Home /News /astrology /

दैनंदिन राशीभविष्य: मन आशंकित राहील पण नवीन जबाबदारी अंगावर येतील; आज 'या' राशींच्या जीवनात घडतील विशेष घटना

दैनंदिन राशीभविष्य: मन आशंकित राहील पण नवीन जबाबदारी अंगावर येतील; आज 'या' राशींच्या जीवनात घडतील विशेष घटना

आज दिनांक ४ ऑगस्ट २०२२ वार. गुरूवार. आज श्रावण शुक्ल सप्तमी. आज चंद्र कन्या राशीतून भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

आज दिनांक ४ ऑगस्ट २०२२ वार. गुरूवार. आज श्रावण शुक्ल सप्तमी. आज चंद्र कन्या राशीतून भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष आज शष्ठ स्थानातील चंद्र भ्रमण बरे असून काही ताण असेल तर विचलित होऊ नका. मंगळ राहू धार्मिक आस्था निर्माण करतील. कार्यालयीन कामकाजात वेळ जाईल .दिवस शुभ. वृषभ राशीच्या पंचम स्थानातील चंद्र आज आर्थिक, व्यावसायिक लाभ देईल. प्रकृती ठीक राहील. भाग्य स्थानातील शनि अनुकूल असून मंगळ राहू अनाठायी खर्च देतील . शुभ दिवस. मिथुन आज चतुर्थ स्थानातील चंद्र घर आणि कामकाजासाठी शुभ आहे. खर्च होतील . प्रकृतीची काळजी घ्या असे ग्रह सुचवीत आहे. . दिवस मध्यम जाईल. कर्क चंद्र आज विविध क्षेत्रात विशेष घडामोडी घडवून आणेल. आर्थिक लाभ संभवतो. तुमच्यावर नवीन जबाबदारी येईल. राशीतील सुर्य बुध तेज निर्माण करतील पाठदुखी पासून जपा . दिवस शुभ. सिंह आज दिवस अनेक घटना घडवणारा आहे. आज मन आशंकित राहील. भावंडं भेट होईल.. दिवस आर्थिक भरभराट घडवेल. मध्यम दिवस. कन्या आज दिवस उत्तम असून प्रकृती ठीक असेल. काही विचित्र अशी हुरहूर लागून राहिलं. कार्यक्षेत्रात भरपूर काम कराल . प्रवास योग येतील. संततीची काळजी घ्या. दिवस ठीक आहे. तुला राशीच्या व्यय स्थानात चंद्र जीवनात ताण निर्माण करेल. खरेदी कराल. आर्थिक दृष्ट्या कष्ट. घरात काही विशेष घटना घडतील. दिवस मध्यम आहे. वृश्चिक चंद्र भ्रमण प्रकृतीच्या तक्रारी निर्माण करेल. आर्थिक घडामोडी ,अध्यात्मिक व्यक्तींची भेट घडवून आणेल. स्वतःवर वेळ आणि पैसा खर्च कराल. अनपेक्षित अडचणी येतील. दिवस मध्यम. धनु चंद्र भ्रमण आज कौटुंबिक जीवनात यश देईल. कार्यक्षेत्रात मंगळ राहू मतभेद करील. जोडीदाराची काळजी लागून राहील. दिवस मध्यम.. मकर राशीच्या तृतीय स्थानातील गुरू भ्रमण प्रवासाचे योग आणेल. त्यात तुम्ही अडकून जाल.मंगळ राहू खर्चाचे नवीन मार्ग तयार करतील. तसेच प्रप्तीही वाढेल. दिवस चांगला आहे. . कुंभ चंद्र अष्टम स्थानात आहे. शनि व्यय स्थानात खर्चाचे मार्ग निर्माण होतील असे सुचवीत आहे. मात्र आर्थिक लाभ देखील मिळतील. सांभाळून असा. दिवस मध्यम जाईल. मीन कौटुंबिक लाभ देणारा हा दिवस आहे. समारंभ होईल. थोडे तणाव पूर्ण वातावरण राहील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. दिवस उत्तम आहे. शुभम भवतू!!
Published by:Atharva Mahankal
First published:

Tags: Astrology and horoscope

पुढील बातम्या