आज दिनांक ३१ जुलै २०२२ रविवार. तिथी श्रावण तृतिया . आज चन्द्र सिंह राशीतून भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.
मेष
राशितले राहू आणि मंगळ सात्विक आचरण करा असे सांगत आहेत. चंद्र पंचम स्थानात संततीला त्रास घडवेल. गुरू व्ययात आहे , धार्मिक कामा साठी वेळ द्यावा लागेल. दिवस शुभ.
वृषभ
चतुर्थ चंद्र तुम्हाला व जोडीदाराला आर्थिक भरभराट देईल.स्वतः वर खर्च कराल.घरासाठी चैनीच्या वस्तू खरेदी कराल.धार्मिक कामासाठी वेळ द्याल. दिवस उत्तम आहे.
मिथुन
तृतीय स्थानात चंद्र आर्थिक आणि मानसिक ताण देईल.. जोडीदाराशी काही तरी कुरबुर होईल. प्रकृती ठीक राहील.दिवस शुभ.
कर्क
आज दिवस कुटुंबीयांसोबत,संतती सोबत घालवा. स्वतःला वेळ द्या. काही आर्थिक प्रश्न सोडवावे लागतील. धार्मिक आस्था वाढीस लागेल..दिवस मध्यम आहे.
सिंह
चंद्र सामाजिक क्षेत्रात नाव करील. काही चिंता असेल तर ती आता दूर होईल. नोकरी साठी उत्तम काल. जोडीदार खुश राहील. दिवस शुभ.
कन्या
आज दिवस खूप काही नवीन घटना घेऊन येईल. थोडी हुरहूर मनात राहील. चंद्र कामाचा ताण देईल. घरामध्ये काही नवीन बदल कराल.प्रवास होतील. दिवस मध्यम आहे
तुला
आज दिवस दगदग,प्रवास यांनी तुम्हाला त्रस्त करेल. संतती सुख मिळेल. सूर्य बुध विचीत्र अनुभव देईल. आर्थिक लाभ संभवतात. दिवस मध्यम.
वृश्चिक
आज कार्यालयीन प्रश्नांचा सामना करावा लागेल.वैवाहिक जीवन थोडे तणावपूर्ण होईल .प्रकृतीची काळजी घ्या. जास्त दगदग करू नका. आर्थिक लाभ होतील.दिवस चांगला.
धनु
आज भाग्यस्थानात चंद्र कुटुंबात आनंद निर्माण करेल.आर्थिक देणे घेणे होईल. नातेवाईक भेट होण्याचे संकेत आहेत. दिवस उत्तम.
मकर
आजचा दिवस हा घर आणि कुटुंब यांना वेळ देण्याचा आहे. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल .शैक्षणिक बाजू ठीक राहील ..दिवस मध्यम आहे.
कुंभ
शनि घरात काही विचित्र अनुभव देईल..आईवडील नाराज होणार नाहीत याची काळजी घ्या. संततीचे सुख मिळेल घरात जास्तीची काम निघतील. आनंदात दिवस जाईल.
मीन
आज कुठे तरी प्रवासाला जाण्याचा बेत ठरेल. भावंडं भेटतील. महत्वाचे निरोप मिळतील राशीतील गुरू आणि द्वितीय मंगळ अधिकार प्राप्ती करून देतील. दिवस शुभ आहे.
शुभम भवतू!!
Published by:Atharva Mahankal
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.