Home /News /astrology /

दैनंदिन राशीभविष्य: आज वृश्चिक राशीला मिळेल खूशखबर; कसा जाईल तुमचा आजचा दिवस? वाचा भविष्य

दैनंदिन राशीभविष्य: आज वृश्चिक राशीला मिळेल खूशखबर; कसा जाईल तुमचा आजचा दिवस? वाचा भविष्य

आज दिनांक ५ जुलै २०२२ मंगळवार. आज आषाढ शुक्ल षष्ठी. आज चंद्र सायंकाळ पर्यंत सिंह राशीत भ्रमण करेल . पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

    आज दिनांक ५ जुलै २०२२ मंगळवार. आज आषाढ शुक्ल षष्ठी. आज चंद्र सायंकाळ पर्यंत सिंह राशीत भ्रमण करेल . पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष पंचमातील चंद्र कार्यक्षेत्र आणि संतती बाबतीत आज शुभ फळ देईल . राशीतील राहू मंगळ मानसिक द्वंद्व निर्माण करतील.त्यादृष्टीने सावध असावे.मित्र आणि संतती सोबत आनंदात दिवस व्यतीत होईल .दिवस चांगला. वृषभ आज राशीच्या चतुर्थ स्थानातील चंद्र घरामध्ये काही विशेष धार्मिक काम काढेल. आनंद मिळेल. भरपूर काम करून झाल्यावर सायंकाळी विश्रांती घ्याल.. उत्तम दिवस. मिथुन चंद्र भ्रमण राहुशी योग करीत आहे,उच्च प्रतीचे अध्यात्मिक, सामाजिक अनुभव येतील. घरात भरपूर वेळ घालवाल.बंधू भेट होईल . आर्थिक बाजू उत्तम. दिवस उत्तम जाईल. कर्क चंद्र आणि राहू काही विशेष अनुभव देतील. आर्थिक बाजू भक्कम राहील.. मन स्थिर होईल. मित्र मंडळ भेटेल. आर्थिक लाभाचे योग येतील. दिवस उत्तम. सिंह आज राशीस्थानात चंद्र खूप लाभ मिळवून देईल. मन आनंदी राहील. तसेच आर्थिक सुख लाभेल. वाचन लेखन यात वेळ घालवा. दिवस शुभ. कन्या आज चंद्र व्यय स्थानात आहे. तुमच्यावर येणाऱ्या जबाबदाऱ्या मुळे तुम्ही व्यग्र राहाल.. आदर आणि सन्मान वाढेल.गुरू विवाह जमण्याकरता मदत करेल. दिवस मध्यम. तुला आज चंद्र उत्तम प्रतीचे फळ देण्यास सज्ज आहे. कार्यक्षेत्र आणि धार्मिक क्षेत्रात चांगला लाभ मिळेल. जोडीदाराचे मन सांभाळा. .दिवस मध्यम. वृश्चिक आज आनंदात राहण्याचा दिवस. चंद्र प्रकृती संबंधी उत्तम फळ देईल..घरा मध्ये काही विशेष घटना घडतील. प्रवास होतील. जोडीदार आनंदी राहील दिवस शुभ. धनु आज जीवनातील एक चांगला दिवस आहे कार्यक्षेत्रात देखील चांगला अनुभव देईल. आर्थिक बाबी जपा. चंद्र शुभ फळ देईल. दिवस आनंदात जाईल. मकर शनि कुंभेमध्ये वक्री असून ताण निर्माण करील. प्रकृती कडे लक्ष द्या. नातेवाईक भेट संभवते. सायंकाळ नंतर आर्थिक दृष्ट्या मध्यम दिवस. कुभ राहू चंद्र योग आज दिवस सांभाळून घालवा असे सुचवीत आहे. जोडीदारा कडे लक्ष द्या. धार्मिक स्थानाला भेट देण्याचे योग. दिवस शुभ. मीन आज चंद्र राहू नव पंचम योग मानसिक ताण घडवेल. घरामध्ये काही अप्रिय घटना घडतील . धार्मिक स्थानाचा प्रवास होईल.आर्थिक लाभ संभवतात. दिवस शुभ. शुभम भवतू!!
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya

    पुढील बातम्या