आज दिनांक ६ डिसेंबर २०२२ मंगळवार .आज मार्गशीर्ष चतुर्दशी. आज चंद्र मेष राशीत भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.
मेष
चंद्र कार्यक्षेत्रासंबंधी विशेष फळ देईल . राशीतील राहू मानसिक क्लेश देईल . त्यादृष्टीने सावध असावे. कुटुंब स्थानातील मंगळ सर्व दृष्ट्या जपून रहा असे संकेत देत आहे. आनंदात दिवस घालवा. .दिवस चांगला आहे.
वृषभ
आज राशीच्या व्यय स्थानातील चंद्र काही विशेष घटना घडवेल. मानसिक दृष्ट्या कठीण काळ. वैवाहिक जीवन त्रासाचे राहील. आर्थिक व्यय होईल. मध्यम दिवस.
मिथुन
चंद्र भ्रमण राहू सोबत योग करीत आहे, लाभ स्थानातून होणारे शुभ परिणाम समोर येतील. आर्थिक बाजू बरी राहील. जास्तीचे काम पडेल. वक्री मंगळ खर्च वाढवेल. दिवस उत्तम जाईल.
कर्क
दशम स्थानातील चंद्र आणि षष्ठ शुक्र जीवनात विशेष अनुभव देतील. आर्थिक बाजू भक्कम राहील. मन आनंदी होईल. मित्र मंडळ भेटेल. लाभाचे योग येतील. मात्र खर्च ही होईल. दिवस शुभ.
सिंह
आज भाग्य स्थानात चंद्र गृहसुख, प्रकृती बाबत शुभ फळ देईल. मन स्थिर राहील. आर्थिक दृष्ट्या घडामोडी होतील. वाचन लेखन यात वेळ घालवा. संतती आनंदी राहील . दिवस उत्तम .
कन्या
आज चंद्र अष्टम स्थानात आहे. तुमच्यावर येणाऱ्या जबाबदाऱ्या मुळे तुम्ही व्यग्र राहाल. मानसिक त्रास वाढेल. गुरू विवाह जमण्याकरता मदत करेल. दिवस मध्यम.
तुला
आज चंद्र घरामध्ये मध्यम प्रतीचे फळ देण्यास सज्ज आहे. कार्यक्षेत्र आणि धार्मिक क्षेत्रात चांगला लाभ मिळेल. आर्थिक व्यय होईल. जोडीदाराचे मन सांभाळा. प्रकृती जपा. दिवस शुभ.
वृश्चिक
आज मानसिक ताणात राहण्याचा दिवस. चंद्र प्रकृती संबंधी मध्यम फळ देईल. निरुत्साह वाटेल.घरा मध्ये काही विशेष घटना घडतील. जोडीदार मदत करेल. शत्रू वाढतील.दिवस मध्यम.
धनु
आज जीवनातील एक चांगला दिवस आहे कार्यक्षेत्रात देखील चांगला अनुभव देईल. आर्थिक बाबी जपा. चंद्र शुभ फळ देईल. संतती सोबत दिवस आनंदात जाईल.
मकर
शनि मकर राशीमध्ये मार्गी असून मंगळ , ताणतणाव निर्माण करील. प्रकृती कडे लक्ष द्या. नातेवाईक भेट संभवते. चतुर्थ स्थानातील चंद्र सामाजिक लाभ देईल . उत्तम दिवस.
कुभ
तृतीय चंद्र योग आज दिवस जपून घालवा असे सुचवीत आहे. कार्यक्षेत्रकडे लक्ष द्या. धार्मिक स्थानाला भेट देण्याचे योग. सामाजिक प्रतिष्ठा. आर्थिक लाभ. दिवस मध्यम..
मीन
आज चंद्र मानसिक स्थैर्य देईल. घरामध्ये काही विशेष घटना घडतील . धार्मिक स्थानाचा प्रवास होईल. आर्थिक लाभ होतील. जोडीदार आनंदी राहील. दिवस उत्तम.
शुभम भवतू!!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope