आज दिनांक ३० नोव्हेंबर २०२२. वार बुधवार. . आज मार्गशीर्ष शुक्ल सप्तमी. आज चंद्र कुंभ राशीतून भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य .
मेष
आज दिवस तुम्हाला उत्तम आहे. चंद्र मन आनंदी ठेवेल. मातृ पितृ भेट होईल. संततीला शुभ काळ आहे.घरामध्ये मन रमेल. आर्थिक , कौटुंबिक दृष्ट्या दिवस शुभ.
वृषभ
आज आर्थिक दृष्ट्या दिवस चांगला आहे. अनपेक्षित खर्च झाले तरी आनंद मिळेल. नाव लौकिक वाढेल. प्रवास योग येतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील. दिवस उत्तम फल देईल.
मिथुन
आज अर्थ प्राप्तीचे योग आहेत. स्वामी बुध उदित होत आहे. सामाजिक क्षेत्रात लाभ देईल. अष्टम स्थानातील शनि धार्मिक कार्यात यश देईल. शुक्र शष्ठ स्थानात. प्रकृती सांभाळून असा. दिवस मजेत जाईल.
कर्क
अष्टम स्थानातील चंद्र दुपारनंतर अचानक उलाढाल घडवेल. तुम्हाला काही नवीन जबाबदारी येईल. भटकंतीचे योग. घरात देखील काम राहील. मित्र मंडळी साठी खर्च कराल. .दिवस ठीक जाईल.
सिंह
आज दिवस आनंद दायक असून अध्यात्मिक अनुभव देईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील .मात्र खर्च होईल. गाठीभेटी होतील. दिवस सौख्याचा जाईल.
कन्या
आज दिवस आनंद देणारा आहे.अंगावर घेतलेली जबाबदारी ताण देईल. मात्र भाग्य साथ देईल . कुठल्याही प्रसंगात विचलित होऊ नका. जोडीदाराला त्रास राहील. दिवस शांतपणे घालवा.
तुला
आज दिवस पंचम चंद्राच्या प्रभावात आहे. अचानक मनस्थिती सुधारेल. मंगळ प्रवास योग आणेल. गृह सौख्य ,आर्थिक लाभ होतील. मन आनंदी राहील. प्रकृती जपा. नातेवाईक भेटतील. दिवस मध्यम.
वृश्चिक
आज दिवस आनंदात धार्मिक कार्य करत घालवा.. व्यय स्थानातील शनि महाराज खर्चाचे मार्ग दाखवतील. दिवस कलह न करता घालवा. आर्थिक बाजू ठीक राहील. मध्यम दिवस.
धनु
तृतीय स्थानातील चंद्र पराक्रमात वाढ देईल. घरात मन नाराज करणाऱ्या घटना घडतील . आर्थिक व्यय होतील. मुला सोबत दिवस जाईल.प्रवास योग येईल. मध्यम दिवस.
मकर
तुमच्या सप्तम स्थानातील चंद्र भ्रमण सामाजिक प्रतिष्ठेचे संकेत देत आहे . आज भाग्य उजळेल . आनंदात दिवस साजरा करताना त्रास विसरून जाल. वैवाहिक जीवनात शुभ योग येतील . दिवस शुभ आहे.
कुंभ
राशीच्या व्यक्तींनी कायद्या पासून जपावे. मात्र अचानक होणारा धनलाभ आनंद देईल. . घर आणि संततीला प्राधान्य द्यावे लागेल. नवीन वस्त्र,दागिना खरेदी कराल. संतती खुश राहील.दिवस उत्तम.
मीन
आज उत्तम प्रतीचा लाभ मिळणार असून आर्थिक बाजु समृद्ध होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. संतती ल वेळ द्यावा लागेल. प्रवास योग , संपर्क यात दिवस अतिशय गडबडीत जाईल.
शुभम भवतू !!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope