Home /News /astrology /

दैनंदिन राशीभविष्य: आठवड्याचा पहिला दिवस 'या' राशींसाठी असेल खास; कसा जाईल दिवस? वाचा सविस्तर

दैनंदिन राशीभविष्य: आठवड्याचा पहिला दिवस 'या' राशींसाठी असेल खास; कसा जाईल दिवस? वाचा सविस्तर

आज दिनांक ४ जुलै २०२२. वार सोमवार. तिथी आषाढ शुक्ल पंचमी. आज चंद्राचे भ्रमण दिवसभर सिंह राशीतून होईल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

    आज दिनांक ४ जुलै २०२२. वार सोमवार. तिथी आषाढ शुक्ल पंचमी. आज चंद्राचे भ्रमण दिवसभर सिंह राशीतून होईल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष वैवाहिक जीवन थोडे तणाव पूर्ण राहील. दिवसाचा काही काळ हा चिंतनात घालवाल. आर्थिक आणि व्यवसाय वृद्धी संभवते. दिवस आनंदात जाईल. वृषभ आर्थिक बाबतीतली गणित कष्ट देणारी ठरतील. काही निर्णय तापदायक होऊ शकतात. प्रवास योग देखील टाळा.घरामध्ये कामाची चिंता वाटेल. दिवस मध्यम आहे. मिथुन चंद्राचे भ्रमण कामाच्या ठिकाणी भरपूर लाभ देईल . मुल ताण देतील. कार्य क्षेत्रात भरपूर काम राहील. आर्थिक लाभ होतील.संतती आनंदी राहतील. दिवस शुभ. कर्क आर्थिकदृष्ट्या उत्तम दिवस. कुटुंबासोबत वेळ घालवा. काही आनंदाच्या घटना घडतील. तुमच्या बोलण्याने लोक प्रभावित होतील. दिवस उत्तम आहे. सिंह राशीतील चंद्र शनीशी प्रतियोग करत आहे. मनावर काहीसं निराशेचे सावट येईल. आठव्या गुरूचे नकारात्मक अनुभव येतील. प्रगती होणार नाही. शांत राहण्याचा दिवस आहे. कन्या आज तुमच्यावर खूप प्रेम करणाऱ्या व्यक्ती काहीतरी विशेष करतील. भेट वस्तू मिळेल.खर्च वाढेल .प्रकृती चांगली राहील. दिवस उत्तम. तूळ काही लाभ घेऊनच आजचा दिवस उगवेल. जास्तीचे काम करण्याचा, प्रवास, भेटीगाठी चा दिवस आहे.धार्मिक स्थळांना भेट द्यावी अशी इच्छा होईल. दिवस शुभ. वृश्चिक दिवस आजही संथपणे घालवण्याचा आहे. आर्थिक लाभ संभवतात. मात्र जोडीदाराची काळजी घ्या. सहजीवन सुखी राहील. प्रवास टाळा. दिवस शुभ आहे. धनु आज चंद्र कौटुंबिक सुखामध्ये वाढ करेल. दोघे मिळून, भेटवस्तू खरेदी कराल. आनंदी काळ आहे. कामाची गडबड राहील. दिवस काही विशेष अनुभव देईल. मकर संततीला काही अडचण असेल तर आर्थिक मदत, करावी लागेल. प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल.आर्थिक लाभ होतील.तसेच हितशत्रू पासून सावध राहा. दिवस शुभ. कुंभ कुटुंबीय सोबत आनंदाने घालवण्याचा दिवस आहे. शैक्षणिक क्षेत्रात भरघोस यश देईल.वाचनात मन रमेल. भाग्य कारक गुरू यशाचा मार्ग दाखवेल .दिवस शुभ. मीन आज कार्यालयीन जास्तीची काम पार पाडून तुम्ही थकून जाल. प्रवास योग आहेत.आर्थिक ताण,काही खरेदी असा हा दिवस आहे. आईवडील खुश असतील. दिवस उत्तम. शुभम भवतू!!
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya

    पुढील बातम्या