विशेष मदत करेल. आकर्षक व्यक्ती ची भेट होईल. धार्मिक कार्य घडेल. दिवस शुभ आहे.

तुला

आज व्यय स्थानातील चंद्र भ्रमण खर्च आणि मानसिक ताण दर्शवत आहे. राहू षडाष्टक योग करीत आहे.अध्यात्मिक साधना करावी. दिवस मध्यम जाईल .

वृश्चिक

आज मित्र मैत्रिणींना भेटायला जावे लागेल. लाभ होतील. चैनी कडे कल होईल. स्त्रीवर्ग मदत करेल. गृहसौख्य उत्तम राहील. दिवस शुभ आहे.

धनु

काम आणि भरपूर काम, असा दिवस आहे. मार्केटिंग, सेल्स मधील लोकांना फायद्याचा दिवस आहे. आर्थिक स्थिती ठीक राहील. प्रकृती सांभाळा. दिवस उत्तम.

मकर

भाग्यशाली दिवस आहे. चंद्र शुक्र प्रवास योग आणतील. त्यातून काही संधी येतील.अष्टमात मंगळ सावधगिरीचा इशारा देत आहे. आर्थिक स्थिती ठीक राहील  दिवस शुभ.

कुंभ

अष्टमात चंद्र शुक्र आज फारसे अनुकूल नाहीत. दिवस थोडा तणावपूर्ण जाईल. उपासना करीत रहा. कुठेही अनावश्यक खर्च टाळा. डोळ्याचे त्रास होतील. दिवस मध्यम जाईल.

मीन

साधता दाम्पत्य जीवन आनंदी आणि समाधानी आहे. जोडीने खरेदी  ,मौज कराल  खर्च होतील. पण काम ,व्यावसायिक लाभ उत्तम होतील. दिवस शुभ आहे.

शुभम  भवतु!!

First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya