Home /News /astrology /

दैनंदिन राशीभविष्य: कार्यक्षेत्रात नवीन संधी पण ऑफिसमध्ये तणावाचा आजचा दिवस; काय सांगते तुमची रास? जाणून घ्या

दैनंदिन राशीभविष्य: कार्यक्षेत्रात नवीन संधी पण ऑफिसमध्ये तणावाचा आजचा दिवस; काय सांगते तुमची रास? जाणून घ्या

आज दिनांक ५ऑगस्ट २०२२.शुक्रवार. जरा जिवांतिका पूजन. आज श्रावण शुक्ल सप्तमी. चंद्र आज तुला राशीत असेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य

आज दिनांक ५ऑगस्ट २०२२.शुक्रवार. जरा जिवांतिका पूजन. आज श्रावण शुक्ल सप्तमी. चंद्र आज तुला राशीत असेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य मेष राशी च्या सप्तम स्थानात चंद्र वैवाहिक जीवनात सुखद क्षण आणेल. मंगळ राशी स्थानात राहूसोबत ही ग्रहस्थिती अचानक घडामोडी घडवेल. घरात फार काम पडेल. आई वडिलांची प्रकृती जपा .दिवस शुभ. वृषभ राहू मंगळ भ्रमण स्त्रियांना चांगले नसून, षष्ठ चंद्र शारीरिक ताण निर्माण करेल. तृतीय स्थानात सूर्य भावंडाना काही विशेष लाभ देईल . दिवस चांगला. मिथुन राशीच्या पंचमात चंद्र शुभ असून काही नवीन सामाजिक जबाबदाऱ्या येतील. महत्वाचे संपर्क होतील. संततीला शुभ काळ. प्रकृती सांभाळा. दिवस मध्यम जाईल. कर्क चंद्र आज चतुर्थ स्थानात आहे. घरी व कार्यक्षेत्रात धावपळ होईल. जास्तीची जबाबदारी येईल. राहू मंगळ दशमात तर रवि राशी स्थानात असून वैवाहिक आयुष्यात ताण देणारा दिवस आहे . मन उदास वाटेल. ग्रहांचा प्रभाव जाणवेल. दिवस मध्यम जाईल. सिंह राशीच्या अष्टम स्थानातील गुरु काहीसे संथ वाटेल असे दिवस जातील. चंद्र अडचणीतून विजय मिळवून देईल.प्रकृती जपा. प्रवास योग येतील.दिवस मध्यम जाईल. कन्या राशीच्या द्वितीय स्थानात चंद्र आर्थिक घडामोडी करणारा ठरेल. सामाजिक उपक्रमात भाग घ्याल. वैवाहिक प्रस्ताव येतील. दिवस उत्तम.. तुला चंद्र स्वराशीत आहे. कार्यालयात काळजी घ्या. घरामध्ये मोठे खर्च निघतील. जोडीदाराची काळजी घ्या. सप्तम मंगळ राहू वैवाहिक जीवनात ताण आणेल. दिवस बरा जाईल. वृश्चिक राशीच्या व्यय स्थानातील चंद्र खर्चाचे मार्ग तयार करेल. भावंडांशी मतभेद वाढतील. प्रवास योग येतील.संततीला शुभ काळ आहे.दिवस मध्यम. धनु लाभ चंद्र आणि चतुर्थ गुरू शुभ असून घरामध्ये सुधारणा घडवून आणतील . सप्तम स्थानात शुक्र आहे. खरेदी होईल. जोडीदारा सोबत दिवस शांत पणे घालवा. मकर शनि महाराज काही विशिष्ट ताण देतील. चंद्र कार्यालयीन चिंता निर्माण करेल. जोडीदार व्यग्र राहील. खर्च जपून करा. दिवस मध्यम. कुंभ धन स्थानातील गुरू आर्थिक लाभ देईल.. बारावा वक्री शनि त्रासदायक ठरेल. चंद्र भाग्य उदयाचे संकेत देत आहे. संततीची काळजी घ्या . दिवस मध्यम जाईल मीन राशीतील गुरू मानसिक उलाढाल दाखवत आहे. लाभ होतील. कार्यक्षेत्रात नवीन संधी मिळतील. दिवस गृह चिंतेचा ठरेल.शांत रहा. दिवस मध्यम. शुभम भवतू!!
Published by:Atharva Mahankal
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle

पुढील बातम्या