मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

दैनंदिन राशीभविष्य: मानसिक ताण राहील पण कार्यक्षेत्रात प्रगतीचा आजचा दिवस; कसे आहेत तुमचे ग्रह? वाचा भविष्य

दैनंदिन राशीभविष्य: मानसिक ताण राहील पण कार्यक्षेत्रात प्रगतीचा आजचा दिवस; कसे आहेत तुमचे ग्रह? वाचा भविष्य

आज दिनांक २७ जुलै २०२२ बुधवार आज आषाढ कृष्ण चतुर्दशी. आज चंद्र सायंकाळ पर्यंत मिथुन राशीत भ्रमण करेल . अमावस्या रात्रौ ११.२३ नंतर सुरू होइल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

  • Published by:  Atharva Mahankal

आज दिनांक २७ जुलै २०२२ बुधवार आज आषाढ कृष्ण चतुर्दशी. आज चंद्र सायंकाळ पर्यंत मिथुन राशीत भ्रमण करेल . अमावस्या रात्रौ ११.२३ नंतर सुरू होइल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

मेष

तृतीयातील चंद्र भावंडं आणि प्रवास बाबतीत आज शुभ फळ देईल . राशीतील राहू मंगळ मानसिक क्लेश निर्माण करतील.त्यादृष्टीने सावध असावे. कुटुंबा सोबत आनंदात दिवस व्यतीत होईल .दिवस चांगला.

वृषभ

आज राशीच्या द्वितीय स्थानातील चंद्र घरामध्ये काही विशेष धार्मिक काम काढेल. आनंद मिळेल. भरपूर काम करून झाल्यावर सायंकाळी फेरफटका घ्याल.. उत्तम दिवस.

मिथुन

चंद्र भ्रमण शुक्राशी योग करीत आहे, उच्च प्रतीचे कौटुंबिक, सामाजिक अनुभव येतील. घरात भरपूर वेळ घालवाल. आर्थिक बाजू उत्तम. दिवस उत्तम जाईल.

कर्क

चंद्र आणि शुक्र काही विशेष अनुभव देतील. आर्थिक बाजू भक्कम राहील. मन स्थिर होईल. मित्र मंडळ भेटेल. आर्थिक लाभाचे योग येतील. मात्र खर्च ही होईल. दिवस उत्तम.

सिंह

आज लाभ चंद्र शुक्र खूप लाभ मिळवून देईल. मन आनंदी राहील. तसेच आर्थिक सुख लाभेल. वाचन लेखन यात वेळ घालवा. संतती आनंदी राहील .दिवस शुभ.

कन्या

आज चंद्र शुक्र दशम स्थानात आहे. तुमच्यावर येणाऱ्या जबाबदाऱ्या मुळे तुम्ही व्यग्र राहाल. आदर आणि सन्मान वाढेल.गुरू विवाह जमण्याकरता मदत करेल. दिवस मध्यम.

तुला

आज चंद्रशुक्र उत्तम प्रतीचे फळ देण्यास सज्ज आहे. कार्यक्षेत्र आणि धार्मिक क्षेत्रात चांगला लाभ मिळेल. जोडीदाराचे मन सांभाळा. दिवस शुभ.

वृश्चिक

आज मानसिक ताणात राहण्याचा दिवस. चंद्र प्रकृती संबंधी मध्यम फळ देईल. निरुत्साह वाटेल. घरा मध्ये काही विशेष घटना घडतील. जोडीदार आनंदी राहील दिवस मध्यम.

धनु

आज जीवनातील एक चांगला दिवस आहे कार्यक्षेत्रात देखील चांगला अनुभव देईल. आर्थिक बाबी जपा. चंद्र शुभ फळ देईल. जोडीदरा सोबत दिवस आनंदात जाईल.

मकर

शनि मकर राशीमध्ये वक्री असून ताण निर्माण करील. प्रकृती कडे लक्ष द्या. नातेवाईक भेट संभवते. सायंकाळ पर्यंत आर्थिक दृष्ट्या मध्यम दिवस.

कुभ

शुक्र चंद्र योग पंचमात आज दिवस सांभाळून घालवा असे सुचवीत आहे. संतती कडे लक्ष द्या. धार्मिक स्थानाला भेट देण्याचे योग. दिवस शुभ.

मीन

आज चंद्र शुक्र योग मानसिक ताण घडवेल.घरामध्ये काही विशेष घटना घडतील . धार्मिक स्थानाचा प्रवास होईल.आर्थिक लाभ संभवतात. दिवस शुभ.

शुभम भवतू!!

First published:

Tags: Astrology and horoscope